अंगावर या ठिकाणी तीळ असलेल्या व्यक्ती असतात खूपच भाग्यवान.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाच्या शरीरावर कुठे ना कुठे आपल्याला तीळ पाहायला मिळतेच. शरिरावर तीळ असल्याने अनेकदा आपले सौंदर्य खुलून दिसते. वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असणे हे उत्तम मानले जातेच त्याचबरोबर यामुळे आपले सौंदर्य वाढवत सुद्धा असते म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आपल्या शरीरावर कोणत्या भागावर तीळ असणे शुभ मानले जाते आणि अशुभ मानले जाते याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
जर तुमच्या कपाळावर उजव्या बाजूला तीळ असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात पण जर तुमच्या डाव्या कपाळावर तीळ असेल तर अशा व्यक्तींचे जीवन निराशेने भरलेले असते त्यांच्या जीवनात पैसा टिकत नाही. ज्या व्यक्तींच्या उजव्या डोळ्यात तीळ असेल तर त्या व्यक्ती खूपच स्वच्छ विचारसरणीचे असतात आणि जर डाव्या डोळ्याच्या मध्ये तीळ असेल तर ती व्यक्ती नकारात्मक विचार करणारी असते.
जर व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर ते शुभ मानले जाते व अशा प्रकारच्या व्यक्तीला जीवनामध्ये नेहमी धन प्राप्त होते. जर डाव्या गालावर तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी पैसा खर्च होत असतो. अनेक संकटे सुद्धा येत असतात. कानावर तीळ असणे हे व्यक्तीचे दीर्घायुष्य देणारे मानले जाते आणि जर मुखमंडलावर तीळ असेल तर स्त्री व पुरुष हे दोन्ही सुखी व सज्जन असल्याचे प्रतीक असते.
ज्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असते अशा प्रकारच्या व्यक्ती सुखी संपन्न व प्रतिभाशाली असतात असे मानले जाते. ज्या स्त्रियां च्या नाकावर तीळ असते अशा प्रकारच्या व्यक्ती महिला सौभाग्यवती असल्याचे मानले जाते. ज्या व्यक्तींच्या डाव्या दंडावर तीळ असते अशा प्रकारच्या व्यक्ती भांडखोर असतात. आपल्या बोलण्याने वागण्याने समाजामध्ये एक दहशत निर्माण करत असतात.
या बदलामुळे समाजामध्ये त्यांचा नेहमी अपमान होत असतो ज्या व्यक्तीच्या उजव्या दंडावर तीळ असते अशा व्यक्ती नेहमी समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करत असतात. समाजामध्ये त्यांचे कौतुक केले जाते त्यांना मानसन्मान मिळत असतो.
उजव्या हातावर तीळ असणारे व्यक्ती धनवान बलवान मानली जाते व त्याचबरोबर डाव्या हातावर तीळ असणारी व्यक्ती खर्चिक असते असे समजले जाते. ज्या व्यक्तीच्या अनामिकावर तीळ असते ती व्यक्ती धनी व प्रतिभाशाली सुख संपन्न असलेली मानली जाते. म्हणून अशा प्रकारे आपल्या शरीरावर असणारी तीळ फक्त आपल्या सौंदर्यात वाढ होत नाही तर भविष्यात घडणाऱ्या अनेक घटनांचे सूचक सुद्धा असते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.