पूजेचे नारळ जर खराब निघाले तर याचा अर्थ काय.? मनोकामना व इच्छा पूर्ण होईल की नाही.?

पूजेचे नारळ जर खराब निघाले तर याचा अर्थ काय.? मनोकामना व इच्छा पूर्ण होईल की नाही.?

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नारळ शिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही आणि प्रत्येक शुभकार्यात नारळाचा वापर केला जातो. नारळाला लक्ष्मी देवीचे प्रतीक सुद्धा मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये नारळाचे असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक पूजेमध्ये जर आपण नारळ ठेवले तर यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. जेव्हा कधी आपण एखाद्या तीर्थस्थानी जातो तेव्हा अशा वेळी आपण देवाच्या चरणी नारळ फोडतो व तो प्रसाद देवाला सुद्धा अर्पण करतो आपण सुद्धा स्वीकारतो.

नवरात्र मध्ये सुद्धा आपण देवी मातेला नैवेद्य म्हणून अनेकदा नारळ अर्पण करत असतो तसेच अनेक देवी देवता यांना एखादा नवस जेव्हा आपण अर्पण करत असतो किंवा पूर्ण करत असतो तेव्हा सुद्धा नारळ देवी देवता यांना चढवत असतो परंतु जेव्हा आपण एखादी देवपूजा करतो आणि अशा वेळी नारळ खराब निघाला तर आपल्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होत असतात.

मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. जर तुमच्या मनात सुद्धा असे विचार येत असतील व तुम्ही एखादी देवपूजा करत असताना नारळ फोडला असेल आणि तो नारळ जर खराब निघाला असेल तर चिंता अजिबात करू नका.आजच्या लेखामध्ये आम्ही अशाच एका नारळा बद्दल तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

अनेकदा आपण नारळ फोडले तर ते आतून खराब निघते आणि अश्या वेळी आपल्याला वाटते की आपल्यावर देवी-देवता नाराज झालेले आहे व यामुळे भविष्यात आपल्यावर काही तरी संकट ओढवणार आहे असे मनामध्ये नको नको विचार येत असतात परंतु असे काहीच नसते. जर तुम्ही देव पूजा केल्यानंतर जे नारळ फोडलेले आहे ते नारळ फोडल्या नेहमी वाईटच घडेल अशी शक्यता नसते.

जर आपण पूजा केल्यावर नारळ फोडल्यानंतर ते खराब निघाले तर याचा अर्थ शुभ मानले जाते म्हणजेच की तुमच्या जीवनामध्ये काही तरी चांगल्या गोष्टी घडणार आहेत असा सुद्धा याचा अर्थ मानला जातो. असे मानले जाते की जेव्हा असे घडते तेव्हा परमेश्वर आपल्याला काहीतरी चांगले संकेत प्राप्त करत असतात व सांगत असतात. हा चांगला संकेत आज आपण आपल्या लेखांमधून जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती नसतात त्या माहिती नसणाऱ्या गोष्टीबद्दल आपण मनामध्ये भ्रम निर्माण करतो आणि याच लहान सारी गोष्टी नंतर आपल्या मनामध्ये मोठे घर करून बसतात. जेव्हा पूजेचे नारळ खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचा सुद्धा राग येत असतो अशा वेळी आपण दुकानदाराशी भांडण करायला जातो परंतु तेव्हा दुकानदार आपल्याला सांगतो की नारळ खराब झाले याचा अर्थ तुम्हाला देव पावला आहे.

तेव्हा आपल्या काहीच लक्षात येत नाही दुकानदार असे का म्हणत आहे उलट आपल्याला राग जास्त येतो आणि आपण त्याच्याशी अजून भांडायला लागतो. जर भविष्यात तुमचे नारळ खराब निघाली तर तुम्हाला याचा राग येणार नाही कारण की जेव्हा नारळ फोडल्यावर आतून खराब होते याचा अर्थ असा की साक्षात परमेश्वराने आपला तो प्रसाद स्वीकारलेला आहे असा याचा अर्थ होतो.

जेव्हा नारळ आतून खराब होते याचा अर्थ संपूर्ण प्रसाद हा परमेश्वराने स्वीकारलेला आहे आणि तो उरलेला प्रसाद आपण कोणालाही देत नाही तसेच याचा अर्थ असा सुद्धा होतो की आपण जी काही मनामध्ये इच्छा निर्माण केलेली असते किंवा परमेश्वराला सांगितलेली असते काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. जर भविष्यामध्ये तुम्ही नारळ देवाला वाहिला वर ते नारळ जर आतून खराब निघाले तर तुम्ही चिंता अजिबात करू नका उलट शांत व प्रसन्न मनाने तो नैवेद्य स्वीकार करा.

भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये भगवंत आपल्या अनेक इच्छा पूर्ण करणार आहेत अशी सकारात्मक भावना मनामध्ये ठरवून जीवन आनंदाने व्यतीत करा. जर आपण नारळ फोडले अन त्यातून चांगले निघाल्यास अशावेळी ते नारळ व त्याचा जो प्रसाद स्वतः एकटे न खाता त्याचे बारीक बारीक तुकडे करून मंदिरातील सर्व सदस्यांना व घरातील सगळ्या सदस्यांना द्यावे यामुळे आपल्याला त्या पूजेचे पुण्य लाभते. आपल्यापैकी अनेक जण नारळ फोडल्यावर जो प्रसाद असतो तो इतरांना वाटत नाही स्वतः एकटे खात असतात अशा व्यक्तींना त्या पूजेचे पुण्य अजिबात लागत नाही म्हणून स्वार्थीपणा मनामध्ये न ठेवता आपली वस्तू इतरांना सुद्धा द्यायला हवी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *