जांभूळ खाल्ल्याने हे रोग होतात मुळापासून नष्ट; जाणून घ्या जांभळाचे हे आयुर्वेदिक फायदे.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या निसर्गामध्ये असे अनेक फळे आहेत जे मानवी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानले गेलेले आहेत त्यांचा उपयोग मनुष्य अनादी काळापासून करत आलेला आहे आणि या फळांचे औषधी गुणधर्म आहे, अशाच एका फळाबद्दल आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत. हे फळ आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हे फळ प्रामुख्याने उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
या फळाचे नाव आहे जांभूळ.जांभूळ हे जांभळी रंगाचे असते व चवीला आंबट-गोड असते. हे झाड आकाराने उंच असते व या पानांचा आकार लांब असतो. आकाराने लहान असले जरी हे फळ आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे.असे असंख्य आजार आहेत त्या आजारांवर रामबाण औषध म्हणून जांभळा कडे पाहिले जाते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण या फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊयात या विषयी..
जांभूळ फळास आयुर्वेदामध्ये अनन्य स्थान आहे. हे फळ एनिमिया,कावीळ,पित्त यासारख्या आजारांवर रामबाण ठरते. या फळामध्ये भरपूर प्रमाणात लोह उपलब्ध असते म्हणून आपल्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता असेल तर ती कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. जांभूळ मध्ये विटामिन ए विटामिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक इत्यादी घटक उपलब्ध असतात त्याच बरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा उपलब्ध असतात. जांभळाचे पान उत्कृष्ट स्तंभक आहे.
त्याचबरोबर या पानांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणामध्ये असते. जांभूळाच्या बिया आहे ह्या डायबिटीस रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या आहे. जांभूळाच्या बियामध्ये असे औषधी घटक असते जे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात आणत असते म्हणून अनेकदा त्यांना जांभळाच्या बियांचे पावडर खाण्याचे सल्ले दिले जातात. जांभूळ मध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे नियमितपणे जर आपण जांभूळ खाल्ले तर आपले रक्त लाल तसेच रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
अनेकांना पित्त ,पोटामध्ये गॅस, अपचनाच्या समस्या सतावत असतात ,अशा वेळेस जर आपण जांभूळ रस प्यायले तर आपल्या पोटाच्या संदर्भातील ज्या काही समस्या असतात त्या समस्या दूर होऊन जातात तसेच आपले यकृताचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी सुद्धा जांभूळ महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
जर आपण 100 ग्रॅम जांभूळ एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून ते पाणी उकळण्यास आणि हे मिश्रण दिवसभरातून एकदा प्यायले तर आपले यकृत सुरळीत पणे कार्य करू लागते. महिलांना मासिक पाळी संदर्भात तसेच गर्भाशयाच्या संदर्भात काही समस्या असतील तर या समस्यांवर सुद्धा जांभूळ हे अत्यंत रामबाण औषधे ठरते म्हणून या हंगामामध्ये जांभूळ जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतात त्यांचे सेवन करून आपले आरोग्य जपायला हवे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.