फक्त 5 रुपयात मोस,चामखीळ सुकून गळून पडेल; मोस,चामखीळ घालवण्यासाठी परवडणारा उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मोस किंवा चामखिळ जाग्यावर सुकून जाईल करा हा घरगुती उपाय. ह्युमन पॅपिलोमा व्हायरसमुळे शरीराच्या अगदी कुठल्याही भागातील त्वचेवर चामखिळ तयार होतात. हे विषाणू प्रचंड संसर्गजन्य असतात. आपल्या शरीरावर ,कपडे वरती उपलब्ध असतात आणि त्यांची सूक्ष्म भाग त्वचामधून शरीरांमध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी पेशींची वाढ सुरू करतात.
शरीराच्या घर्षण होणार या ठिकाणी म्हणजेच बगले किंवा मानेवर चामखिळ जास्त प्रमाणात दिसून येतात.अनेकदा नको असलेले मोस काढले जातात पण सर्वांनाच लेझर ट्रीटमेंट परवडण्यासारखे नसते आणि म्हणूनच अशा चामखिळ दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय निश्चितच फायद्याचे ठरतात म्हणून घरगुती उपाय आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा.हा सोडा स्वयंपाक घरात बऱ्याच वेळा वापरला जाणारा आहे. हा सोडा त्वचेवरील नको असलेले मोस घालवण्यासाठी अत्यंत स्वस्त पर्याय आह. या सोडा मधील सोडियम बायकार्बोनेटमुळे मोसची वाढ थांबते आणि हळूहळू चामखिळ व मोस सुकून जातात.
हा उपाय करण्यासाठी थोडासा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे यानंतर चा दुसरा घटक म्हणजे एप्पल साइडर विनेगर. कोणत्याही किराणा दुकानात उपलब्ध होणारे एप्पल साइडर विनेगर कायमचे मोस नष्ट करण्यासाठी उपयुक्त असे ठरते. पदार्थांची चव वाढवणारे एप्पल साइडर विनेगर प्रमाणामध्ये घेऊन या सोड्यामध्ये टाकायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे.
या दरम्यान तयार होणारा फेस कमी होऊन नीट मिश्रण तयार होईपर्यंत मिक्स करायचे आहे. वजन वाढलेले असणाऱ्या व्यक्तींना चामखिळ होण्याचे प्रमाण जास्त असते म्हणूनच वजन नेहमी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे याशिवाय शरीराची योग्य प्रकारे स्वच्छता करणे, इतरांचे कपडे न वापरणे, थेट शारीरिक संपर्क टाळणे यासारखी सवय तुम्हाला चामखिळ होण्यापासून वाचू शकते.
चामखिळीवर ही पेस्ट कशी लावायची ते देखील महत्त्वाचे आहे. मोस भोवती त्वचेवर शक्यतो खोबरे तेल लावायचे आणि यानंतर एखाद्या काठीच्या सहाय्याने पेस्ट लावायची आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा आणि सलग सात ते आठ दिवस हा उपाय केला तर तुमचीच चामखिळ सुकु न जाऊन ती गळून पडेल ,असा सोपा हा घरगुती उपाय तुम्ही देखील एक वेळा अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.