लग्नापूर्वी मुलींनी नक्की करावा हा उपाय; सासरी कोणत्याही प्रकारचा छळ होणार नाही.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुलीचे लग्न यासाठी प्रत्येक आई-वडील खूप मेहनत करत असतात तसेच धावपळ सुद्धा करत असतात. प्रत्येक आई-वडिलांना माहिती असते की मुलगी ही परक्याचे धन असते आणि अशावेळी प्रत्येक आई-वडील आपल्या मुलीला चांगले संस्कार देऊन चांगले शिकवून तिच्यासाठी एक चांगला वर मुलगा शोधत असतात. प्रत्येक आई-वडिलांना माहिती असते की एक ना एक दिवस आपली मुलगी आपल्या सर्वांना सोडून दुसऱ्यांच्या घरी जाईल आणि तिकडे त्या घरातील लोकांना प्रेम करणार आहे व त्यांना जीव लावणार आहे.
प्रत्येक आई-वडील आपल्या मुला मुलींना शिकवत असतात त्यांना लाडाने वाढवतात त्यांचे प्रत्येक हट्ट पुरवत असतात.मुलींना काय हवे काय नको याची दखल घेत असतात. मुलांपेक्षा आपल्या मुलीवर आई-वडिलांचा जास्त जीव असतो कारण की त्यांना माहिती असते की ही मुलगी एक ना एक दिवस दुसऱ्यांच्या घरी जाणार आहे. आपल्या मुलीशी विवाह धुमधडाक्यात व आनंदाने पार पाडावी यासाठी प्रत्येक आई-वडील खूप मेहनत करत असतात आणि प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलीने चांगला संसार करावा व आपल्या मुलीला वर मुलगा सुद्धा चांगल्या पद्धतीचा मिळावा त्याने सुद्धा आपल्याप्रमाणेच आपल्या मुलीची काळजी घ्यायला हवी.
प्रत्येक आई वडिलांची अशी इच्छा असते की आपल्या मुलीने तिच्या सासरी सुखी असायला हवे. तिचा नवरा गरीब असो वा श्रीमंत परंतु त्याने तिला नेहमी सुख द्यायला हवे मुलीकडे पाहून आई-वडिलांना नेहमी समाधान वाटायला हवे अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न झाल्यानंतर मुलगी तिच्या सासरी नेहमी आनंदी असावी व तिच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे दुःख नांदू नये यासाठी विवाहाच्या आधी मुलीच्या हातून हा उपाय अवश्य करायला हवा.
हा उपाय कुमारीका कन्या अवश्य करू शकतात.हा उपाय महादेवांनी आपल्या मुलीच्या म्हणजेच अशोक सुंदरीच्या विवाह दरम्यान सांगितला होता. अशोकसुंदरी ही माता पार्वती व शिवशंकर यांची कन्या होय. जेव्हा अशोक सुंदरीचे विवाह झाले तेव्हा तिच्या पाठवण्याच्या वेळी शिवशंकर व माता महालक्ष्मी यांचे अश्रू अनावर झाले तेव्हा शिवशंभो यांनी अशोक सुंदरीला वर दिला की तू नेहमी माझ्या जवळ राहशील व माझ्या पिंडमध्ये तुझा नेहमी वास राहील.
ज्या कन्या तुझ्या नावाने व्रत करतील त्या मुलींना त्यांच्या भविष्यात कोणत्याही प्रकारे संकट सहन करावे लागणार नाही त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदाने राहील म्हणून प्रत्येक कुमारिकेने शिवशंकर यांची पूजा अर्चना करताना महादेवाच्या पिंडी खाली स्थान असते त्याची पूजा अवश्य करायला हवी.
महादेव हे सांब भोळे आहेत आणि आपल्या मुलीच्या लग्नामध्ये त्यांनी हा वर तिला दिला होता अशा वेळी ज्या कुमारिका अशोक सुंदरी यांची मनापासून पूजा करतात त्यांच्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नंतर त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदाने भरून भिनते त्यांना नेहमी खूप सारे यश प्राप्त होते आणि म्हणूनच अशोक सुंदरीचा आशीर्वाद प्राप्त होतात.
पण त्याच बरोबर त्यांच्या जीवनाला शिवशंकर व माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो आणि म्हणूनच जर तुम्ही कुमारिका असेल व तुम्ही भविष्यात लग्न करणार असाल तर अशा वेळी शिव शंकर यांची पूजा अर्चना तर आपल्याला करायची आहे पण त्याचबरोबर अशोक सुंदरी यांचा व्रत सुद्धा आपल्याला मनापासून करायचा आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.