बाजरीची भाकरी खाणाऱ्या लोकांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

बाजरीची भाकरी खाणाऱ्या लोकांनी हि माहिती एकदा नक्की वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एक काळ असा होता की आपल्या प्रत्येकाच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणी यां सारखी धान्य अगदी अवश्य असायची मात्र आता या सगळयांची जागा आता गव्हाने घेतली आहे. मित्रांनो ज्वारी खायचे अनेक फायदे आहेत. सध्या थंडीचा काळ म्हणजेच हिवाळा चालू आहे आणि या काळात शरीरात गरमी तयार करण्यासाठी बाजरीचे सेवन नक्कीच केले पाहिजे.

त्याच बरोबर W’H’O ने सुद्धा केलेल्या एका सर्वे मध्ये आता मान्य केले आहे की बाजरीचे सेवन केल्यास शरीरात ऊर्जा निर्माण शरीरात रोगाशी लढणारे अँटी बॉडीस तयार होतात व रोग प्रतिकारक शक्ती ही वाढते. मित्रांनो बाजरीमध्ये फायबर 17 टक्के आहेत तसेच कर्बोदके 25 टक्के आहेत उष्णांन 756 टक्के आहेत जीवनसत्व ब 6 जीवनसत्व क 12 या सारखे महत्वाचे जीवनसत्व या बाजरीत आहेत.

आयरन, लोह त्याबरोबर झिंक सुद्धा मुबलक प्रमाणात तुम्हाला बाजरी मध्ये मिळेल. म्हणूनच बाजरी अन्न म्हणून अतिशय उत्तम ठरते म्हणूनच या आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही बाजरीचे सेवन कराल तर तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते कारण या बाजरीतील पोटैशियम रक्त पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम करतो.

मित्रांनो बाजरीमध्ये जे फायबर आहेत ते पचनक्रिया व्यवस्थित घडवून आणतात. त्याच बरोबर बाजरीच्या सेवनाने हादे देखील मजबूत होतील. त्याच बरोबर आज कल सगळी कडे समान्य होत चाललेला आजार म्हणजे मधूमेह या रोगसाठी सुद्धा बाजरी अत्यंत फायदेशीर आहे. ज्यांना मधुमेह झाला आहे ते सुद्धा अगदी आवर्जून बाजरीचा आस्वाद घेवू शकतात याने त्यांना कसलाच त्रास होणार नाही या उलट त्यांची प्रकृतीत सुधार येवू लागेल. आपल्याला आम्ल-पित्ताचा त्रास असेल तर या वर सुद्धा बाजरी खूप उपयुक्त आहे.

मित्रांनो बाजरीच घाटा तयार केला जातो ज्यांना सर्दी-पडश्याचा त्रास आहे अश्या लोकांनी बाजरीच घाटा तयार करावा थोडक्यात सांगायचे झाले तर घाटा बनविण्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये बाजरीचे पिठ टाकायचे आहे सोबत थोडासा गूळ व काळीमिरी बारीक वाटून या पाण्यात उकळून घ्यायची आहे. चांगला उकळला की हा घाटा तयार होतो चहा सारखा हा प्यायचा आहे तुमची सर्दी आणि खोकला दोन्ही छूमंतर होवून जातील. सोबतच बाजरीचे पिठ हे तव्यावर टाकून जर आपण त्याचा धूर घेतला तरी सुद्धा आपली सर्दी लगेच बरी होईल.

ज्यांचे पोट खराब होते ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांनी बाजरीचे सेवन नक्की केले पाहिजे कारण या बाजरीमध्ये फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. हे फायबर आपले पचनकार्य सुरळीत करतातच शिवाय हे रक्तातील खराब कोलेस्टेरॉल काढून चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात इतका मोठा फायदा या बाजरीचा आहे.

ज्यांना केस गळतीचा त्रास आहे अश्या लोकांनी आपल्या आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करा. बाजरीमध्ये असे अनेक घटक आहेत जे तुमच्या केसांची मूळ मजबूत करतात तसेच केसात जर कोंड्याची समस्या असेल तर ती सुद्धा दूर होते. ज्यांना दम्याचा त्रास आहे अथवा श्वसनाचे विकार आहेत त्यांनी हा त्रास कमी करण्यासाठी बाजरीचे सेवन नक्की करावे.

त्याच बरोबर वाढलेले वजन सुद्धा कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त आहे कारण यामुळे शरीरातील चरबी कमी होते. परंतू मित्रांनो एवढे सगळे फायदे ऐकून जर तुम्ही बाजरीचे अति सेवन केलेत तर शरीरातील गरमी तर वाढेलच मात्र थायरोइड सुद्धा वाढू लागतील. बाजरीमध्ये असे काही घटक आहेत जे आयोडिनला शोषून घेतात म्हणूनच ज्यांना थायरोइड आहे त्यांनी बाजरीचे सेवन करु नये. कोणती ही गोष्ट प्रमाणात करा त्याचा लाभ आपल्याला नक्की होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *