जर तुमच्या शरीरावर हि काही लक्षणे दिसल्यास समजा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हिंदू धर्म शास्त्रामध्ये शनिदेव यांना खूप महत्त्व आहे. शनिवारचा दिवस शनी देव यांना समर्पित केलेला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर शनि देवाची कृपा होते तेव्हा ती व्यक्ती सर्व सुख आणि संपन्न होते पण ज्या व्यक्तीवर शनिदेव शनिदेव कृपा दाखवत नाही, क्रोधीत होतात त्यांच्यावर साडेसाती आल्याशिवाय राहत नाही. साडेसातीचे नाव ऐकताच मोठी मोठी माणसे सुद्धा हैराण होऊन जातात. शनिदेव अत्यंत न्यायप्रिय आहेत.
शनिदेव जे वाईट लोक असतात त्यांच्या मागे नेहमी पिडा लावतात व जे सज्जन गरीब व्यक्ती आहेत चांगल्या मनाचे आहेत त्यांच्या मागे नेहमी चांगल्या शक्तीप्रमाणे पाठीशी उभे राहतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शनि देवाची साडेसाती येते तेव्हा श्रीमंत व्यक्ती सुद्धा गरीब होऊन जातो परंतु काही व्यक्तींसाठी शनिदेव अत्यंत शुभ ठरतात सूर्यपुत्र शनिदेव यांची जर आपण मनापासून पूजा-अर्चना केली तर आपल्यावर श्री शनिदेव नेहमी प्रसन्न होतात आणि आपल्या मागे ज्या काही अडचणी आहेत, कटकटी आहेत, पीडा आहेत त्या पूर्णपणे नष्ट करतात यासाठी आपण मनापासुन त्यांना श्रद्धेने सामोरे जाणे गरजेचे आहे.
आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक ग्रंथांमध्ये अशी काही माहिती सांगण्यात आलेली आहे त्या माहितीनुसार अशी काही लक्षणे आहेत ती ज्या व्यक्तीच्या बाबतीत घडू लागले तर याचा अर्थ असा की तुमच्यावर श्री शनिदेव यांची कृपा दृष्टी होत आहे आणि तुमच्या जीवनात नक्कीच भविष्यात काही तरी चांगल्या गोष्टी घडणार आहे, याचा संकेत दर्शवणार आहे. हे चला तर मग जाणून त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि नेमके कोणते संकेत आहे याबद्दल..
ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये शनि देवाची कृपादृष्टी होत आहे अशा व्यक्ती दिसायला सडपातळ असतात आणि त्यांचे केस गडद असतात अशा प्रकारच्या व्यक्ती खूपच शिस्तप्रिय असतात आणि त्यांचे राहणीमान सुद्धा शिस्तप्रिय दर्शवणारी असते. ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये शनि देवाची कृपा दृष्टी असते अशा व्यक्ती मोठ्या संकटाला मधून सुद्धा बाहेर येतात आणि आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रगती करू लागतात.
अशा व्यक्ती स्वाभिमानी स्वभावाचे असतात. कोणत्याही व्यक्तीची मदत न करता आपले जीवन स्वाभिमानाने, मेहनतीच्या आधारावर जगण्यासाठी पुढे येत असतात. या प्रकारच्या व्यक्ती खूप मेहनती असतात आणि आपल्या कष्टाच्या जोरावर यश गाठतात. जर तुमच्यावर शनिदेवाची कृपादृष्टी असल्यास तुम्ही स्वतःला खूपच शक्तिशाली व सामर्थ्यशाली समजतात आणि प्रत्येक कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी समर्थ असतात.
जर तुम्ही भावनिक स्वभावाच्या व्यक्ती असल्यास, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर जीव लावला ती व्यक्ती तुमच्यावर सुद्धा जीव लावण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करू लागतात आणि त्या व्यक्तीचा साथ व हात भविष्यात कधीच सोडत नाही. ज्या व्यक्ती कामांमध्ये कुचराईपणा करतात, दिलेले काम व्यवस्थित करत नाही अशा व्यक्ती तुम्हाला अजिबात आवडत नाही तसेच तुम्हाला प्रत्येक दिलेले कार्य व्यवस्थित नाही आणि शिस्तप्रिय आणि नीट कार्य करणे आवडत असते.
तुमच्या अंगी सुद्धा हे काही लक्षणे असतील तर समजा की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहे. शनि देवाची कृपा तुमच्यावर झालेली आहे आणि जर नसेल झाली तर काही दिवसांमध्ये तुमच्यावर होणार आहे अशी आशा बाळगावी. खूप मेहनत करून सुद्धा जर तुम्हाला यश प्राप्त होत नसेल तर अशा वेळी शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे.
शनिवारच्या दिवशी शनी मंदिर मध्ये जाऊन त्यांना तेल वाहणे अत्यंत शुभ मानले जाते व त्याचबरोबर शनिदेवांना मोहरीचे तेल वाहने आपल्या जीवनातील सर्व संकटे पूर्णपणे नष्ट होऊन जातात त्याच बरोबर पिंपळाच्या झाडाखाली एक तेलाचा दिवा प्रज्वलित केल्यानेसुद्धा आपल्या जीवनातील अनेक अडचणी नष्ट होऊन जातात.
शनिवारच्या दिवशी शनी मंदिर मध्ये जाऊन काळया वस्तूचे दान केल्याने सुद्धा शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतात. ज्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपादृष्टी होते त्या व्यक्तीवर शनिदेव नेहमी प्रसन्न असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता भविष्यात निर्माण होत नाही आणि म्हणूनच जर तुम्हाला शनिदेव त्यांची कृपादृष्टी प्राप्त करायचे असेल तर त्यांची आराधना मनापासून करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.