सकाळी उठल्यावर ही 3 काम केलात तर आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळवता येईल..!

सकाळी उठल्यावर ही 3 काम केलात तर आयुष्यात तुम्हाला हवं ते मिळवता येईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर स्वागत आहे. सकाळी उठतातच सर्वजण काय करतात.? तर पहिला मोबाईल चेक करतात पुढे काय काम आहेत याचा विचार करून ती पूर्ण करण्यासाठी धावपळ करतात. काहीजण अगदी निवांतपणे अंघोळ करून टीव्ही बघण्यात मग्न होतात. मोबाईल, टीव्ही ,टाईमपास  या सर्व प्रकारामुळे फायदा नाही तर नुकसान होते.

सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा तुम्ही फ्रेश असता, फ्रेश असता ते मनाने व मेंदूने. जरी डोळ्यात जराशी झोप शिल्लक असली तरी तुमचे शरीर विश्रांती करून पुन्हा चार्ज झालेली असते. शरीराप्रमाणे तुमचा मेंदू सुद्धा ऍक्टिव्ह झालेला असतो. त्यामुळे सकाळी उठून तुम्ही जे काही कराल त्याचा परीणाम तुम्हाला दिवसभर दिसतो.

ज्या लोकांची सकाळ टीव्ही, मोबाईल, आणि वायफळ टेन्शन ने होते त्यांना दिवस मध्यम किंवा खराब जातो. कामामध्ये मन लागत नाही, काही तासांमध्येच दिवस कंटाळवाणा वाटू लागतो तसेच पूर्ण दिवस वाया गेल्यासारखे वाटू लागते. म्हणून सकाळी जाग आल्यावर शांतपणे उठून बसा. विनाकारण उठतातच कामाचा विचार न करता तुम्हाला मिळालेल्या चांगल्या गोष्टींचा विचार करा. मनामध्ये तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करा.

मला आनंद वाटतो कारण माझ्याकडे प्रेमळ कुटुंब आहे, चांगली नोकरी आहे, सुखी संसार आहे. काही जीवनातील सुखद क्षण आठवा ज्यामुळे तुमची दिवसाची सुरवात आनंदाने होईल. या कामासाठी फक्त ५ मिनिटे वेळ द्या त्यानंतरची ५ मिनिटे तुमच्या मेंदूसाठी द्या. तुमचं ध्येय स्वप्न पूर्ण झाल्याची जाणीव मनाला करून द्या.

जे स्वप्न होत ते पूर्ण झालं आहे याचा आनंद तुम्ही घेताय सर्वकाही तुम्ही कमवला आहे ज्यामुळे सर्वात आनंदी व्यक्ती तुम्ही बनलेला आहात अशी कल्पना ५ मिनिटे करायला तुम्ही सुरुवात करा ज्यामुळे तुमचा माईंड पॉसिटीव्हली ऍक्टिव्ह होतो तसेच दररोज तो विचार केल्याने माईंड त्याचा पॅटर्न बनवायला सुरुवात करतो. आणि हाच पॅटर्न त्याच काम करायला तुमच्या मेंदूला प्रवृत्त करतो म्हणून दिवसाची पहिली १० मिनिटे खूप महत्वाची असतात. त्यानंतर मात्र तुम्ही तुमचा मोबाईल चेक करू शकता. महत्वाचा ई-मेल,कॉल तुम्ही करू शकता.

त्यानंतर मात्र मेडिटेशन करायला हवं. फक्त १५ मिनिटे शांतपणे मेडिटेशन करा ज्यामुळे तुमचा चंचल स्वभाव शांत होईल. विनाकारण घोंगावणारे नकारात्मक विचार नियंत्रणात येतील. म्हणून मेडिटेशन करून शारीरिक व मानसिक दृष्टीने सुदृढ बनायला सुरुवात करा. त्यांनतर १० मिनिटे व्यायामही करू शकता, व्यायाम करायला जिम ला जावंच अशी काही गरज नसते.

जिम ला जाणे शक्य नसेल तर घरीच दोरी उड्या ,सूर्यनमस्कार अशा गोष्टी करू शकता. अशाप्रकारे ४० ते ४५ मिनिटांमध्ये दिवसाची सुरुवात सुंदर करू शकता ज्यामुळे दिवस तर चांगला बनेलच सोबत तुमचं आयुष्य सुद्धा सुंदर बनेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *