रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका एक वस्तू; रातोरात तुमचे नशीब उजळून जाईल.!

रोज सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका एक वस्तू; रातोरात तुमचे नशीब उजळून जाईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यातील प्रत्येक जण सकाळी उठल्यावर आंघोळ करत असतो परंतु आंघोळ करण्याची सुद्धा काही पद्धत असते आणि जर आपण आंघोळ करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केला तर आपल्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक घटना घडू लागतील. आपल्याकडे खूप सारा पैसा धन आकर्षित होऊ लागणार आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या लेखामध्ये आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि या वस्तूच्या उपयोगाने आपण आपलं जीवन समृद्ध करणार आहोत.

हा उपाय केल्याने आपले जीवन रातोरात बदलणार आहे आणि आपल्या भाग्याची दार उघडणार आहे. आपल्यापैकी अनेक जण धनप्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात परंतु एवढे सगळे उपाय करून सुद्धा आपल्याला सुख शांती वैभव प्राप्त होत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यावर आंघोळ करत असतो. सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या आजूबाजूला जे काही नकारात्मक ऊर्जा असते ती पूर्णपणे दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर आपण सकारात्मक उर्जेचा सहवासामध्ये येऊ लागतो. नियमितपणे आंघोळ केल्याने आपल्या शरीरातील वाईट गोष्टीसुद्धा आंघोळीच्या पाण्यासोबत निघून जातात परंतु आंघोळ करण्याची पद्धत सुद्धा योग्य असायला हवी. जर आपण योग्य पद्धत वापरून आंघोळ केली तर त्या आंघोळीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो.

जर तुम्हाला असे वाटत असेल की आपले भाग्य सुद्धा चमकायला हवे तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की अमावस्या , पौर्णिमा, एकादशी एखाद्या महत्त्वाच्या तिथीला तलाव किंवा नदी मध्ये अवश्य आंघोळ करा. त्याचबरोबर वर्षभरातून एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी तलावांमध्ये किंवा नदीमध्ये स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

नदी आणि तलावांमध्ये ओजस्वी शक्ती आणि किरण यांचा समावेश असतो आणि अशा वेळी जर आपण या शक्तीच्या सहवासामध्ये स्नान केले तर त्या शक्तींच्या प्रभावी किरणांमुळे आपले जीवन सुद्धा उजळून जाते आणि या शक्तीमुळे येणारा काळ सुद्धा आपल्या साठी सकारात्मक ठरतो. अनेकदा व्यस्त जीवनामध्ये आपल्याला नदी व तलाव मध्ये जाऊन आंघोळ करणं शक्य होत नाही परंतु आपण घरच्या घरी सुद्धा काही उपाय करू शकतो आणि आपण आपले जीवन सकारात्मक बनू शकतो.

तसे पाहायला गेले तर आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रहांची महत्त्वाची भूमिका असते आणि या ग्रहांच्या प्रभावाने सुद्धा आपण आपले जीवन बदलू शकतो त्यापैकी एक ग्रह म्हणजे शुक्र ग्रह. शुक्र ग्रह धनाचा कारक मानले जाते .शुक्र ग्रह आपल्या जीवनामध्ये धन नेहमी आकर्षित करत असतो .आपल्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह योग्य स्थानावर असेल तर आपल्याला धनाची प्राप्ती सुद्धा होते.

आपल्याला रात्री झोपताना आपल्या उशीला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे ते काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरून त्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा ग्लास आपल्याला आपल्या अंगावरून सात वेळा उतरवायचा आहे आणि अशा वेळी आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा व्यक्त करायच्या आहे आणि हा आपला ग्लास रात्रभर आपल्या उशीला ठेवायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण स्नान करू तेव्हा आंघोळीचे पाणी असेल तेव्हा त्या पाण्यामध्ये हळदीचे पाणी मिक्स करायचे आहे आणि या पाण्याने आंघोळ करत असताना आपल्याला पंचनदी चे स्मरण करायचे आहे.

तसेच तुम्हाला ज्या पाच नद्यांची नावे माहिती असतील त्या पाच नद्यांचे स्मरण करून त्यांना मनोभावे शरण जायचे आहे आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी मनोभावे प्रार्थना सुद्धा करायचा आहे, असे केल्याने पंच सिंधू व सप्तसिंधू यांचे तुमच्यावर कृपा आशीर्वाद होतील आणि तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहेत त्याचबरोबर आपल्याला आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल सुद्धा अर्पण करायचे आहे आणि असे केल्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडु लागतात.

त्याचबरोबर आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकल्यास आपल्या जीवनामध्ये ज्या काही नकारात्मक आहेत त्या सुद्धा सकारात्मकतेध्ये रूपांतरित होतात कारण की तुरटी नकारात्मक ऊर्जेला शोषून घेते आणि सकारात्मक उर्जा परावर्तित करत असते म्हणून अनेकदा आपण आपल्या घरामध्ये तुरटी ठेवत असतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *