तुळस केव्हा तोडावी.?केव्हा तोडू नये.? तुळस संबंधित सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी हि माहिती नक्की वाचा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक हिंदूच्या दारासमोर तुळस ही असते. आपल्या संस्कृतीत तुळशीला पूजनीय पवित्र व देवी मानले जाते यामुळे आपल्या दारात जर तुळस असेल तर तुम्हाला या गोष्टींची आठवण ठेवावी लागेल. या गोष्टींकडे लक्ष ठेवले तर आपल्या सर्व देवी-देवतांची कृपा होते.घरात सकारात्मक व आनंदी वातावरणाची निर्मिती होते. आपल्या शास्त्रांमध्ये घरामध्ये तुळस असेल तर अडचणी निर्माण होत नाही. घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण होते, चला तर मग जाणून घेऊया आपल्या शास्त्रांमध्ये घरामध्ये तुळशी असण्याची काही महत्त्वाचे फायदे सांगण्यात आलेले आहे त्याबद्दल..
तुळशीची पाने आपण कधीही तोडतो आपल्या उपयोगात आणतो किंवा पुढे ते वापरतो परंतु शास्त्रात काही दिवस तुळशीचे पाने तोडण्यासाठी निषिद्ध सांगितलेले आहेत. एकादशीला व रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत तसेच सूर्य ग्रहण व चंद्र ग्रहणाच्या दिवशी तुळशीचे पाने तोडू नये. जर या पानांची आवश्यकता असेल तर आदल्या दिवशीच पाने तोडून धुवून फ्रिज मध्ये ठेवावे.
जर गरज नसेल तर तुळशीची पाने तोडू नयेत. जर आपण असे मुद्दाम केले तर आपल्याला दोष लागतो. गरज नसताना पाने तोडणे म्हणजे तुळशीला नष्ट करण्यासारखे आहे. दररोज तुळशीची पूजा करावी. सकाळी स्नान झाले की एक तांब्या पाणी तुळशीला अर्पण करावे व हळद कुंकू अर्पण करावे तसेच दररोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावावा. अशी मान्यता आहे की ज्या घरांमध्ये रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावला जातो त्या घरात लक्ष्मीचे सदैव वास्तव्य असते.
जर घरात तुळशी असेल तर घरातील कितीतरी प्रकारचे वास्तु दोष निघून जातात आणि त्यांचा वाईट प्रभाव आपल्या कुटुंबावर पडत नाही त्या बरोबरच आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते. असेसुद्धा म्हटले जाते की ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरामध्ये कोणती ही वाईट शक्ती प्रवेश करत नाही त्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वास करत नाही. कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही आणि आपल्या घरात नेहमी पॉझिटिव ऊर्जा जाणवते.जर तुळस सुकली असेल तर तिला घरात ठेवू नये.
सुकलेले तुळशीचे रोप घरात ठेवणे अशुभ मानले गेले आहे म्हणून जर तुळस सुकली असेल तर तिला लगेचच नदीत किंवा तलावात विसर्जन करावे. सुकलेली व वाळलेली तुळशी जर आपण घरांमध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये बरकत राहत नाही. घरामध्ये अनेक अडचणी प्रवेश करू लागतात. म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी हिरवी बहरलेली तुळस लावावी. जर तुळशी सुकली असेल, वाळली असेल तर अशा वेळी लगेचच तुळशीचे दुसरे रोप लावावे.
तुळशीच्या रोपाला अध्यात्मशास्त्र मध्येच नाही तर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप सारे महत्त्व आहे. तुळशीमध्ये कितीतरी औषधी गुणधर्म आहेत व त्याचबरोबर आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व कीटकपासून संरक्षण प्राप्त करण्याचे गुण सुद्धा तुळशीच्या अंगी आहेत. घरात जर तुळस असेल तर घरातील वातावरण सुगंधी व पवित्र बनते आणि हवेत पसरलेले कीटक, रोग पसरवणारे जीवजंतू नष्ट होतात पण तो सुगंध आपण घेतला तर श्वासात संबंधित कितीतरी रोगांपासून आपले संरक्षण होते.जर दररोज तुळशीच्या एका पानाचे सेवन केले तर आपण साध्या सर्दी थंडी पासून दूर राहतो.
वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्यापासून आपला बचाव होतो. तुळशीच्या पानाचे दररोज सेवन केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते परंतु यासाठी न चुकता दररोज तुळशीचे एक पान जरुर खावे. तुळशीचे महत्त्व आहेत च पण त्याच बरोबरीने वैज्ञानिक गुण सुद्धा आहेत. तुळशीचे फायदे बघून ते जाणून आजकाल प्रत्येक जण दारात तुळशीची कुंडी ठेवताना आपल्याला दिसतात. आपल्या धर्मग्रंथांमध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत त्यामुळे आपल्या कितीतरी रोगांपासून आपण संरक्षण सुद्धा मिळवू शकतो. आपल्या धर्मग्रंथांमध्ये कितीतरी असे उपाय सांगितलेले आहेत त्यांना करून आपण आपल्या जीवनातील संकटे पासून सुटका मिळवू शकतो.
तुळशी तून सकारात्मक उर्जा उत्सर्जित होत असते आणि आसपास असणाऱ्या व्यक्तींना ही ऊर्जा मिळत असते म्हणून दररोज सकाळी स्नानानंतर सर्वांत आधी तुळशीला एक तांब्या पाणी अर्पण करावे व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुळशीला 5,7,8, 108 ,आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशीमधून निघणारी ऊर्जा आपल्याला मिळते. असे म्हणतात की जर घरात काही अनिष्ट घटना घडणार असेल तर तुळस माता ते संकट स्वतःवर घेते आणि आपले संरक्षण करते.
आपण खूप देखभाल करून जर तुळस कोमेजत असेल तर समजावे की आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या सदस्यावर बुध ग्रहाची छाया आहे म्हणूनच तुळस वेळोवेळी कोमेजून जाते अशा वेळी ती तुळस काढून तिचे विसर्जन करावे आणि दुसरी तुळस लावावी. तुळशीच्या पानांचे फार महत्त्व आहे म्हणून फक्त चार पाने रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे. जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल तर या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल. वाईट स्वप्न पडणार नाही.
आपल्याला भीती वाटत असेल ,एखाद्या गोष्टीचे दडपण असेल तर ती दिसली व दडपणही नष्ट होईल तसे आपले दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल तर आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर तुळशीच्या मुळापासून आपण एक उपाय करू शकतो त्यासाठी तुळशीच्या मुळला आमंत्रण देऊन घरी आणावे व ती मुळे घरी आणून गंगेच्या पाण्याने स्वच्छ करावी नंतर ते मुळी एका पिवळ्या कपड्यात बांधून पिवळ्या धाग्यात आपल्या उजव्या हातात पुरचरी बांधावी. हे मुळी अभिमंत्रित करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. या उपायामुळे आपल्या जीवनातील सर्व आर्थिक व भौतिक समस्या असतील त्या दूर होतील.
सर्व व कार्य सुरळीत विनाअडथळा ची पूर्ण होते. आपल्याला कोणाची दृष्ट लागली असेल, आपली तब्येत चांगली नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, नोकरी व्यवसायाला दृष्ट लागली आहे असे वाटत असेल तर घरातील कोणत्याही सदस्याला सात-आठ तुळशीची पाने घेऊन आपल्या अंगावरून फिरवायला सांगावे त्यानंतरही काळी मिरीचे दाणे खाऊन बाहेर फेकायला सांगावे व तुळशीचे पाने चावून त्याचा रस गिळून घ्यायचा आहे.
या उपायामुळे लगेचच आपल्यावर कोणी काही करणी केली असेल काही तंत्र मंत्रांचा प्रभाव असेल आपले दुर्भाग्य असेल तर यापासून सुटका मिळून आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावावी. या उपायामुळे घरात धनाची वाढ होते.पैसे भरपूर येतात. तुळस अंगणात लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होतो.
सकाळ-संध्याकाळ तुळशीच्या पुढे शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करत असते आणि त्याच बरोबर माता महालक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते. जर लहान मुले ऐकत नसेल तर जास्त हट्टी झालेली असेल, चिडचिड करत असतील, तर अशा वेळी रविवार सोडून बाकी इतर दिवशी पूर्वेकडे तोंड करून तुळशीची काही पाने त्यांना खायला द्या असे केल्याने त्यांच्या स्वभावामध्ये बदल होईल. चिडचिड करणारे मुलं शांत होऊन जातील आणि तुमचे ऐकू सुद्धा लागतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.