घरात मनी प्लांट असेल तर सावधान; ही चूक केल्यास फायदे ऐवजी होईल नुकसान.!

घरात मनी प्लांट असेल तर सावधान; ही चूक केल्यास फायदे ऐवजी होईल नुकसान.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच जण आपल्या घरामध्ये मनी प्लांट लावतात. यामुळे घराची शोभा वाढते पण असे सुद्धा मानले जाते की मनी प्लांट आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्याकडे धन आकर्षित होते. सुख समृद्धी सोबत धनाचे आगमन होते. कधीही मनी प्लांट घरात लावताना काही गोष्टी आपण विशेष लक्षात ठेवायला हव्यात. अन्यथा त्याचा लाभ होण्याऐवजी तुम्हाला दुष्परिणामच सहन करावा लागू शकतो. वास्तुशास्त्रानुसार हे मनी प्लांट आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात.सकारात्मक वातावरण यामुळे आपल्या घरातील वातावरण आनंदी राहते आणि त्याच बरोबर आपल्याला प्रत्येक कार्यांमध्ये यश सफलता मिळते. आजच्या लेखामध्ये आपण अशीच एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

जर तुम्ही तुमच्या घरामध्ये मनी प्लांट लावले असेल तर अशा वेळी नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे साफसफाई. आपल्या घरामध्ये जे मनी प्लांट आहे अगदी स्वच्छ असावे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची धूळ साचलेली नसावी. बरेचदा असे होते की आपण घरामध्ये मनी प्लांट लावतो पण त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे धूळ, जाळे, कीटक बसू लागतात.

अशा वेळी तुमच्या घरा मध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते पण आपल्या घरातील पाने नेहमी स्वच्छ ठेवावे व त्यांची विशेष काळजी घ्यावी. अनेकदा मनी प्लांटची पाने हे पिवळे होऊन जातात अशा वेळी ते पान काढणे सुद्धा तेवढेच गरजेचे ठरते.अशा वेळीही सूकलेली व पिवळी पाने लगेच काढून टाकावी. या पानंमुळे आपल्या घरात अशांती निर्माण होते. या झाडाला तुम्ही जेवढे हिरवे ठेवाल तेवढे तुमच्या घरामध्ये धन आकर्षित होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनीप्लांट आपल्या घरात कोणत्या दिशेला ठेवावे.

बरेच वेळा असे होते की आपण घरामध्ये मनी प्लांट आणतो आणि ते घरांमध्ये कोणत्याही दिशेला ठेवून देतो. हे अत्यंत चुकीचे आहे. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट आपल्या घरांमध्ये ठेवण्याची एक विशिष्ट अशी जागा आहे. त्या दिशेला तुम्ही जर मनी प्लांट ठेवले तरच तुम्हाला विशेष असा लाभ प्राप्त होईल. मनी प्लांट हे आपल्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेला म्हणजेच अग्नेय दिशेला मनी प्लांट कोपऱ्यात ठेवावे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मनीप्लांट नेहमी वरच्या दिशेने वाढत असावे.

काही मनी प्लांटची वेल खालच्या दिशेने सोडलेली असते म्हणजेच कुंडी मध्ये लावलेले मनी प्लांट चे झाड व त्याची वेल ही खालच्या दिशेने पसरत असते. हे अत्यंत चुकीचे आहे .मनी प्लांटची वेल ही नेहमी वरच्या दिशेने वाढणारी असावी. याकरता तुम्ही एखादी रशी बनवू शकता किंवा खिडकीच्या दिशेने वर जाणारा असा वेल बांधू शकता म्हणजे तुमचे आयुष्य सुद्धा तुम्ही वरच्या दिशेने प्रवास कराल, तुमची नेहमी प्रगती होईल.

जर हा वेल खालच्या दिशेने असेल तर तुमच्या जीवनामध्ये अधोगती निर्माण होईल म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर मनी प्लांट पहावे.असे म्हटले जाते की, सकाळी उठल्यानंतर मंगल वस्तू पहाव्यात त्यापैकी मनीप्लांट सुद्धा एक वस्तू आहे जे सकाळी उठल्यानंतर अवश्य पहावे. असे केल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल. तुमचा दिवस चांगला जाईल तर अशा पद्धतीने मनी प्लांट जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला या पद्धतीने काळजी घेणे बंधनकारक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही काळजी घेतल्यास तुमचे जीवन सुखी समाधान आणि वैभवाने संपन्न राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *