महाशिवरात्री सण साजरा करण्यामागचं खरं कारण वाचून तुम्हालाही आच्छर्य वाटेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हिंदू बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो म्हणजे महाशिवरात्री. महाशिवरात्री हा उत्सव माघ कृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो. इंग्रजी महिन्यानुसार हा सण बहुदा फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात येतो. मित्रांनो सर्व देवांमध्ये भगवान शिवाचे महत्व अत्याधिक असून हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात. आम्ही तुम्हाला आज महाशिवरात्रीची थोडक्यात माहिती सांगणार आहोत.

srisatchmo

मित्रांनो ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्याच सृष्टीशी निगडित सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती. आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवालाच होती. त्यामुळे त्यांनी हे विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचविले. पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत गेला. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितलं. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन, नृत्याची व्यवस्था केली. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमणमध्ये सृष्टी वाचली, म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते. अंगाचा होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी त्या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते.

thenorthlines

महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवांचे शिवलीलामृत,महारुद्र,भजन ,गायन इत्यांदींचे आयोजन केले जाते. भगवान शिवांचे दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना केली जाते. शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते. १२ ज्योतिलिंग ज्या ज्या ठिकाणी आहेत तेथे लाखो भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्यासाठी जमा होतात. भगवान शिवांचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तिथे मोठमोठ्या यात्रा भरतात. शिवशंकराला १०८ बेल वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटे धोत्राचे फुल भगवान शंकराला वाहण्याचे देखील पद्धत आहे. विदर्भात आजच्या दिवशी घोंगलाचे फुल शिवाला वाहण्याची परंपरा आहे. शिवकृपा प्राप्त होण्यासाठी “ओम नमः शिवाय “हा जप जास्तीत जास्त करावा. भगवान शिवाला भोळा शंकर देखील म्हटलेले आहे. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे.

webdunia

शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती कथा अशी आहे कि, एक पारधी जंगलात सावज शोधण्यासाठी झाडावर बसला होता. संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडला नाही. सायंकाळी हरणाचा एक कळप तेथे पाणी पिण्यासाठी आला. पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरीण पुढे येऊन पारध्याला म्हणाली

“तू आता आमचा शिकार करणार हे अटळ आहे. पण  मी एक विनंती करतो कि मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येउदे, माझी कर्तव्य मला पार पडून येउदे. “

हरणाचे वचन दिल्याने पारध्याने त्याची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातून घंट्यांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय कानावर येत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा व्हावा म्हणून तो एक एक पण खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिव पिंडीवर ती पानं पडत होती. नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले कि आता मला मार. मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले त्यांना नको मला मार मला माझ्या पत्नी धर्माचे कर्तव्य पार पडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिल्ले पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडूदेत. ते पाहता पारध्याच्या मनात विचार आला हे प्राणिमात्र असून देखील आपल्या कर्तव्याला चुकत नाहीत तर मी  मानवधर्म,दयाधर्म का सोडू? त्याने सर्वांना जीवदान दिले. देवाधिदेव महादेव हे सर्व  हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्या सर्वांना कृपाआशीर्वाद दिला, सर्वांचा उद्धार केला. हरीनाला मृगनक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याग्रनक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता.

तर मित्रांनो ज्या प्रचलित २ कथा आहेत त्या अशा कथा आहेत. तुम्हाला या कथा आणि महाशिवरात्रीची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि हि माहिती आवडली असेल तर सगळीकडे शेअर करायला विसरू नका. 

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *