फक्त झोपण्याची दिशा बदला शरीरातील 140 आजार कायमचे निघून जातील.!

फक्त झोपण्याची दिशा बदला शरीरातील 140 आजार कायमचे निघून जातील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो मेहनती नंतर माणसाला गरज असते ती झोपेची. माणसाला गरज असते ती दररोज आठ ते नऊ तासाच्या झोपेची. माणसाला झोप मिळाले नाही तर आपले आरोग्य बिघडते. मित्रांनो झोपण्याची सुद्धा एक पद्धत असते हो या बद्दल शास्त्रात सुद्धा लिहलेले आहे. जर आपण ह्या पद्धतीनुसार नाही झोपलो तर मात्र आपल्याला वेग वेगळ्या प्रकारचे आजार होवू शकतात.

उदाहरण द्यायचे झाले तर डोकेदुखी, अंगदुखी, कंबरदुखी त्या बरोबर पाठ दुखी असे अनेक प्रकारचे आजार किंवा विकार दुखणे आपल्याला होत असतात. मित्रांनो कोणत्या आजारासाठी कश्या प्रमाणे झोपले पाहिजे हे आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला जर मायग्रैन म्हणजचे डोके दुखीचा जर त्रास असेल तर 70% लोकांना हा त्रास चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे होतो. ज्या व्यक्ती उत्तरेकडे तोंड करुन झोपतात त्यांना ही डोके दुखीची समस्या ही होतेच अस का होते हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेलच ? आपल्या पृथ्वी मध्ये चुंबकीय शक्ती असते आणि आपले शरीर देखील एक चुंबकीय क्षेत्र असते आणि जर आपण उत्तरेकडे तोंड करुन झोपलो तर ही शक्ती उलट काम करते व आपल्याला तीव्र डोके दुखीचा त्रास सुरु होतो.

मित्रांनो तुम्हाला या समस्येतून मार्ग काढायचा असेल तर तुम्ही या पुढे उत्तरकडे तोंड न करता पूर्वेकडे तोंड करुन झोपा तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. मित्रांनो तसेच तुम्ही उत्तरकडे तोंड करुन झोपलात तर तुम्हाला आम्ल पित्त व पाठ दुखीची समस्या देखील होईल. मात्र तुम्ही जर पुर्वे कडे तोंड करुन झोपलात तर तुमचे हे प्रश्न देखील सुटतील.

मित्रांनो उत्तरेकडे तोंड आणि दक्षीणेकडे पाय करुन झोपणे कधी ही वाईट. आपल्या शास्त्रामध्ये ही ह्या स्थितीत झोपणे वर्ज मानले गेले आहे. दक्षिण दिशा ही यम देवाची दिशा म्हणून ओळखली जाते. मानवाच्या ‘मृ’त्यू’ नंतर त्याचे सगळे विधी हे उत्तरेकडे तोंड आणि दक्षीणेकडे पाय ठेवून केले जातात. सोबतच मुस्लिम बांधव देखील ‘मृ’त्यू’ नंतर तोंड उत्तरेकडे ठेवूनच दफन करण्याच्या विधी पार पाडतात.

मित्रांनो सोबतच ज्यांना पित्ताचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी दुपारी कधी ही झोपू नये. सोबतच या व्यक्तींनी रात्री किमान आठ ते दहा तास झोपावे. रात्री जेवल्यानंतर अश्या व्यक्तींनी पाच ते दहा मिनिटे डाव्या कुशीवर पडून रहायचे आहे झोपू नये मात्र पडून रहावे अश्याने तुमचे अन्न हे व्यवस्थित अन्ननलिकेत प्रवेश करेल व सर्व अन्न योग्यरित्या पचन होईल.

मित्रांनो ज्यांना झोपेत चमक भरते अथवा मानदुखी अथवा पाठ दुखीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी गादीचा वापर कधी ही करु नये. खाली जमिनिवर आपले अंथरुण टाकून झोपवे. सोबतच जर तुम्हाला ऊशी घेऊन झोपायची सवय असल्यास कमी उंचीच्या ऊशीचा वापर तुम्ही करु शकता. ह्या सगळ्या पद्धती वापरुन तुम्ही या छोट्या आजारांवर अगदी सहज मात करु शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *