झोप येत नसेल तर करा हा चत्मकारी उपाय; झोपेच्या गोळ्या घ्यायची गरजच पडणार नाही.!

झोप येत नसेल तर करा हा चत्मकारी उपाय; झोपेच्या गोळ्या घ्यायची गरजच पडणार नाही.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच लोकांना झोप लागत नाही.अनेकांना कामामुळे रात्र-रात्र जागे राहावे लागते, झोपायला गेले तरी झोप लागत नाही. अनेकांना निद्रानाशाची समस्या सतावत असते आणि अनेक जण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतात परंतु या सर्व उपायांचा आपल्याला हवा तसा काही परिणाम जाणवत नाही आणि अनेक औषधे करून सुद्धा आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही असे घरगुती व आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले उपाय सांगणार आहोत.

हे उपाय अतिशय साधे सोपे पण तेवढेच प्रभावी आहेत. जर आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये झोप मिळाली तर आपले शरीर मजबूत राहते. आपल्या शरीरातील रक्त पेशी व मांस पेशी चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतात व आपल्या शरीराला नेहमी तरतरी प्राप्त होते.आपण जे कार्य करतो ते कार्य पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो जर आपली झोप पुर्ण झाली नसेल तर आपले शरीराला नेहमी अशक्तपणा जाणवत असतो आणि आपण जे काम हाती घेत होते काम पूर्णपणे व्यवस्थित होत नाही त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात.

अनेकदा आपल्याला झोप येत नसेल तर त्यासाठी पित्त, वात, संधिवात सुद्धा कारणीभूत ठरतो.अनेकदा आपण धावपळीच्या जीवनामध्ये जगत असताना अनेक जण आपल्या जेवणाची वेळ व आहाराकडे दुर्लक्ष करत असतात आणि कधीही जेवण करत असल्यामुळे आपल्या शरीरात ऍसिडिटी पित्त यासारख्या समस्या उद्भवू लागतात त्याचबरोबर अनेक जण दुपारी एक ते दोन तास झोपतात सहजपणे असे केल्याने रात्री झोप येणार नाही म्हणूनच आपल्याला दुपारी झोपायचे नाही.

त्याचबरोबर अनेक लोक आहेत त्यांना काही केल्या रात्री झोप लागत नाही अशा वेळी जर आपण एक ग्लासभर म्हशीचे दूध झोपण्याआधी प्यायले तर आपल्याला झोप शांत लागते कारण की म्हशीच्या दुधामध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे आपल्याला शरीराला पौष्टिक घटक प्राप्त करून देण्यास मदत करत असतात आणि यामुळे दिवसभर जे आपण कष्ट केलेले असते त्यामुळे आपल्या शरीराला थकवा येतो आणि रात्री शांतपणे झोप लागते त्याचबरोबर रात्री झोपताना आपण आपल्या तळहातांना थोडेसे तूप लावले व तळ पायांना थोडेसे तूप लावले तर रात्री झोप सुद्धा आपल्याला शांत लागते.

त्याच बरोबर रात्री झोपताना आपल्या दोन्ही नाकपुड्या मध्ये साजूक तुपाचे दोन दोन थेंब टाकून झोपल्याने आपली झोप पूर्णपणे चांगली होती त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये झोप लागण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे अश्वगंधा चूर्ण ,ब्राह्मणी चूर्ण आणि शतावरी चूर्ण हे तिन्ही चूर्ण एकत्र करून एक ग्लासभर दूध मध्ये हे मिश्रण आपल्याला टाकायचे आहे आणि रात्री झोपताना प्यायचे आहे, अशा पद्धतीने जर आपण आठ दिवस हा उपाय केला तर आपल्या झोपेच्या संदर्भात ज्या काही समस्या असेल त्या पूर्णपणे दूर होणार आहे आणि तुम्हाला हा उपाय केल्याने शांत झोप सुद्धा लागणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *