अशा पद्धतीने काळा धागा चुकून सुद्धा बांधू नका; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

अशा पद्धतीने काळा धागा चुकून सुद्धा बांधू नका; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपण पाहतो की जेव्हा एखादे बाळ जन्माला येते तेव्हा त्याच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्या बाळाच्या पायामध्ये काळा धागा बांधतात. कपाळाला काळा टिक्का लावतात परंतु हे करण्यामागे नेमकी काय कारण असते? हे कधी तुम्ही मोठ्या माणसांना विचारले आहे का? तंत्रज्ञानाची झालेली प्रगती आणि उंचावलेले जीवनमान यामुळे आपण दिवसेंदिवस प्रगतीच करत आहोत परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या चालीरीती धार्मिक गोष्टी मागे विसरत आहोत आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्या संस्कृतीवर सुद्धा होताना पाहायला मिळत आहे.

आज आपण प्रगती करून वाटचाल करत आहोत, त्या समाजात अनेकदा काम, क्रोध ,मोह लोभ मत्सर भांडणं अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशावेळी आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी आपल्याला सांगितले आहेत त्या गोष्टींच्या आधारे आपण आपल्या जीवनातील काही दुःख कमी करू शकतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. ही माहिती काळा धागा संदर्भात आहे आणि या धाग्याचे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे याबद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

जर तुम्हाला असे वाटत असेल की, आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आपल्याला कुणाची नजर लागलेली आहे. जीवनात काही चांगल्या गोष्टी घडत नाही आहे तर हा लेख तुम्हाला या सगळ्या समस्येपासून बाहेर पडण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. आता सांगू इच्छितो की काळा रंग हा नकारात्मक ऊर्जेला नष्ट करणारा असतो आणि म्हणूनच अनेकदा आपण पाहिले असेल की एखाद्या व्यक्तीला नजर लागू नये म्हणून काळया रंगाचा धागा, काळा टिक्का, काळे काजळ लावले जाते.

तुमच्या घरामध्ये दुःख क्लेश भांडण होत असतील, घरातील सदस्य तुमच्या सोबत चांगले वागत नसतील तसेच प्रत्येकाचे मन उदास झाले असेल तर अशावेळी तुम्ही एक उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मीटर काळया रंगाचा धागा द्यायचा आहे आणि त्यामध्ये 108 गाठी बांधायचे आहेत. प्रत्येक गाठी सोबत आपल्याला ओम शनी देवाय नमः या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि हा धागा आपल्याला जवळच्या शनी देव मंदिरात ठेवायचा आहे.

जर तुमच्या आजूबाजूला शनि देवाचे मंदिर नसेल तर तुम्ही हा उपाय घरात सुद्धा करू शकता आणि असे केल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ हा धागा आपल्याला बांधायचा आहे, असे केल्याने काही दिवसांमध्ये तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल आणि सकारात्मक उर्जा प्रवेश करू लागेल. तुमच्या घरातील सदस्य आनंदाने एकमेकांशी वागू लागते. प्रत्येक जण प्रेमभाव प्रत्येक सदस्याशी बोलू लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये नेहमी आनंदी आनंद निर्माण होऊ शकेल.

जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर अशावेळी काळा धागा घ्या आणि धाग्याला शेंदूर लावून मंदिरात ठेवा आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर हा धागा आपल्याला आपल्या पायामध्ये बांधायचा आहे, असे केल्याने त्या व्यक्तीच्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जाणार आहे. त्या व्यक्तीच्या आरोग्यामध्ये फरक जाणवेल.

ग”र्भ”व” ती महिलेला लवकर लोकांची नजर लागते, अशा वेळी याचा विपरीत परिणाम येणाऱ्या बाळावर सुद्धा होऊ शकतो. या नजरेपासून आपल्या संरक्षण प्राप्त करायचा असेल तर महिलेच्या उंची एवढा काळा घेऊन आपल्याला तिच्या डोक्यावरून तीन वेळा उतरायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे, असे बाळ जन्माला येईल तोपर्यंत आपल्याला करायचा आहे.

तसेच मंगळवारच्या दिवशी व शनिवारच्या दिवशी भगवान शनिदेव यांची पूजा आराधना करायला विसरू नका कारण की शनिदेवाच्या कृपादृष्टीने आपले जीवन आनंदात व्यतीत होईल. तुम्हाला सुद्धा या समस्या जीवनामध्ये उद्भवत असतील तर हा उपाय अवश्य करा आणि आपले जीवन चांगले बनवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *