कसलेही दुर्भाग्य असो या वस्तूंचे दान केल्याने दूर होते; घरात येते सुख, शांती आणि भरभराट.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिव महापुराण अनुसार सोमवारच्या दिवशी या सहा वस्तूंचा अवश्य करायला हवे. असे केल्याने आपल्या जीवनातून दुर्भाग्य दूर होईल. दुर्भाग्य म्हणजे तुम्हाला तुमचे भाग्य साथ देत नसेल. कामे होता होता थांबत असतील, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्रास असेल, काही दुःख असेल की ज्यातून मुक्ती मिळत नाहीये ,तुम्हाला जो त्रास होतो तो तुम्ही कोणाबरोबर वाटून घेऊ शकत नाही.
या त्रासाबद्दल तुम्ही कुणाला सांगू शकत नाही. हे सर्व त्रास ही सर्व दुःख या सर्व वेदना दूर करण्यासाठी आणि नशिबाची साथ प्राप्त करण्यासाठी आपण अनेकदा वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो. आपल्या नशिबातुन दुर्भाग्य जाण्यासाठी आपल्याला या वस्तूचे दान आवश्य करायचे आहे. तसेच महादेव यांना शरण जायचे आहे त्यामुळे आपले दुर्भाग्य संपून आपले नशिब बदलते.
तुमच्या हातून कळत नकळत काही घडले असेल तर त्याबद्दल त्यांची माफी मागा त्यांना शरण जा आणि दुःख कष्ट दूर करण्याची प्रार्थना करा. सोमवारच्या दिवशी या वस्तू दान करायचे आहे त्यातील पहिली वस्तू म्हणजे मीठ.जर तुमच्या कडे खडे मीठ असेल अति उत्तम आहे. मिठाचे खडे हे जाड असतात ते असेल तर अतिउत्तम आहे नसेल तर अगदी साधारण तुम्ही दररोज मीठ वापरतात याचा दान केले तरीही चालेल.
अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही की हे मीठ आपल्या हातात घेऊन ते कधीही दान करू नका तुम्ही ज्या भांड्यात मीठ द्याल ते भांडे खाली ठेवा आणि समोरच्या व्यक्तीला ते स्वीकारण्याची विनंती करा.आपल्या हातून आपण मीठ कधीही दुसऱ्याला देऊ नये अन्यथा घरातून लक्ष्मी जाण्याचा धोका संभवतो, त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड त्रास आहेत त्यांनी सोमवारच्या दिवशी मीठ अवश्य दान करा.
ज्या घरामध्ये सासू-सुनेचे पटत नाही,मुलगा आणि वडील यांच्या पटत नाही, पती-पत्नीमध्ये सतत वादविवाद असतात,नातेसंबंध खराब झालेले आहेत नात्यांमध्ये दुरावा नाही ते नाते गोड करण्यासाठी नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी मीठ अवश्य करा त्यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलाचे पान. बेलाचे पान हे महादेव यांना अतिशय प्रिय आहे. जी व्यक्ती महादेवांना बेल अर्पण करते त्या व्यक्ती वर महादेव लवकर प्रसन्न होतात.
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महादेव हे असे एकमेव देव आहेत जे भक्तांची पूजा लवकर स्वीकारतात आणि भक्तांवर आपली कृपा दृष्टीचा वर्षाव करत असतात. जर तुमच्या जीवनामध्ये खूप सारी संकटे येत आहेत अनेक अडचणी येत आहेत आणि या संकटांना तुम्ही सामोरे जात आहात तर अशावेळी महादेवांना मनोभावे बेलपान अर्पण करा आणि हे बेलपान अर्पण करताना तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी महादेवांना अवश्य सांगा.
जर तुम्ही असे सोळा सोमवार जर महादेवांना बेलपत्र वाहिले तर तुमचे नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक गोष्टी घडू लागतील म्हणून महादेवांना शरण जाणे नेहमी चांगले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.