हे महत्वाचे 9 संकेत सांगतात कि तुम्ही लवकरच धनवान होणार आहेत; पहा काय आहेत ते संकेत.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शकुन शास्त्रात सांगितलेले काही संकेत जाणून घेणार आहोत. या शुभ शास्त्रामुळे तुम्हाला भविष्यात धन लाभ ,पैसा लाभ होणार आहे. शकुन शास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तसेच आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे अभ्यास तसेच विचार करून शकुन शात्रात सांगितले जाते.
आज आपण जे काही संकेत जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला भविष्यात धन प्राप्ती तसेच माता महालक्ष्मी यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होणार आहे .चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल शकुन शास्त्रानुसार पैश्याची देवाण घेवाण करताना तुमच्या हातून काही धन किंवा पैसा हाती पडला त्यात नाणी,नोट किंवा काही जर हातातुन पडल्यास तर हा शुभ संकेत समजला जातो.
आणि भविष्यात तुम्हाला धन लाभ सुद्धा होऊ शकतो. पैश्याशी संबंधित एखादे महत्वाचे काम जर करण्यासाठी तुम्ही बाहेर पडता जेव्हा तुम्हाला पिवळ्या रंगाच्या वस्त्रमध्ये एखादी सुंदर कपडे परिधान केलेली महिला दिसल्यास हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो. शकुन शास्त्रानुसार गुरुवारी एखादी अविवाहित कन्या म्हणजेच कुमारिका पिवळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला समोर दिसल्यास हा सुद्धा धनलाभाचा शुभ संकेत आहे.
शकुन शास्त्रानुसार जर तुमच्या तळ हाताला सातत्याने खाज सुटत असेल तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणत धन लाभाचा सुभ संकेत मानला जातो. शुक्रवारी जर केशरी रंगाची गाय जर तुम्हाला नजरेस पडली तर हा सुद्धा अचानक कोठून ना कोठून धन प्राप्ती चा योग निर्माण करतो. हे शास्त्र असतात ते खूपच गुंतागुंतीचे असतात म्हणून यांचा अभ्यास करणे काही वेळा गरजेचे ठरते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती हिऱ्यांचा हार ,मुकुट किंवा मुंगा दिसल्यास अश्या व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी कायमची वास करते. स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने चावा घेतल्यास तर हा सुद्ध धन प्राप्तीचा मोठा योग असतो. जर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतः चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारसा हक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते.
स्वप्नामध्ये पिकलेली संत्री पाहणे किंवा पिवळसर रंगाचा गहू दिसणे, गव्हाचे पीक दिसणे हे सुद्धा अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचे लक्षण असते.रस्त्याने जाताना एखाद्या मुंगूस ने जर तुमचा रास्ता ओलांडला तर हा सुद्धा खूप मोठा धन प्राप्तीचा संकेत शगून शास्त्राने मानला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.