हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत असणाऱ्या स्त्रियांनी हि माहिती एकदा नक्की वाचा..
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो लग्न झाल्यांनतर बऱ्याचश्या स्त्रिया हातात हिरव्या बांगड्या घालतात. तसेच बऱ्याचश्या स्त्रिया हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसतात. या पाठीमागे काही कारणं आहेत का.? हिंदू धर्मशास्त्र या विषयी काय सांगत हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी-वाढ होते. म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढत असं हिंदू धर्मशास्त्र मानत. आणि म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्यात, तसेच हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसायला हवी. केवळ पतीचं आयुष्य वाढत इतकंच नव्हे तर पतीचं आणि त्यांच्या सासरचं नशीब सुद्धा उजळतं.
दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठीचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद निसर्ग देवतेकडून आपणास मिळत असतो. हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा एक जवळचा संबंध आहे. आणि आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालता, हिरव्या रंगाची साडी नेसता तेव्हा आपलं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जातं. आणि म्हणूनच निसर्गाकडून आपला पती सुरक्षित राहावा, आपलं सौभाग्य सुरक्षित राहावं अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो.
ज्या लोकांना करिअर मध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात. याच कारण असं आहे कि हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे. करिअर आणि उद्योगधंद्यामध्ये जर यश मिळवायचे असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्वाचा आहे. कारण बुधाचा संबंध या व्यापार आणि करिअर संबंधी येतो. आणि म्हणून जर तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी आणि बांगडी घातली पाहिजे.
अजून एक महत्वाचं कारण असं आहे कि जेव्हा तुम्ही हिरव्या संगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालता त्यावेळी भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात. शिवशंकरांचं आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे. आणि म्हणूनच विशेष करून श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली तर अशा स्त्रियांवर भगवान शिव शंकरांची कृपा बरसते, आपल्या मनातील सर्व इच्छा त्यावेळी पूर्ण होऊ शकतात. केवळ भगवान शिव शंकरांचीच नव्हे तर भगवान श्री हरी श्री विष्णूंची सुद्धा कृपा आपल्यावर राहते.
जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडी-अडचणी असतील, पतिपत्नींमध्ये सौख्य नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर अशावेळी आपण आपल्या घराचा जो अग्नेय कोपरा आहे, अग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशामधील जी मधली बाजू आहे तो कोपरा आपण हिरव्या रंगाने रंगवला तर वैवाहिक जीवनामध्ये सौख्य निर्माण होऊ शकतं. पतिपत्नींमध्ये प्रेम वाढावं यासाठी सुद्धा आपण उपाय करू शकता.
तर मित्रांनो हिरव्या बांगड्या का घालाव्या..?, हिरवी साडी का नेसावी..? या विषयी माहिती आज तुम्हाला नक्कीच समजली असेल. आशा करतो कि हि माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आवडल्यास तुमच्या मित्रपरीवाला शेअर करायला नक्कीच विसरू नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.