देवपूजेत या 9 चुका अजिबातच करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

देवपूजेत या 9 चुका अजिबातच करू नका; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवपूजा करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेक जण देवपूजा करतात परंतु देवपूजा ही जर व्यवस्थित झाली नाही तर आपल्याला त्याचे फळ सुद्धा प्राप्त होत नाही आणि म्हणून अनेक जण असे म्हणतात की आम्ही अनेकदा दिवसभरातून दोन ते तीन वेळा देव पूजा करतो तरी आमच्या जीवनामध्ये अडीअडचणी कटकटी निर्माण होत असतात.

या सर्वांचा दोष आपण देवी देवता यांना देत असतो परंतु आपण जेव्हा देव पूजा करत असतो ती योग्य पद्धतीने करत नसल्याने सुद्धा आपल्याला त्याचे फारसे लाभ प्राप्त होत नाही. कळत नकळत आपल्या हातून असे अनेक चुका घडू लागतात आणि या चुकांमुळे आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी दारिद्रता व गरिबी निर्माण होते. आपल्या देव्हाऱ्यामध्ये जे काही देवी-देवता यांचे फोटो व मुर्त्या आहेत त्यांचे तोंड कधीही चुकून दक्षिण दिशेला नसावे.

भगवान शिव शंकराच्या मंदिरात गेल्यावर तेथे झांज वाजविणे, सूर्य मंदिरात शंख वाजवणे, कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये बासरी वाजविणे हिंदू धर्मशास्त्रानुसार अमान्य आहे. देवांच्या फोटोला किवा देवाच्या मूर्तीला गंध लावत असतो , त्यांवेळी कोणत्या बोटाचा उपयोग करावा हे सुद्धा अनेकांना माहिती नसते. देवी-देवतांना गंध लावताना आपल्या करंगळी च्या बाजूला असणारे बोट त्याद्वारेच आपल्याला गंध लावायचा आहे.त्या बोटाला आपण अनामिका असे म्हणतो.

देवापुढे आपण जेव्हा नारळ वाढवतो तेव्हा अशावेळी नारळाचा शेंडीचा भाग देवापुढे करायचा असतो. ही गोष्ट अनेकांना माहिती नसते आणि म्हणूनच त्याचा विपरीत परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागतो. जर आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण एकापेक्षा अनेक दिवे प्रज्वलित करत असेल तर अशा वेळी एका काडीने तीन दिवा आपल्याला प्रज्वलित करायचे नाही.

आपल्यापैकी अनेकजण दिव्यातील वात हाताने सांरतात हे सुद्धा हिंदू धर्मशास्त्रामध्ये चुकीचे मानले गेले आहे.अनेकदा महिला तव्यावरील विस्तव आपल्या पदराने त्यावर हवा घालत असतात. आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की पदराने हवा केव्हा घातली जाते जर आपण असे केले तर आपल्या घरातील सदस्यांचा अकाळी मृत्यू होऊ शकतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करू लागते.

जर असल्यामुळे तुम्हाला एखादी प्रेतयात्रा दिसली तर त्या प्रेतयात्रा च्या जवळ जाऊ नका पण जर कोणत्याही कारणाने जर तुम्ही जवळून गेला असाल तर अशा वेळी त्या प्रेतयात्रेला नमस्कार अवश्य करा यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही. जर तुमच्या घरातील सदस्य ला एखाद्या व्यक्तीने नवीन कपडे दिले असतील तर ते नवीन कपडे परिधान करून अजिबात झोपू नका कारण की नवीन कपडे परिधान करून झोपणे अशुभ मानले जाते.

जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो तेव्हा त्याच्या अंगावर कोरे व नवीन कपडे घातले जातात. आपल्या स्वयंपाक घरातील मीठ कधी हाताने घेऊ नये तसेच आपल्या तळहातावर ठेवू नये असे कृत्य ज्या घरामध्ये वारंवार केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करत नाही व त्या घरामध्ये नेहमी अलक्ष्मी म्हणजेच दारिद्रता वास करत राहते.

आपल्यापैकी अनेक जण श्रीगणेशांना तुळस वाहतात परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा गणेश चतुर्थी सोडता कोणत्याही तिथीला श्रीगणेशांना तुळस अर्पण करू नका. कारण की तुळस श्रीगणेशांना अप्रिय आहे म्हणून श्रीगणेशांना तुळस कदापि वाहू नये त्याचबरोबर दक्षिण दिशेला पाय करून अजिबात झोपू नये. अनेक जण उंबरठ्यावर शिंकतात असे केल्याने सुद्धा अनेक अशुभ घटना घडतात.

आपल्यापैकी अनेकांना दाताने नखं खाण्याची सवय असते ही सवय अत्यंत वाईट आहे. या सवयीमुळे आपल्या घरामध्ये दारिद्रता गरिबी येऊ शकते आणि त्याचबरोबर आरोग्याच्या समस्या सुद्धा उद्भवतात. शनिवारी चुकूनही स्वयंपाक घरामध्ये गोडेतेल बाहेरून आणू नका. जेव्हा आपण घरामध्ये लोणी बनवतो तेव्हा सोमवारचा दिवशी लोणी अजिबात कढवू नका. जर तुम्ही श्री महादेवांना व शंकराच्या पिंडीवर बेलाची पत्रे राहणार असाल तर ती नेहमी पालथी वाहायला हवी ती कधीही सरळ वाहू नये. जेव्हा आपण कुणाच्या घरुन बाहेर जातो तेव्हा कधी जातो असे म्हणू नका येतो असेच म्हणा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *