कांद्याच्या सालीचा करा असा वापर; त्याचे होणारे चत्मकारिक फायदे बघून तुम्हीसुद्धा दंग व्हाल.!

कांद्याच्या सालीचा करा असा वापर; त्याचे होणारे चत्मकारिक फायदे बघून तुम्हीसुद्धा दंग व्हाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक घरामध्ये कांदा वापरल्यानंतर त्याचा पालापाचोळा सालपट आपण टाकून देतो पण हा हा लेख वाचल्यानंतर आपण तसे करणार नाही कारण याचे खूप फायदे आहेत आणि या सालचे फायदे कोणते आहेत? त्याचा वापर कसा करावा? कशासाठी करावा? या विषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी साधारणपणे दोन ते तीन कांद्याचे सालपट आणि पालापाचोळा आपल्या या ठिकाणी लागणार आहे. पोहे, खिचडी ,भजे इत्यादींसाठी आपण कांदे नक्कीच वापरतो तर अशा वेळी या कांद्याची साल आणि पाचोळा एकत्र करून तो स्वच्छ धुऊन आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच यावरील धूळ माती पूर्णपणे निघून जाईल.

या ठिकाणी दोन ते तीन कांद्याची सालपट आणि पालापाचोळा आपण या ठिकाणी घुवून घेणार आहोत. आता एक ग्लास पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे. या गरम केलेल्या पाण्याने धुतलेली सालपट आपल्याला या मध्ये टाकायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायची आहे.

साधारणपणे एक ग्लास पाण्याचे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचे आहे. या ठिकाणी पाण्याचा रंग देखील बदलेल आणि हे पाणी देखील चांगल्या प्रकारे उकळल्यवर आता आपण गॅस बंद करू शकतो आणि हे पाणी गाळून तयार झालेले पाणी थंड झाल्यानंतर कापसाच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपल्याला आपल्या पूर्ण केसांना लावायचे आहे.

केसांच्या मुळापासून ते केसांच्या शेवट पर्यंत पूर्ण हे पाणी हे तेल सारखे लावल्याप्रमाणे आपल्याला लावायचे आहे यामुळे आपले अकाली पांढरे होणारे केस काळे होण्यास मदत होणार तसेच केसातील कोंडा नाहीसा होईल आणि महत्त्वाचे म्हणजे केस गळती थांबण्यासाठी देखील याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो ,असा हा उपाय आपल्याला साधारणपणे एक महिना करायचा आहे.

त्यानंतर आता आपण जाणून घेऊया या पाण्याचा दुसरा उपाय. हे पाणी आपण ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात माशा किंवा पाल येतात त्या ठिकाणी देखील स्प्रे मध्ये भरून त्या ठिकाणी आपण स्प्रे मारू शकतो. कांद्याच्या उग्र वासाने हे कीटक आपल्या घरातून बाहेर जाण्यास मदत होते तसेच आपल्या घरात कांदे आणि लसुण जर साठवणुकीचे म्हणजेच जास्त प्रमाणात असतील तर यातील फक्त पाचोळा वेगळा करून त्यामध्ये कडुलिंबाची पाने एकत्र करून बाजूला ठेवावी आणि रोज रात्री मूठभर हा पालापाचोळा चा आपल्या घरामध्ये याचा धूर करावा.

यामुळे माशा मच्छर आणि पाल आपल्या घरातून बाहेर जाण्यास मदत होते आणि महत्त्वाचे म्हणजे घरातील लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना देखील याचा त्रास होत नाही शिवाय आपल्या पैशाची देखील बचत होते. आपल्या घरात शोची झाडे असतील किंवा फुल झाडे असतील तर यावर पडलेली कीड देखील कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो यासाठी साधारणपणे मूठभर हा पालापाचोळा पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. हे साधारणपणे दोन दिवस आणि त्यानंतर हे पाणी स्प्रेमध्ये घेऊन त्या झाडांवर आपल्याला फवारणी करायची आहे.

म्हणजेच स्प्रे मारायचा आहे यामुळे झाडावरील कीड कमी होण्यास मदत होते आणि ज्या झाडांना फुलं जास्त प्रमाणात येत नाही, त्या झाडांना फुले देखील जास्त प्रमाणात येतात म्हणजेच ही झाडे चांगल्या प्रकारे बहरतात आणि फुले ही जास्त प्रमाणात येतात.हे आहेत या टाकाऊ पदार्थांचे म्हणजेच कांद्याच्या पालापाचोळ्याचे चे घरगुती फायदे अशाप्रकारे काहीही खर्च न करता हे घरगुती उपाय करा आणि आपल्या अनेक समस्या दूर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *