घरात रोज इथे ठेवा १ पान आणि सुपारी; घरातील गरिबी दूर जाऊन होईल प्रचंड धनलाभ.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. घरामध्ये ठेवा एक पान व एक सुपारी मग ते पान खाण्याचे पान असू द्या किंवा आंब्याचे पान सुद्धा चालेल. एक सुपारी आपल्याला घरातील एका जागेवर ठेवायचे आहे, असे केल्याने तुमचे नशीब बदलून जाईल. तुम्ही विचारही केला नसेल एवढं तुमच्याकडे आकर्षित होईल. कोणतेही कार्य असो मग अशावेळी आपण पानसुपारी यांचा वापर आवश्यक करत असतो त्याचबरोबर तंत्रमंत्र शास्त्रांमध्ये, वास्तुशास्त्रामध्ये पानसुपारी यांना खूप मोठे महत्त्व आहे.
आपल्याला देव पूजा करताना एक विड्याचे पानं घ्यायचे आहे . जर तुमच्याकडे विड्याचे पानं नसेल तर अशावेळी आंब्याचे पान सुद्धा तुम्ही घेऊ शकता व एक सुपारी आपल्याला घ्यायची आहे आणि देव्हाऱ्यावरती आपल्याला हे सर्व सामग्री ठेवायचे आहे त्याचबरोबर हळदी, कुंकू ,अक्षता , फुले वाहून व त्याची रोज पुजा सुद्धा आपल्याला करायचे आहे तसेच रोज फूल अर्पण करायचे आहे व साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचे आशीर्वाद घ्यायचे आहे.
आपल्या ज्या काही इच्छा , मनोकामना आहे त्या सर्व पान-सुपारी यांच्याकडे व्यक्त करायचे आहेत जसे की समजा हे परमेश्वरा तुमच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू दे … आमच्यावर जे काही संकट कोसळले आहे ते तुझ्या आशीर्वादाने लवकर नष्ट होऊन जाऊदे आणि तुझा खूप आशीर्वाद आमच्यावर राहू दे, अशा पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे.
रोज देवपूजा करत असताना आपल्याला एक पान व एक सुपारी ठेवून आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत. हा पानसुपारीचा उपाय करत असतांना आपल्याला माता महालक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे तसेच माता महालक्ष्मी चे स्मरण सुद्धा आवश्य करायचे आहेत. हा मंत्र अगदी साधा आणि सोपा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे “ओम नमो श्री माता महालक्ष्मी नमो नमः”
अशा पद्धतीने आपल्याला या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. अतिशय साधा आणि सोपा सरळ उपाय असल्याने तुम्ही जरूर करा आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही धन संबंधित समस्या आहेत त्या समस्येवर तोटका म्हणून हा उपाय मनोभावे व श्रद्धेने जरूर करा त्याचे फळ तुम्हाला नक्की चांगले प्राप्त होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.