बिअर पिण्याचे १० जबरदस्त चत्मकारी फायदे, जे तुम्ही आत्तापर्यंत कधी ऐकले सुद्धा नसतील.!

बिअर पिण्याचे १० जबरदस्त चत्मकारी फायदे, जे तुम्ही आत्तापर्यंत कधी ऐकले सुद्धा नसतील.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपण शाळेत असल्यापासून ऐकत आलो आहोत कि मद्यपान करणे शरीरासाठी हानिकारक आहे आणि बिअर हा सुद्धा एक मद्याचाच प्रकार आहे. पण तुम्हाला माहितेय का विदेशात लहानांपासून मोठ्यांपर्यंत बिअर अगदी बिनधास्त पिऊ शकतात, अगदी आपण सॉफ्टड्रींक पितो तसाच.

बिअर हि शरीरासाठी अत्यंत चांगलं पेय आहे. कुठल्याही गोष्टीचा जास्त अतिरेक झाला तर वाईट परिणाम होणारच भले ते मद्य असो अथवा औषध. ते एखाद्या ठराविक प्रमाणात असलं तरंच गुणकारी ठरतं. चला तर आज जाणून घेऊया बिअर चे असे फायदे जे तुम्ही कधी ऐकले सुद्धा नसतील.

बिअर कोलेस्ट्रॉल साठी अतिशय उत्तम. बिअर मध्ये मुळात कोलेस्ट्रॉल नसतेच तरीपण बिअर शरीरातील कोलेस्ट्रॉल साठी उत्तम पर्याय आहे. ठराविक प्रमाणात बिअर पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. कोलेस्ट्रॉल २ प्रकारचे असतात एक HDL जो लाभदायक असतो आणि दुसरा LDL जो घातक असतो.

बिअर पिल्याने HDL अर्थात लाभदायक कोलेस्ट्रॉलची सुमारे ४ टक्क्यांनी वाढ होते. हृदयविकारावर रोधक असते बिअर. आजकाल आपली खाद्यसंस्कृती, जीवनशैली दिवसेंदिवस बदलत आहे. परिणामी अंगातील फॅट वाढतोय आणि हृदयविकाराचेही प्रमाणही वाढत आहे. पर्यायी म्हणून फ्रांस मधील मधील लोकं रेड  वाईन किंवा  डार्क बिअर पितात ज्यात अँटिऑक्सिडेन्ट अधिक प्रमाणात असतात. म्हणूनच इथल्या लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण कमी आहे.

ब्रिटिश मेडिकल जनरल मध्ये प्रकाशित एका संशोधनात निदर्शनात आले आहे कि दिवसातून ठराविक वेळेत ठराविक प्रमाणात ड्रिंक केल्यास हृदयविकाराचा धोका २५ टक्क्यांनी कमी होतो.

मद्यपान केल्याने कॅन्सर यांसारखे आजार होतात हे तुम्हाला माहीतच आहेत पण मुळीच मद्यपान न केल्यासही आजार होतात हे तुम्हाला माहिती आहे का..? एका संशोधनात असं निदर्शनात आलं आहे कि मद्यपान करणाऱ्यांच्या तुलनेत मद्यपान न करणारी लोकं जास्त आजारी पडतात. फिट राहण्यासाठी बिअर हा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यात अल्कोहोल चे प्रमाण कमी असते.

फिल्टर न केलेल्या किंवा कमी प्रमाणात फिल्टर केलेल्या बिअर मध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात असते. हृदयविकाराच्या झटक्यांपासून संरक्षण करणाऱ्या फॉलीक ऍसिड चे प्रमाणही बिअर मध्ये जास्त असते. म्हणून ठराविक प्रमाणात बिअर पिणे अगदी उत्तम.

मित्रांनो बिअर हे जूस किंवा दुधाप्रमाणे नैसर्गिक पेय आहे. कारण बिअरमध्ये अल्कोहोल नैसर्गिकरित्या असल्याने त्याला प्रेसर्व्हेटिव्ह ची गरज भासत नाही. अगदी क्वचित मार्गी प्रक्रिया करून बिअर तयार होते. बिअर मुळे वजनही वाढत नाही. बिअरमुळे चरबी वाढते असा जणांचा गैरसमज असतो. मात्र हे अगदी चूक आहे याउलट मद्यपान करणाऱ्यांच्या तुलनेत मद्यपान न करणाऱ्यांचे वजन जलद वाढताना दिसून येत आहे. तर हे केवळ आम्ही नाही तर युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन च्या संशोधकांनी दिलेल मत आहे.

बिअर इतर ड्रिंक्स प्रमाणे घातक नाही म्हणून तुम्ही मित्रांसोबत रिलॅक्स करण्यासाठी किंवा दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी बिअर पिऊ शकता. फक्त पिताना प्रमाणाबाहेर होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा परिणाम उलट होऊ शकतात.

नुकतंच आपण पाहिलं कि पूर्णपणे नैसर्गिक पेय म्हणून बिअर हा चांगला पर्याय आहे. कारण बिअर मध्ये कॅलरीस आणि कार्बोहायड्रेट चे प्रमाण अत्यंत कमी असते. तसेच फॅट आणि कोलेस्ट्रॉल आढळत नाही म्हणून चहा कॉफी इतक्याच सर्वसाधारणपणे तुम्ही बिअरही पिऊ शकता.

पाण्यापेक्षाही बिअर आहे उत्तम सरस..! विश्वास बसत नाही ना..? पण हा खरं आहे. दुकानात आपण पाणी विकत घेतो त्यापेक्षा बिअरही सुरक्षित आहे. कारण बिअर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याला बऱ्याचवेळा उकळले जाते आणि त्याला हवाबंद बाटलीत पॅक केलं जातं. बिअर हि असं पेय आहे ज्याची बाटली लीक झाली तरी त्यामध्ये बॅक्टेरिया तयार होत नाही.

बघा आहे कि नाही सुरक्षित..? मित्रांनो  तुमच्या आता आलंच असेल कि तुम्ही मुळीच मद्यपान करत नसाल तर तुम्ही थोड्याफार प्रमाणात बिअर एन्जॉय करू शकता. जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त ड्रिंक करत असाल तर ते प्रमाण कमी करायला हवं. कारण ते आरोग्याला हानिकारक ठरू शकेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *