गुलाबी थंडीत फक्त ३ वेळा करा हा उपाय; ओठ फाटणे, काळपटपणा यासारखे त्रास होतील कमी.!

गुलाबी थंडीत फक्त ३ वेळा करा हा उपाय; ओठ फाटणे, काळपटपणा यासारखे त्रास होतील कमी.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा आणि नाजूक भाग म्हणजे आपले ओठ असतात. चेहर्‍याचे सौंदर्य राखण्यासाठी ओठाचे सौंदर्य राखणं गरजेचं असते. चेहरा कसाही असला तरीही नाजूक ओठांनी चेहरा खुलून दिसतो तसेच हिवाळ्यामध्ये ओठांना ओलसर टिकून ठेवणं खूप जिकरीचे काम असते.

ज्या व्यक्तींना वारंवार ओठांना जीभ लावायची सवय असते त्या अशावेळी ओठाची वाट लागायला वेळ लागत नाही. थंड वातावरणाचा आणि हवेचा थेट परिणाम ओठानवर जाणवतो,त्याचप्रमाणे ओठांवर तेल ग्रंथी नसल्यामुळे त्वचा ही लवकर सुखते आणि कोरडी पडते. अशावेळी ह्या ओठाची आग होते व रक्त निघते. त्याचप्रमाणे एक उपाय केल्याने ते नक्की बरे होतील.

यासाठी आपल्याला काही गुलाबाची पाने लागणार आहेत कारण गुलाबाच्या पानांमध्ये विटामिन ई चे प्रमाण असते.ते त्वचेच्या पोषणासाठी खूप फायदेशीर असतात त्याचप्रमाणे ओठाचा जो रंग आहे तो रंग कायम टिकवण्यासाठी ही भूमिका करते तसेच पाच ते सहा गुलाबाची पाने पाण्यामध्ये चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे.

चार-पाच तासानंतर ती पाने आपल्या हातावर घेऊन त्यावर थोडेसे दूध टाकून आपल्या हातावरच चूरगळ्याची आहे. अगदी चांगल्या प्रकारे चुरगळून घ्यायची आहे नंतर त्याची पेस्ट झाल्यावर ती पेस्ट आपल्या ओठांवर लावायची आहे. त्याच प्रकारे दुसरा उपाय आपण बघणार आहोत.

आपल्याला ग्लिसरीन घ्यायचे आहे ,त्यामध्ये गुलाबजल ॲड करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कोरफडीचा गर साधारण एक चमचा ऍड करायचा आहे. हे मिश्रण चांगले ढवळून एकजीव करायचा आहे. हे मिश्रण जरी तुम्ही ओठाला लावले तरी फायदेशीर ठरू शकतात तसेच कि ओठ सुखणे ,रक्त येणे, काळपट होणे या समस्यावर मात होते त्याचप्रमाणे आपले ओठ चांगले राहायला मदत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *