रात्री झोपताना बोला हा १ मंत्र; मनातील कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.!

रात्री झोपताना बोला हा १ मंत्र; मनातील कोणतीही इच्छा ताबडतोब होईल पूर्ण.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत ,जो मनुष्य जीवनातील सर्वात मोठ्या मोठ्या समस्या दूर करतो. या समस्यांमधून आपल्याला मुक्ती प्रदान करतो. एखादी आपले अनेक वर्षापासून अतृप्त आहे. आपल्याला मनोमन वाटते की तिची इच्छा पूर्ण व्हावी मात्र ती गोष्ट पूर्ण होत नाही ती इच्छा आपले अपूर्ण आहे. अशावेळी त्या इच्छेची पूर्तता होण्यासाठी रात्री झोपताना या मंत्राचा अवश्य जप करा. तुम्हाला इतका वेळ मिळेल त्यावेळी नुसार तुम्ही या मंत्राचा आवश्यक जप करा. हा मंत्र चामुंडा देवी यांचा मंत्र आहे.

या मंत्राला जोड म्हणून आपण भगवान शिव शंकराचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणार आहोत. शिवशक्ती यांना आवाहन करत असतो तेव्हा त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनातील ज्या काही समस्या असतात त्या शिघ्र नष्ट होऊन जातात आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपले जीवन सुखमय आनंदमय होऊन जाते म्हणूनच शिवशक्ती यांच्या एकत्रित येण्यामुळे तुमच्या ज्या काही अपूर्ण इच्छा असतील त्या सर्व त्वरित पूर्ण होतील. हा मंत्र कोणता आहे.? या मंत्राचा विधी कोणत्या आहेत? हे सर्व आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…

हा जो मंत्र आहे तो आपल्याला रात्री करायचा आहे. मात्र त्या मंत्राचा जप करण्यास जर आपण सोमवारपासून सुरुवात केली तर अतिउत्तम आहेत. जर सोमवारी हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही वारी या मंत्राचा जप करण्यास सुरुवात करू शकतात. ज्या दिवशी तुम्ही हा मंत्र जप करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठा. स्नान विधी करा. स्वच्छ कपडे परिधान करा आणि जवळपासच्या शंकराच्या मंदिरात जा.

त्याला नेहमी शंकराच्या मंदिरात जायची गरज नाही फक्त आपण ज्या दिवशी या मंत्र जपायला सुरुवात करून त्याच दिवशी आपल्याला शंकराच्या मंदिरात जायचे आहे शंकराच्या मंदिरात विधीवत पूजा केल्यानंतर शंकराच्या पिंडीवर एक तांब्या जल अर्पण करायचे आहे परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या की, हे जर आपल्याला आपल्या घरातूनच घेऊन जायचे आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने जप करा. त्यानंतर महादेवांना अगरबत्ती, फुले ,नैवेद्य दाखवा आणि महादेवांना मनोभावे हात जोडून प्रार्थना करा की हे महादेवा आज पासून आम्ही चामुंडा देवी आणि तुमच्या मंत्र जपाचा प्रारंभ करत आहोत.

त्याचबरोबर आपल्या कृपेने व श्री चामुंदा देवी तसेच विश्वातील स्त्रीशक्तीच्या कृपेने आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट होऊन आमच्या सर्व इच्छा मनोभावे पूर्ण करा अशी मनोभावे इच्छा संकल्प व्यक्त करायचा आहे आणि माथा टेकून आपल्या घरी पुन्हा परत यायचे आहे. महादेव हे अतिशय भोळे आहेत. तुम्ही त्यांना काही न देता जरी त्यांची मनोभावे प्रार्थना करून पूजा केली तरी तुमच्या सर्व इच्छा महादेव पूर्ण करतील.

आणि त्या दिवशी रात्री झोपताना हात स्वच्छ करून आपण एक आसन अंथरायचे आहे आणि त्या वरती बसायचे आहे. तुम्ही पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसू शकता. त्यानंतर आपल्याला १०८ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम ए ऱ्हीम क्लीम चामुंडा य विच्चे ओम नमः शिवाय” हा मंत्र श्री चामुंडा देवी आणि महादेव यांचा एकत्रित असा मंत्र आहे याचाच अर्थ असा की आपण देवी व महादेव यांना आवाहन करत आहोत.

या मंत्राचा जप करण्यापूर्वी दोन गोष्टी अवश्य करा त्यामुळे तुम्हाला या मंत्राचा प्रभाव जास्त जाणवेल त्या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा शंकराच्या मंदिरात नक्की जा. सोमवारच्या दिवशी महादेव यांचे दर्शन अवश्य घ्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणते गुरु केले असेल त्यांना स्मरण करा असे केल्याने तुम्हाला या उपायाचे फळ निश्चित चांगले मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *