मुतखड्याचा होईल भुगा., ल घवीची जळजळ थांबेल; वापरा या वनस्पतीची फक्त ३ पाने..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरंतर सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाही. बदललेली जीवनशैली, बदललेला आहार या सगळ्यांमुळे कुठे ना कुठे शरीराला हानी पोहोचत असते, त्याचबरोबर शरीरात पाण्याची कमतरता सुद्धा निर्माण होते. परिणामी शरीरांमध्ये खडे निर्माण होऊ लागतात यालाच आपण मुतखडा असे म्हणतो.
सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला मुतखड्याची लक्षणे जाणवत नाही पण जसजसा मुतखडा मोठा होऊ लागतो तसा शरीरावर परिणाम सुद्धा जाणवू लागतो म्हणूनच आज आपण आपटा या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत. आपट्याला हिंदीत कठमुली असे म्हणतात.आपट्याचे झाड संपूर्ण भारतभर आढळतात. फेब्रुवारी दरम्यान आपट्याला फळ आणि फुले येत असतात. १०ते २०फूट लांबी ने वाढणाऱ्या या झाडाला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये विशेष महत्व प्राप्त आहे.
दसऱ्याला याच झाडाची पाने पूजेला वापरली जातात. या झाडाला जसे अध्यात्मिक महत्व आहे त्याचप्रमाणे औषधी महत्व सुद्धा आहे. हेच आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..
मूतखडा बाहेर काढतो
आपट्याची पाने, शेंगा बिया फुले व झाडांची साल औषध कार्यात वापरले जातात. आपट्याला संस्कृत मध्ये अशमंतक असे नाव आहे. याचा अर्थ किडणीतील मूतखडा वितळविण्यासाठी आणि मूत्रावाटे बाहेर काढण्यासाठी या आपट्याच्या पानांचा वापर केला जातो.
यासाठी आपट्याची ताजी पाने बारीक वाटून या पानांचा रस दुधासोबत किंवा पानांचा काढा प्यायल्याने दोन ते तीन दिवसात मूतखडा ल घवी द्वारे बाहेर पडतो.
शरीरातील रक्त करते शुद्ध
आपल्या शरीरात रक्ताचे संचार होणे गरजेचे असते म्हणून निरोगी आयुष्यासाठी रक्तभिसरण योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. बहुतेक वेळा शरीरातील रक्त शुद्ध नसल्यामुळे अंगावर लाल चट्टे ,सुजन,पुरळ येत असते. यापासून वाचण्यासाठी आपट्याची पाने महत्त्वाची भूमिका बजावतात.
डोके दुखी करते दूर
तापामुळे डोके दुखत असल्यास आपट्यांच्या पानाचा लेप मस्तकी लावा असे केल्याने ताप लवकरच कमी होईल.
मुळव्याधाचा असहाय्य वेदना करतो दूर
मुळव्याध वेदना दूर करण्यासाठी आपट्यांच्या पानांचा काढा बनवून तो एका भांड्यात ओतून याचा गरम शेक घेतल्यास मुळव्याधी पासून लवकरच आराम मिळतो. जुन्या जखमा बऱ्या होत नसतील तर आपट्याच्या पानांचा काढा थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध टाकून प्यायल्याने लवकरच जुन्या जखमा भरू लागतात. विंचु चावल्यावर कापडाची छोटी फांदी विंचु चावल्यावर ठिकाणापासून खाली नेल्याने विंचू दंश झालेला परिणाम कमी होतो.
पोटदुखी क्षणात पळविते
अनेक वेळा लहान मुलांना व मोठ्या व्यक्तींना बहुतेक वेळा पोटदुखीचा त्रास होतो अशा मध्ये आपण अनेक औषधोपचारांचा वापर करण्याचा प्रयत्न करतो परंतु योग्य तो परिणाम आपल्याला मिळत नाही,अशा वेळी जर तुम्ही आपट्यांच्या फुलांचा चूर्ण खडीसाखर सोबत खाल्ल्यास लवकरच पोटदुखीचा समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळेल. त्याच बरोबर लहान मुलांना पोटामध्ये कृमी म्हणजेच लहान लहान किडे होण्याची शक्यता असते. अशावेळी आपट्यांच्या बियांचे बारीक पूड याचे चाटण बनवून दिल्यास लहान मुलांना लवकरच फरक पडतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.