रोज शांत झोप हवी असेल तर हा उपाय लगेच करा; शांत झोपेसाठी एकमेव असा उपाय.!

रोज शांत झोप हवी असेल तर हा उपाय लगेच करा; शांत झोपेसाठी एकमेव असा उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेदामधील पंचकर्मातील अभ्यंग मसाज आणि शिरोधारा या दोन पैकी आज आपण शिरोधारा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. शांत आणि व्यवस्थित झोप ही आपल्या चांगल्या आरोग्याची द्योतक आहे, आपल्याला झोप व्यवस्थित असेल तर आपल्या शरीर चांगले राहते आणि आपले शरीर व्यवस्थित असेल, शरीरामध्ये काही समस्या नसेल तर आपल्याला झोप व्यवस्थित लागते म्हणजेच काय झोप आणि आपले शरीर हे दोन्ही एकमेकाचा अविभाज्य घटक आहेत.

आयुर्वेदामध्ये झोपेला भूत धारा म्हंटले गेले आहे. भूत म्हणजे प्राणिमात्र आणि रात्री म्हणजे त्यांचे धारण करणारी म्हणजे एक प्रकारे आई अशी उपमा आयुर्वेदामध्ये दिलेली आहे.आपली झोप व्यवस्थित असेल तर तुमचे शरीर चांगले राहते. तुमचे आरोग्य चांगले राहते.तुमचे काम तुम्ही व्यवस्थित करू शकतात.शांत झोप मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय असे कोणते करण्यासारखे आहेत या संदर्भात आज आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत.

आयुर्वेदामध्ये शांत झोपेसाठी अनेक उपचार केले जातात. शांत झोप मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय त्रास आहे त्यावरून अनेक औषधे उपलब्ध आहेत.पंचकर्मामध्ये सुद्धा झोपेवर थेरपी असते तर त्यामध्ये शिरोधारा हा एक उपाय आहे. पंचकर्माच्या वापराने व्यवस्थित करून घेतले तर चांगली झोप येण्यासाठी नक्कीच फायदा होतो. त्यामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म प्रक्रिया आहे ती फार महत्त्वाची आहे.

सगळ्या जगभरामध्ये झोप येण्यासाठी सध्याच्या काळामध्ये शिरोधारा ही पंचकर्म प्रक्रिया वापरली जाते आणि त्याचे परिणाम सुद्धा फार छान आहेत. तुम्ही गुगल वर सर्च केले तर शिरोधारा बद्दल उत्तम माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल आणि तुम्हाला शांत झोप येण्यासाठी हा उपाय योग्य ठरतो. शिरोधरा हा उपाय फक्त शांत झोप मिळवण्यासाठीच नाही तर मेंदूच्या विविध आजारांमध्ये किंवा मानसिक विकारांत मध्ये उपयोगी पडते तसेच शिरोधरा कोणी घ्यायला हवी? हा उपाय किती दिवसाचा असतो.? ही शिरोधारा नेमके झोप येण्यासाठी कशा पद्धतीने करतात? याचे फायदे काय आहे? या बद्दल ची सगळी माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

भगवान शिवशंकर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण महादेवाच्या मंदिरा मध्ये जातो तेव्हा आपल्याला महादेवाची पिंड मंदिरात दिसते आणि या पिंडीवर एक कायमस्वरूपी दुधाची धार सोडली जाते.महादेव रुद्र अवतार आहेत महादेवाच्या अंगी भावनांचा उद्रेक होतो, क्रोधाचा उद्रेक किंवा ज्वालामुखी होत असतो आणि त्याला शांत ठेवण्यासाठी त्या ठिकाणी पिंडीवर नेहमी जल सोडले जाते.

आपल्या मनामध्ये अनेक विचारचक्र प्रवाहित होत असतात म्हणजे विचार फिरत असतात आणि त्यामुळे कुठे ना कुठे झोप आपल्याला लागत नसते. तर विचारांची मालिका जी आहे ती कमी करण्यासाठी याचा उपयोग होत. शंकराच्या पिंडीवर दूध सोडले जाते तसंच माणसाला झोप लागत नाही तेव्हा त्याच्या मस्तकावर या ठिकाणी पाणी किंवा दुधाची धार सोडली जाते, याला आपण शिरोधारा म्हणतो.

दुधाची धार असेल ,काढाची धार असेल ,जशी तुमची प्रकृती असेल तुमचा आजार असेल त्याप्रमाणे ते औषध त्याच्या डोक्यावर धार म्हणून सोडले जाते. जेव्हा या धारी सोडल्या जातात त्यावेळी एक प्रकारे वाइब्रेशन या ठिकाणी आपल्या मेंदूच्या ठिकाणी व्हायब्रेशन सेट होतात आणि त्याच्या धारी आहे त्या मेंदुपर्यंत पोहचतात. मेंदू मध्ये एक हायपोथॅलॅमस नावाचा एक अवयव असतो.तो मेंदूच्या आत मध्ये असतो आणि हा हायपोथॅलॅमस नावाचा जो भाग आहे तो शरीरामध्ये जे काही हार्मोन सक्रिय करत असतो आणि आपल्याला शांत झोप लागते त्यानंतर आपला मूड फ्रेश राहतो.

अनेकदा ताण तणाव मुळे आपल्याला झोप नीट येत नाही किंवा काही मानसिक विकृती असतात त्यावेळी आपल्या मेंदूमध्ये ऑर्गन एक्टिवेशन जास्त झालेले असतात. या धारी मुळे ज्या लहरी आहेत त्या हळूहळू शांत व्हायला लागतात अशा पद्धतीने वैज्ञानिक कारण सुद्धा त्याच्या मागे आहे तसेच आयुर्वेदानुसार बघितले तर आयुर्वेद मध्ये शिरोधारा हे मेंदूच्या ठिकाणी किंवा शरीरात जो काही वातप्रकोप झालेला आहे ,वात वाढलेला आहे तो शांत करतात त्याप्रमाणे जर पित्त वाढले आहे असे वाटत असेल तर आपण दुधाचे किंवा काढ्याची बस्ती किंवा औषधांनी सिद्ध केलेल्या तेलाची बस्ती केले तरी त्याचा फायदा आपल्याला होतो. अशा पद्धतीने शिरोधारा हे वाताचे क्षमन करते आणि मेंदूला शांत करते. मेंदूचे नर्व्हस सिस्टीम आहे त्याचे काम सुरळीत करते.

लहान मुलांमध्ये काही आजार असतात त्याला आपण एचडी असे म्हणतो त्याच्यामध्ये लहान मुलं असतात त्यांचे कॉन्सन्ट्रेशन राहत नाही अशा वेळीसुद्धा लहान मुलांना शिरोधारा केली गेली तर त्याचा फायदा होतो बरेचसे आजार आहेत अशा मानसिक विकारांत मध्ये सुद्धा शिरोधारा मुळे आपल्याला चांगला फायदा होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *