नागराज मंजुळे काढणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक चित्रपट! बाहुबली ला पण टक्कर देणार.!

Shivtrayi

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. खास शिवजयंती निमित्तानं नागराज मंजुळे यांनी हि बातमी आपल्या चाहत्यांना आणि शिवप्रेमींना दिली आहे. “शिवत्रयी “असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. शिवत्रयी नावावरून हा केवळ चित्रपटच नसून ३ चित्रपटांची सिरीज असणार आहे. शिवाजी,राजा शिवाजी,छत्रपती शिवाजी  अशी या चित्रपटांची नाव असणार आहेत.

नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा पहिला ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि सर्वत्र त्याची चर्चा आहे.

एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित 

असं कॅप्शन देऊन नागराज मंजुळे यांनी चित्रपटाचा टीजर शेअर केला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख छत्रपती महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती. शिवत्रयी या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे तर निर्माता सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल आहेत.

२०२१ मध्ये शिवत्रयी सिरीज मधील पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता सर्व छाट्यांमध्ये या चित्रपटाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर चित्रपट पाहण्यासाठी  तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हि माहिती आवडल्यास सगळीकडे शेअर करायला नक्की विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *