या ४ वस्तू आयुष्यात कधीच कोणालाही दान करू नका; घरात येईल गरिबी आणि दारिद्र.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणत्याही धर्मामध्ये दान करण्याचे खूप महत्त्व आहे तसेही दाना पेक्षा मोठे पुण्य कोठेही नाही. दान करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दान केल्याने फक्त शांती च मिळत नाही तर कितीतरी ग्रह दोष व बाधा नष्ट होते परंतु कळत नकळत पणे आणि अशा वस्तूंही आपण दान करून बसतो, ज्यामुळे आपल्या पूर्ण घरात वाढ होत नाहीच परंतु आपल्या जीवनात अनेक अडचणी बाधा व संकटे येऊ लागतात.
अशा कितीतरी वस्तू आहेत ज्या दान म्हणून कोणालाही देऊ नये. परंतु नकळतपणे आपल्या हातून ह्या चुका होऊन जातात तसेच ज्योतिष शास्त्र नुसार कोण कोणते दान करू नये हे आपण आता जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे लोणचे. लोणचे हा असा प्रकार आहे जो लवकर खराब होत नाही. लोणचे वर्ष वर्ष छान टिकते याचा अर्थ असा होतो की स्थिर लक्ष्मी असते.
काही स्त्रिया म्हणतात ते आमच्या घरात लोणचे टिकतच नाही तर खराब होते मग अशा घरामध्ये लोणचें का खराब होते कारण त्या घरामध्ये दोष असतो परंतु ज्या घरांमध्ये खूप काळ लोणचे टिकते त्या घरामध्ये देवी लक्ष्मीची कृपा आहे. म्हणून अशात लोणचे कोणालाही देऊ नये तसेच काही स्त्रिया लोणचे बनवल्यानंतर एकमेकांना लोणचे देतात पण लोणचे दिल्यानंतर त्यांच्याकडून काही तरी घ्या किंवा थोडे पैसे तरी घ्या.
त्याशिवाय लोणचे आंबट असते कारण आपले नाते-गोते बिघडू शकते कारण त्यामध्ये आंबटपणा असतो. दुसरी वस्तू आहे पांढरी तीळ ,काळी तीळ श्रीहरी विष्णूची प्रतीक मानले जाते परंतु पांढरे तीळ देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर पांढरी तीळ दान करणे म्हणजे आपल्या जीवनातूं लक्ष्मी निघून जाणे होय. आज पर्यंत जर तुम्ही ही चूक केली असेल तर ते सोडून द्या, यापुढे ही चूक पुन्हा करू नका.
पांढऱ्या तिळाचे दान खूप सावध राहून करावे तसे काळा तिळाचे दान केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात. पुढील वस्तू म्हणजे धणे. धणे देवी लक्ष्मी ला अतिप्रिय आहे. ज्या घरामध्ये धणे असतात किंवा कोथंबीर लावलेली असते अशा घरांमध्ये देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते म्हणून धण्याचे दान कधीही करू नये.
जर कोणी धणे किंवा कोथिंबीर मागितली तर त्या बदली पैसे घ्या मगच त्यांना या वस्तू द्या. पुढील वस्तू म्हणजे जुने कपडे तसे तर आपण आधुनिक काळात नवनवीत कपडे घेतले जातात मग जुने कपडे तसेच पडून राहतात मग त्या कपड्यांचे करायचे काय? त्याचप्रमाणे ते कपडे तुम्ही दान करू शकतात परंतु त्या कपड्यांना स्वच्छ धुऊन दान करा.
आपण घातलेले कपडे ते न धुता आपण तसेच दान केले व ते इतराने घातले तर आपले नशीब वाटले जाते आपले भाग्य इतरांकडे आकर्षित होते म्हणून वापरलेले कपडे धुतल्यावरच दान करा. पुढील वस्तू आहे दही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी कोणतीही वेळ असो चुकूनही कोणाला दही देऊ नये.
जर कोणाला दही दिली तर आपल्या घरातील लक्ष्मी त्यांच्या घरी निघून जाते, ज्यांना आपण दही देतो पुढील वस्तू म्हणजे धारदार व टोकदार वस्तू तसेच सुरी चाकू सुई अशा वस्तू कधीही कोणाला गिफ्ट म्हणून किंवा दान ही करू नये. या वस्तू दान केल्याने आपल्या घरातील सुख-समृद्धी निघून जाते त्याचप्रमाणे आपण ज्यांना या वस्तू दिल्या आहेत त्यांच्याबरोबर आपले संबंध ही बिघडतात.
पुढील वस्तू म्हणजे स्टीलचे भांडे. स्टीलचे भांडे दिसायला खूपच सुंदर असतात म्हणून आपण गिफ्ट म्हणून दान म्हणून स्टीलचे भांडे देतो परंतु ज्योतिष शास्त्राच्या अनुसार स्टीलचे भांडे दान करणे खूपच अशुभ मानले जाते. स्टीलचे भांडे दान केल्यास आपल्या घरातील सुख व शांती भंग पावते. घरात भांडण आणि वाद विवाद होतात म्हणून स्टीलचे भांडे कोणालाही दान म्हणून द्यायची नाही तसेच प्लास्टिकच्या वस्तू त्या आपण कोणालाही सहज गिफ्ट म्हणून देऊन देतो परंतु या वस्तूचे हे दान करणे निषिद्ध आहे कारण प्लास्टिकला अशुभ मानला जाते.
इलेक्ट्रॉनिक वस्तू आपण सहजच आपला जुना मोबाईल इतरांना देऊन टाकतो. आपण नवीन वस्तू घेतली की आपली जुनी वस्तू मित्र किंवा नातेवाईकांना देऊन टाकतो यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो कारण ज्या इलेक्ट्रॉन वस्तूच्या आतून जी तरंगे बाहेर पडतात त्यांचा आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडत असतो तसेच स्त्रियांनी कधीही कुंकवाचा दान करू नये ते सौभाग्याचे बांगड्या,कुंकू, गजरा अशा वस्तूंची दान करू नये कारण आपल्या सौभाग्यवर विपरीत परिणाम होतो.
झाडू ला आपण श्री लक्ष्मी चे प्रतीक मानतो म्हणून कधीही झाडूचे दान कोणालाही देऊ नये.जर एखादी झाडू आपण जर एखाद्याला दान म्हणून दिली तर आपल्यावर लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते म्हणून झाडूचे दान कधीही करू नये. जर चुकून कधी कोणाला दिली गेली तर त्यांच्याकडून पैसे घ्या.
लक्ष्मी ही खूप चंचल आहे जर ती नाराज होऊन निघून गेली तर पुन्हा परत येणार नाही. सर्वात मोठे दान कोणते भुकेलेले अन्न व तहानलेल्या पाणी देणे हे सर्वात मोठे दान आहे. कोणाला दान म्हणून पैसे देणे हे सर्वात मोठे पाप आहे कारण त्या व्यक्तीने त्या पैशाचे चुकीचे काम केले तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि दान करताना कोणालाही गोड वस्तूचे दान जरूर करावे यामुळे आपल्या जीवनात सुख व समृद्धी येते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.