तीन दिवस दुधात उकळून घ्या एक पदार्थ; हाडांची कमजोरी,अनिद्रा समस्या होईल मुळापासून नष्ट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कितीही जुना हाडांच्या संदर्भातील आजार असू दे, सांधेदुखी, कंबरदुखी,पाठदुखी, यासारख्या समस्या उद्भवत असतील तर या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आजचा उपाय तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फक्त हा एक पदार्थ आपल्याला दुधासोबत काही दिवस घ्यायचा आहे आणि यामुळे तुमच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत, तो आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो. हा उपाय करण्यासाठी आपण खसखस वापरणार आहोत.
खसखस ला गुणाचे भंडार समजतले जाते खसखस मध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील विविध समस्यांवर मात करतात. खसखस मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा फॅटी अँसिड, प्रोटीन आणि वेगवेगळे फायबर उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीराला मजबूत करण्याचे कार्य खसखस मुळे होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी यासारख्या समस्या उद्भवत असतात आणि या समस्येवर मात करण्यासाठी आजचा उपाय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
जर तुम्हाला अनिद्रा समस्या असेल तर ही समस्या सुद्धा नष्ट करते. हा उपाय करण्यासाठी आपण दुधासोबत तिळाचा सुद्धा वापर करणार आहोत, त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम ची मात्रा असते आणि म्हणूनच जर कोणत्याही प्रकारच्या हाडा संदर्भातील काही समस्या असेल तर तीळ ती समस्या दूर करते. हा उपाय करण्यासाठी आपण मखाना सुद्धा वापरणार आहोत. मखाना हे कमळाच्या बियांपासून तयार केलेले पदार्थ आहे आणि हा शुद्ध शाकाहारी पदार्थ आहे.
कोणत्याही किराणा दुकानांमध्ये किंवा ड्राय फूड दुकानांमध्ये आपल्याला मखाना सहज उपलब्ध होतो आणि या मखानाचे सुद्धा आपल्या शरीराला खूपच महत्त्वाचे फायदे आहे. मखाना मध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम ,लोह , झिंक यासारखे पोषक तत्व उपलब्ध असतात. या पदार्थांमध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात त्यांच्यामुळे तुमचे वय जरी वाढलेले असेल तर ते वय कमी दिसू लागते.
तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असेल तर त्या सुरकुत्या नष्ट करण्याचे कार्य मखाना करते तसेच तुमची त्वचा नेहमी चमकदार ठेवण्याचे कार्य सुद्धा यामुळे होते. हा उपाय करण्यासाठी आपण खडीसाखर सुद्धा घेणार आहोत. खडीसाखर ही शीतल गुणधर्माची मानली जाते आणि म्हणूनच जर आपल्या हातापायांना आग होत असेल तर त्यावर मात करण्याचे कार्य खडीसाखर करते.
त्यानंतर आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दूध घ्यायचे आहे ,यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअमची मात्रा असते आणि यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियम मिळते पण त्याच बरोबर शरीराला मजबुती सुद्धा मिळते. आता आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तीळ भाजून घ्यायची आहे आणि त्यानंतर एका पातेलामध्ये थोडेसे तुप टाकुन खसखस टाकायचे आहे.
खसखस भाजून झाल्यावर आपल्याला एक ते दोन ग्लास दूध टाकायचे आहे. आपल्याला चांगल्या पद्धतीने हे दूध उकळू द्यायचे आहे मग आपल्याला मखाना टाकायचे आहे त्यानंतर खडीसाखर आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून गोड चव प्राप्त होऊ शकते. आता हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये आपल्याला काढायचे आहे.हे मिश्रण आपल्याला दिवसभरातून एकदा सेवन करायचे आहे. हा उपाय आपण पंधरा दिवस जरी केला तरी आपल्या हाडांच्या संदर्भातील सर्व समस्या पूर्णपणे नष्ट होणार आहे. आपल्यापैकी अनेकांच्या हाडांचा आवाज येत असतो हा आवाज सुद्धा पूर्णपणे बंद होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.