तोंड येण्यावर हा घरगुती रामबाण उपाय एकदा नक्की करा; एका रात्रीच मिळेल पूर्णपणे आराम.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तोंड आले की काही सुचत नाही. काय खायला सुद्धा येत नाही आणि काही प्यायला सुद्धा येत नाही. जिभेवर पांढरा थर जमा होतो आणि ओठांवर लाल जखम तयार होते. शरीरामध्ये उष्णता वाढली की तोंडाला फोड येतात, त्याला आपण तोंड येणे व अल्सर येणे असे म्हणतो.
या समस्येवर लवकर तोडगा काढण्याचे उपाय आम्ही तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत. तोंड येण्यापूर्वी त्याचे कारणे समजून घेणे गरजेचे आहे. तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यात आले किंवा शरीरामध्ये भयंकर उष्णता निर्माण झाल्यास
तापाचे प्रमाण वाढू लागल्यास अशावेळी फोड येतात त्याचबरोबर शरीरातील लोहाचे प्रमाण जर कमी झाल्यास तुम्हाला तोंड येण्याचा त्रास होऊ शकतो यावर परिणाम कारक असा उपाय म्हणजे पेरूची पाने.
पेरूच्या पानांमध्ये अंटीबॅक्टरियल चे गुणधर्म असतात शिवाय अनेक जीवनसत्व सुद्धा असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पेरूची पाने चावून चावून खायची आहेत आणि या पानांचा रस आपल्याला प्यायचा आहे किंवा जर तुम्हाला शक्य झाल्यास पेरूच्या पानाचा काढा बनवून देण्यात प्यायल्यास तरी तोंड येण्याचा त्रास कमी होतो.
सर्वात महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे हळद. हळदीला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व प्राप्त आहे त्याचबरोबर हळद मध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असल्यामुळे अनेक आजारांवर हळद उपयुक्त ठरते. या समस्येवर उपचार करण्यासाठी आपल्याला हळद एका ग्लासमध्ये घेऊन त्या पाण्याने गुळण्या करायचे आहेत. असे केल्याने तोंड आलेल्या जख मेला हळदीच्या गुणधर्मामुळे आळा बसेल आणि तुम्हाला जळजळ किंवा त्याचा त्रास होणार नाही.
तोंड येण्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण तुळशीच्या पानांचा सुद्धा उपयोग करणार आहोत. यासाठी आपल्याला तुळशीची चार-पाच पाने चावून चावून खायची आहे आणि त्याचा रस प्यायचा आहे. तुळशीच्या पानांमुळे सुद्धा तोंड येणे थांबून जाते.
या उपायासाठी तुम्ही मिठाचा सुद्धा वापर करू शकता त्याकरीता तुम्हाला कोमट पाण्यामध्ये थोडेसे मीठ टाकून गुळण्या करायचे आहे. त्याचबरोबर सुके खोबरे सुद्धा या समस्येवर रामबाण उपाय ठरते. खरंतर सुकेखोबरा मध्ये खूप सारे जीवनसत्व आणि सिग्न पदार्थ असतात या सगळ्या पोषक तत्त्वामुळे तोंड देण्याच्या समस्येला आळा बसतो आणि तोंड आल्यामुळे जी काही जखम झालेली असते ती लवकर भरून निघते.
या उपायासाठी आपल्याला विड्याची पानं म्हणजेच नगवेलीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला विड्याची पानं बारीक वाटून त्यामध्ये थोडेसे मध मिसळायचे आहे आणि या मिश्रणाचा वापर करून तुम्ही तोंड येण्याचे समस्येपासून मुक्तता मिळू शकता.
तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.