नेहमी शिळे अन्न खाताय..? तर आत्ताच थांबा… नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार..!

नेहमी शिळे अन्न खाताय..? तर आत्ताच थांबा… नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो सध्याच्या काळात माणसाचे जीवन एवढे व्यस्त झाले आहे कि त्याला आपल्या आरोग्यासाठी काही करायला जरा सुद्धा वेळ नाहीय. व्यस्त जीवन शैलीमुळे लोकांना ताजे अन्न बनवायला सुद्धा वेळ उरलेला नाहीय. त्यामुळे बऱ्याच वेळा शिळे अन्न खाण्याची वेळ त्यांच्यावर येते. मित्रांनो शिळे अन्न खाल्ल्यामुळे आपण अनेक एक प्रकारचं आजारांना आमंत्रणच देत असतो. त्यामुळे शिळे अन्न खाणे प्रत्येकाने टाळायला हवे.

धावपळीच्या जीवनात खाण्यापिण्याकडे लक्ष देणं कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागू शकते. आजकाल तर या समस्या खूप वाढू लागल्या आहेत. या सर्व समस्यांचं कारण शिळे अन्न खाणे ठरू शकते.

व्यस्त जीवनशैलींमुळे घरगुती काम करणाऱ्या महिलांना २ वेळचे जेवण बनवणे शक्य होत नाही. सोबतच ताजे टोमॅटो वापरण्या ऐवजी टोमॅटो पावडर वापरली जाऊ लागली आहे. पीठ सुद्धा जास्त दिवस वापरले जावे म्हणून एकाच मळून ठेवले जात आहे. याशिवाय सकाळी बनवलेली भाजी रात्री खाणे किंवा रात्री बनवलेली भाजी सकाळी खाणे असा सध्याचा दिनक्रम चालू आहे.

यामुळे पोटांचे अनेक आजार होऊ शकतात. तर मित्रांनो चला तर जाणून घेऊया शिळे अन्न खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम आपल्याला होऊ शकतात.

जेव्हा आपण ताजे अन्न खातो तेव्हा बॅक्टेरिया किंवा इतर सुष्मजीवांचा समावेश होण्याचा धोका कमी असतो. हेच जर आपण शिळ्या अन्नाच्या बाबतीत बघितले तर त्यात हमखास बॅक्टेरिया असतोच. बॅक्टेरियाने शिळ्या अन्नात टॉक्सिस आणि रसायनं तयार होतात जे आपल्या आरोग्यासाठी खुपचं धोकादायक असतात.

फ्रिज चा उपयोग करा पण  हे लक्षात असुद्या कि फ्रिज मध्ये असलेले खूप शिळे अन्न वापरू नये. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. बॅक्टेरियायुक्त आणि अन्य सुष्मजीव असलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवल्यास फ्रिजमध्ये ठेवलेल्या इतर ताज्या अन्नावर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो.

जे अन्न फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला वाटत कि ते तुम्ही सुरक्षित केलं आहे. पण तेच अन्न खराब होऊन त्यापासून तुम्हाला इतर आजार होण्याची शक्यता जास्त असते. खूप जास्त वेळ अन्न फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यामधील पोषकतत्वे कमी होण्यास सुरवात होते. पोषक तत्वे कमी झाल्यास ते अन्न खराब होते. म्हणून खुपवेळ अन्न फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे.

शीळ अन्न खाण्याने तुम्हाला विषबाधा होण्याचा धोका संभवतो. फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न सतत थंड व गरम करण्याच्या प्रयत्नात त्यात आवश्यक असलेले पौष्टिक तत्वे नष्ट होतात. सोबतच त्यात हानिकारक जिवाणूंचा समावेश असतो.

शिळ्या अन्नात बॅक्टेरिया तर तयार होतोच पण डेअरीच्या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात आणि लवकर तयार होतो. त्यामुळे डेअरीचे पदार्थ पाश्व्राइड्झ असायला हवेत ज्यामुळे बॅक्टेरिया जास्त तयार होत नाही. यासारखे पदार्थ खाल्ल्यास तुमच्या शरीराला नुकसान होण्याची शक्यता असते.

तर मित्रांनो तुम्ही सुद्धा जास्त प्रमाणात शिळे अन्न खात असाल तर आताच ते खाणे थांबवा.  तसेच तुमचे मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईकांमध्ये असं कोणी करत असेल तर त्यांना हि माहिती शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *