मुतखड्याचा त्रासापासून हैराण असाल तर करा हे घरगुती उपाय.. पुन्हा कसलाच त्रास होणार नाही..!

मुतखड्याचा त्रासापासून हैराण असाल तर करा हे घरगुती उपाय.. पुन्हा कसलाच त्रास होणार नाही..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन वर आयुर्वेदिक उपचारांबद्दल माहिती देणार आहोत. लोकांना अनेक प्रकारचे आजार होतात त्यापैकी किडनी स्टोन हा आजार खूप भयंकर आहे जो आजकाल कोणालाही होउ शकतो. ज्या कोणाला किडनी स्टोन हा आजार होतो त्याला खूप त्रास व वेदना होतात. यामुळे पोटासंबंधी आजार होतात. आपल्याला या त्रासांपासून मुक्तता मिळवायची असेल तर हे आयुर्वेदिक उपचार करा.

याच्यावर एलोपॅथिक हि उपचार आहेत पण हे उपचार खूप खर्चिक असतात. किडनी स्टोन वरील आयुर्वेदिक उपचार जाणून घेण्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे कि किडनी स्टोन कशामुळे होतो. किडनी स्टोन होण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पचनक्रियेतील बिघाड.

आपण जे खातो त्याचे पचन पाचनप्रणाली योग्य पद्धतीने पचवत नसेल तर न पचलेल्या आहाराचे कण मूत्रद्वारात जमा होतात आणि लघवीला जाड होते. आणि असं वारंवार होत असेल तर हळूहळू त्याचे रूपांतर बारीक रेती व खड्यांमध्ये होते.

➤ आता आपण किडनी स्टोन च्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया. 

किडनी मध्ये खडे आहेत हे कसे ओळखावे याची काही लक्षणे आहेत. जर किडनी मध्ये खडे असतील तर पोटात खूप दुखतं किंवा पोटामध्ये दहा दहा अंतराने दुखायला लागतं. किडनी स्टोन झाल्यावर कंबर दुखते, लाघवी करताना खूप त्रास होतो, लघवीचा रंग पिवळा होतो.

तसेच लघवीला तीर्व आणि घाणेरडा वास येतो. ताप व उलटी होते, लघवीला साफ होत नाही. किडनी स्टोन चे दुखणे असह्य होते. यामुळे आपणास बसण्यास व उभं राहण्यास त्रास होतो. हे काही किडनी स्टोन चे लक्षणे आहेत.

➤आता आपण किडनी स्टोन वर आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया. 

जर आपल्याला किडनी स्टोन वर आयुर्वेदिक उपचार करायचा असेल तर दोडका या भाजीचा उपयोग करा. या भाजीमध्ये खूप पोषक तत्व असतात. या भाजीचे उत्पादन जास्त करून पावसाळ्यात केले जाते. हि भाजी गोड व कडू असते तसेच हि थंड असते. या भाजीचे खूप फायदे आहेत.

दोडक्याची वेल पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिक्स करून ३ दिवस याचे सेवन केल्याने किडनी स्टोन गाळून पडेल. एवढेच नाही तर हे आपल्या मुळव्याधासारख्या आजारावर देखील गुणकारी आहे. तसेच बद्धकोष्टता देखील दूर करते.

दुसरा उपाय म्हणजे आपण तुळशीचा वापर करू शकतो. तुळशीला एक आयुर्वेदिक झाड मानले जाते. आणि तुळशीला आयुर्वेदात महत्वाचे स्थान आहे. कारण तुळशीचे पान किंवा झाड आपल्याला अनेक रोगांपासून बचावते. तुळशीची पाने हि किडनी स्टोन वर आयुर्वेदिक उपचार आहेत. आपण तुळशीची पाने मधात किंवा दुधात घेऊ शकता. किंवा तुळशीची पाने नुसती सुद्धा खाऊ शकता.

तिसरा उपाय म्हणजे टरबूज, हा खूप सोप्पं उपाय आहे. टरबूज मध्ये जवळ जवळ ७५ टक्के पाणी असते. तसेच टरबूज खाल्ल्याने आपण निरोगी देखील राहतो. तसेच किडनीतील स्टोन गाळून पडण्यासाठी टरबूज खूप उपयोगी आहे. जर आपण रोज टरबूज खात असाल तर किडनी स्टोन ची समस्या हळूहळू समाप्त होईल.

तर मित्रांनो हे उपाय जर का तुम्ही केले तर तुमचा किडनी स्टोन चा त्रास लवकरचं निघून जाईल. तुम्हाला जर हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही या आयुर्वेदिक उपायांचा लाभ होईल.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *