चिकन खाल्ल्याने खरंच कोरोना व्हायरस ची लागण होते का? जाणून घ्या यामागील खरं सत्य..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो चिकन,अंडी,मासे आणि मटण अस्सल मांसाहारी लोकांचा रविवारी सार्थकी लागत नाही. गेल्या काही दिवसांत चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस ची लागण होते अशी अफवा पसरली आहे आणि त्यामुळे अनेकांचा रविवारचा प्लॅन बारगळलाय. सोशल मीडियावरच्या या अफवेमुळे महाराष्ट्रातल्या पोल्ट्री उद्योगालाही मोठा फटका बसलेला आहे. पण खरंच चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस ची लागण होते का हेच आपण आज जाणून घेणार आहोत. मुळात हि अफवा कशामुळे पसरली? कोरोना व्हायरस चा प्राण्यांशी काय संबंध आहे?

litehousefoods

तर कोरोना विषाणूंमुळे होणारा कोबीड नाईंटीन हा प्राणिजन्य रोग आहे अर्थात झुनोटिक डीसीस आहे. चीनच्या वुहान शहरातल्या एका मटण विक्री करणाऱ्या बाजारपेठेतून त्याचा प्रसार झाल्याचं प्राथमिक संशोषणामध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे चिकन किंवा मटण खाल्लं तर आपल्याला देखील तो आजार होईल अशी भीती अनेकांना वाटते आहे. पण त्यात काही तथ्यं नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कोरोना व्हायरस मुले होणार कोबीड नाईंटीन हा श्वसनाचा आजार आहे, तो संसर्गजन्य आहे. लागण झालेल्या एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये तो संक्रमित होऊ शकतो. पण चिकन पासून व कुठल्या अन्य प्राण्यापासून तो थेट मानवामध्ये संक्रमित होत असल्याचं अजूनपर्यंत संशोधनात दिसून आलेलं नाहीय. पण तरीही या अफवेमुळे देशभरात आणि राज्यातही चिकन च्या विक्रीमध्ये मोठी घट झालेली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार देशभरामध्ये गेल्या ३ आठवड्यात १३०० कोटींचं नुकसान पोल्ट्री उद्योगाला सहन करावं लागलंय. तर महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाला २० दिवसात तब्बल १०० ते १२० कोटींचं नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

biospectrumindia

आता लोकांनी चिकन खाणं सोडलं तर त्यामुळे काय फरक पडतो? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण फरक पडतो, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुकूटपालनाचा व्यवसाय करतात. तसेच कोंबड्यांच खाद्य बनवण्यासाठी आवश्यक असलेलं सोयाबीन आणि मक्याचं उप्तादनही राज्यात घेतलं जात. म्हणजे चिकनची विक्री कमी झाली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि पोल्ट्री उद्योगाच्या रोजगारावर त्याचा थेट परिणाम होतो याकडेही पशुसंवर्धनाने लक्ष वेधलयं.

● चिकन खाताना कोणती काळजी घ्यावी..?

खबरदारी म्हणून एरवीसुद्धा चिकन,अंडी किंवा कुठलंही मांस हे शक्यतो पूर्ण शिजवून खावं ते कच्च कधीही खाऊ नये असं तज्ज्ञांनी म्हटलंय. त्याचबरोबर शाकाहारी व्यक्तींना सुद्धा त्यांनी फळ आणि पालेभाज्या व्यवस्थित धुवून खा असा सल्ला दिलाय. इंडियन असोशियन चे महाराष्ट्रातले अध्यक्ष डॉक्टर अविनाश सांगतात कि ५५ डिग्री सेल्सिअस वरती अन्न शिजवलं तर त्यात कुठलाही विषाणू शिल्लक राहत नाही. त्यामुळे बाहेर हॉटेलमध्ये जेवताना चिकन किंवा मटण नीट शिजलं आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी असा सल्ला सुद्धा ते देतात. महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ची लागण झाल्याचं एकही प्रकरण अजून समोर आलेलं नाहीय. पण तरीही थोडी खबरदारी घ्यायला काहीही हरकत नाहीय.
म्हणून आजारी असाल तर थोडी काळजी घ्या, चिकन खात असाल तर ते नीट शिजवून खा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याच अफवांवरती विश्वास ठेऊ नका. सोशल मीडियावरती असा मेसेज फिरत असेल तर त्यांवरती विश्वास ठेऊ नका. आणि हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *