कॅलेंडरवर लिहा फक्त हे २ शब्द; मनातली कोणतीही उच्च होईल लगेच पूर्ण.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा नक्की असते माझे स्वत:चे घर असावे नवीन गाडी असावी मला चांगली नोकरी असावी लग्न व्हावं अगदी कोणत्या ही प्रकारची इच्छा आपली असू शकते तर मित्रांनो अशी कोणती ही इच्छा पुर्ण करण्यासाठी आपण कैलेंडर मधला एक प्रभावशाली उपाय पाहणार आहोत. या साठी आपल्याला चालू वर्षाच कैलेंडर घ्यायचं आहे सध्या 2022 हे साल चालू आहे तर आपण ह्या वर्षीचं कैलेंडर घ्यायचे आहे.
मित्रांनो हे कैलेंडर घेतल्या नंतर या कैलेंडरमध्ये जे बारा महिने आहेत जानेवारी पासून ते डिसेंबरपर्यंत यां मधल्या कोणत्या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण व्हाव्यात अस तुम्हाला वाटत तो महिना आपण निवडायचा आहे तो महिना आपण अगदी काळजी पूर्वक पहायचा आहे या महिन्यात जेवढे पण दिवस आहेत ते अगदी निरखून बघायचं आहे.
जी तारीख आपल्याकडे आकर्षित करते उदाहरण द्यायचे झाले तर तुम्हाला अस वाटत की एखाद्या तारखेला तुमच घर बनायच आहे किंवा या तारखेला तुम्हाला एखादं वाहन खरेदी करायच आहे म्हणजेच तुम्हाला वाटतं की पाडव्याच्या दिवशी तुमच्या घरी नवीन कार यायला हवी तर पाडव्याची तारीख तुम्हाला आकर्षित करु शकते. बारा महिन्यातील जी तारीख तुम्हाला आकर्षित करते त्या महिन्याकडे त्या तारखे कडे तुम्हाला पहायचं आहे.
मित्रांनो अश्या तारखेला पेनाने गोल करायचं आहे. काळा पेन वगळता तुम्ही कोणता ही पेन वापरु शकता. त्या बरोबरच त्या गोलामध्ये जी इच्छा तुमच्या मनात आहे तीच इच्छा पेनाच्या मदतीने लिहायची आहे. मित्रांनो इच्छा लिहताना ती नेहमीच वर्तमान काळात लिहायची आहे. उदाहरण द्यायचे झाले तर ‘ माझी नविन कार घरी आलेली आहे ‘. इच्छा लिहताना पूर्ण विश्वासाने लिहायची आहे.
तसेच ही तारीख अथवा महिना निवडण्यापूर्वी आपल्या कुल दैवतेचे स्मरण करण्यास विसरु नका. आपले जे कुल दैवत आहे इष्ट देव आहेत किंवा ज्यांना आपण गुरु मानतो जी तुमची आवडती देवता आहे त्यांचे स्मरण करावे आणि आपल्या कुल देवतेचा आशिर्वाद घेवूनच आपण हा उपाय करण्यास प्रारंभ करायचा.
आपण कैलेंडर काढले त्यात आपल्या मनातील इच्छा लिहली की आपण परत चालू तारखेला कैलेंडर सेट करायचं आहे म्हणजेच आजची जी तारीख आहे त्या तारखेला कैलेंडर सेट करुन ठेवा. अधून-मधून जेव्हा तुम्हाला आठवेल की अश्या प्रकारच लक्ष्य तुम्ही ठरवून ठेवलं आहे एखादं ध्येय निश्चीत केलेलं आहे तेव्हा या तारखेवर पुन्हा जा आणि पुन्हा स्मरण तसेच मनामध्ये अशी कल्पना करा की तुम्ही या तारखेला हे ध्येय पूर्ण करणारच आहात. हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे.
मित्रांनो तारीख निश्चीत करण्यापूर्वी कैलेंडरकडे निट निरखून पाहणे खूप गरजेचे आहे. ज्या महिन्यात तुम्ही तुमच ध्येय पुर्ण करणार आहात त्या सर्व तारखांकडे अगदी त्राटत पाहणे खूप आवश्यक आहे . त्या बरोबरच तारीख ठरवताना मन शांत असणं खूप महत्वाच आहे. नेहमी एकाग्रचित्ताने तारखेकडे पहावे. कोणी तरी तुमचं लक्ष विचलित करत असेल अथवा तुम्ही घाई मध्ये कधीच तारीख ठरवू नका. मित्रांनो असा हा साधा सोपा पण अतिशय कारगर असा उपाय आहे. त्या बरोबरच मित्रांनो आम्ही जसे आधी सांगितले स्वत: वर विश्वास असणे फार आवश्यक आहे शिवाय प्रयत्नांची जोड देखील तेवढीच महत्वाची आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.