मासिक पाळी वेळेवर येत नाहीय..? तर हे घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महिलांना मासिक पाळी नियमित न येणे, मासिक पाळीत बरेचसे त्रास होणे, पॉट दुखणे, कंबर दुखणे, पाय दुखणे हे तरी सर्वांसाठी सामान्यच आहे. पण Periods नियमित येणे हे महिलांसाठी खूप गरजेचे आहे. याचसाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
मासिक पाळी नियमित येणे हे प्रत्येक महिलांसाठी महत्वाचे असते. काही महिलांना मासिक पाळी दर महिन्याला अगदी वेळेवर येते तर काही जणींना कित्तेक वेळी येताच नाही. पाळी अनियमित होण्याचे अनेक कारणे आहेत.
मासिक पाळी सुरु होण्याचा काळ, प्रजननशम वयातील अनियमित पाळी, पीसीओडी, थायरॉईड डिसऑर्डर, स्थूलत्व,किंवा चाळीशी नंतरची अनियमित पाळी अशी अनेक कारणे आहेत. पण या व्यतिरिक्त आपली सध्याची जीवशैली हि कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहेचं पण त्या व्यतिरिक्त घरघुती उपाय हि तुम्हाला उपयोगी पडू शकतात.
एक कप पाण्यात एक इंच आलं किसून ५ मिनिट उकळवा. थोडंसं मध मिसळा आणि दिवसातून ३ वेळा हे मिश्रण पिया. याने Periods नियमित येण्यास मदत होईल. तसेच पाळी दरम्यान होणार पॉट दुखीचा त्रास देखील कमी होईल.
चमचे बडीशेप एक ग्लास पाण्यात मिसळा आणि ते रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून पिया. हे नियमित केल्यास Periods व्यवस्थित येईल. तसेच एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी टाकून ते काही आठवडे पिया.
फळे आणि भाज्यांचा रस, शरीरात पोषण तत्वांचा अभाव असणे हे पाळी अनियमित असण्याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे फळ आणि भाज्यांचा रस योग्य पोषण तत्व आणि जीवनसत्वांसाठी उपयोगी आहेत. याने पाळी हि नियमित येते.
गाजर आणि द्राक्षाचा जूस मुख्यत्व घ्यावा. पाळी दरम्यान पोटदुखीचा त्रास कमी करण्यासाठी खूप महिला उष्णतेचा आधार घेतात. हॉट वॉटर बॅग किंवा जाड टॉवेल गरम पाण्यात भिजवून ते पोट आणि पाठीवर ठेवल्यास बराच आराम मिळतो.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.