पक्षी अंडी का देतात.? पिल्ले का नाही.? यामागचं खरं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपला निसर्ग खूप मोठा आहे. ह्या निसर्गात अनेक छोटे-मोठे जीव जंतू राहतात. काही अवाढव्य मोठे तर काही एवढे लहान आणि सूक्ष्म की आपल्या डोळ्यांना देखील दिसत नाहीत. मित्रांनो करोडो वर्षांपूर्वी सजीवांची या धरतीवर उत्पत्ती झाली होती. शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनामध्ये असे सांगितले आहे की पहिला जीव जो धरतीवर उत्पन्न झाला तो धरतीवर नव्हे पाण्यात उगमास आला. सर्वात पहिला सजीव वनस्पतीच्या स्वरूपात धरतीवर आला.
त्यां नंतर हळूहळू सजीवांमध्ये प्रगती होत गेली व सजीवांमध्ये विविधता आली. त्या एक सूक्ष्म जिवापासून आजच्या तारखेत लाखो करोडो सजीव पृथ्वीवर वास्तव्य करताना आपल्याला दिसतात. मित्रांनो पिढी वाढवण्यासाठी प्रजनन हा एक खूप महत्वाचा भाग आहे प्रजनन जर झालेच नाही तर तो सजीव या पृथ्वी तलावरुन नाहिसा होईल.
पृथ्वीवर दोन प्रकारचे सजीव राहतात एक जे पिल्लाला जन्म देतात व दुसरे जे अंडी घालतात. पण असे का होत असेल याचा विचार तुम्ही केला आहात का ? याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे देवू म्हणून सदर लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. मित्रांनो सजीव हे आपली पिढी वाढवण्यासाठी प्रजनन करतात. प्रजननासाठी एकाच जातीतील दोन प्रकारचे सजीव -लैं-गि-क- संबंध प्रस्थापीत करतात.
एकास नर आणि दुसर्यास मादी असे संबोधले जाते. नर आपले अंश हे मादीच्या यो-नी- मार्गे तिच्या -ग-र्भा-मध्ये सोडतो. जेव्हा ही क्रिया संपन्न होते तेव्हा काही महिन्यांच्या अवधी नंतर मादी नवजात बालकाला जन्म देते व अश्या प्रकारे ही पिढी पुढे चालत राहते. काही सजीव अंडी देतात तर काही पिल्ले घालतात याचे कारण असे आहे की अंडी हे पक्षी घालतात त्यांना वैद्यांनिक भाषेत ‘अंडज’ असे म्हंटले जाते.
उदा. कोंबडी, कबूतर, पोपट व कावळा इत्यादी. तर प्राणी जे उडू शकत नाहीत ज्यांना पंख नसतात ते पिल्ले घालतात व त्यांना ‘जरायुज’ असे म्हणतात उदा. माकड, मानव, कुत्रा व मांजर इत्यादी. अंडज सजीवांमध्ये प्रजननाचे अवयव हे जरायुज सजीवांसारखे असतात मात्र त्यांचे गर्भाशय हे एकमेकांपेक्षा भिन्न असतात. अंडज प्राण्यांमध्ये पिल्ले जन्म घालण्याची शक्ती नसते व हे नैसर्गिक आहे म्हणून ते अंडी देतात व आपली जात- पिढी पुढे वाढवतात.
ही अंडी देण्याचा ही एक ठरलेला मोसम असतो कालावधी असतो. अंडी दिल्यानंतर त्या अंड्यातच जन्माला येणार्या पिल्लाचा विकास होतो व काही महिन्याने ते बाहेर येवून जगाला गवसणी घालते. मित्रांनो निसर्गाने प्रत्येकाला काही ना काही देणगी दिलेली आहे. जरायुज हे अंडज जीवांपेक्षा प्रबळ आणि प्रभाव शाली जरी असले तरी ही ते उडू शकत नाहीत. काही प्राणी असे ही आहेत जे अंडी देतात पण उडू शकत नाहीत.
साप, कासव, मासे, युक्यलेप्टस व पाल इत्यादी असे प्राणी आहेत ज्यांमध्ये जरायुज यांचे गुणधर्म असून ते अंडी घालतात. ही सर्व निसर्गाची माया आहे. निसर्गाने सगळ्यांच्या सोयी प्रमाणे त्यांना काही ना काही देणगी ही दिलेलीच आहे. म्हणूनच या निसर्गाचे आपण संवर्धन केले पाहिजे व ‘ झाडे लावा झाडे जगवा ‘ व ‘ नष्ट होणारे प्राणी वाचवा ‘ अश्या काही मोहिमा आपण नक्कीच राबवल्या पाहिजेत यामुळेच मानवाची येणारी पिढी या विविध प्राण्यांना डोळ्यादेखत पाहू शकेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.