विधवा स्त्रिया पांढरी साडी का नेसतात.? तुम्हाला माहीत आहे का.? हे आहे त्या मागील कारण.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेव्हा एखाद्या महिलेचे लग्न होते तेव्हा तिच्या आयुष्यात रंगाचे वेगळेच महत्त्व असते.वेगवेगळ्या रंगाने समृद्ध होऊन ती आपले जीवन रंगवत असते परंतु कधीकधी आकस्मित घटनांमुळे महिलेच्या जीवनामध्ये असे काही बदल घडतात ते अनपेक्षित असतात. अनेकदा महिलेचा पती अपघाताने, आजारपणाने मृत्यू पावतो आणि संपूर्ण जीवनाचे रंग सुद्धा उडून जातात अशा वेळी एकच रंग अनेकदा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पांढरा रंग.
अनेकदा विधवा महिला पती मृत पावल्यावर पांढर्या रंगाची साडी नेसलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी बऱ्याच वेळेस आपल्याला या महिला पांढरी साडी नेसलेली दिसतात. आपल्या आजूबाजूला आपण अनेकदा विधवा स्त्रिया पाहत असतो. या विधवा स्त्रियांनी आपल्या शरीरावर पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली असते मग अशावेळी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की या महिला फक्त पांढऱ्या रंगाची साडी का परिधान करतात? आणि वेगेवेगळया रंगाची साडी जास्त प्रमाणामध्ये परिधान का करत नाही ? जर तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला असेल तर या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
कोणताही धर्म आपल्याला असे अजिबात सांगत नाही की एखाद्या महिलेचा पती जेव्हा मृत पावतो तेव्हा त्या पतिबद्दलचा ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी महिलांनी पुढील आयुष्य काढत राहावे. एखाद्या महिलेचा पती मृत पावला आणि जर त्या महिलेला पुढील आपले आयुष्य सुखाने समृद्धिचे घालवायचे असेल आणि नवीन जोडीदार शोधायचा असेल तर तो नवीन जोडीदार शोधण्याचा हक्क व तिला देण्यात आलेला आहे. पांढरा अर्थहीन आहे, त्या रंगाला कोणत्याच प्रकारचा अर्थ नाही आहे असे मानले जाते.
ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचे ध्येय नाही अशा प्रकारच्या व्यक्ती प्रामुख्याने पांढरा रंग परिधान करताना आपल्याला दिसतात.आपण अनेकदा आजूबाजूला संन्यासी व वृद्धाश्रमांमध्ये च्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी पांढ-या रंगाचे कपडे परिधान केलेले असतात याचा अर्थ असा की त्यांनी त्यांचे जीवन लागलेले असते आणि संन्यासाच्या दृष्टिकोनातून ते नेहमी विचार करत असतात. मोह व माया या प्रत्येक गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपले जीवन अध्यात्मिक दृष्ट्या कसे व्यतीत करता येईल असा विचार करत असतात.
अशावेळी ती व्यक्ती पांढ-या रंगाचे कपडे परिधान करत असते परंतु जेव्हा एखाद्या महिलेचे पती निधन पावतो तेव्हा अशावेळी महिलेला सुद्धा पांढरे कपडे परिधान करावे लागतात.हा क्षण त्या महिलेच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण असतो. आणि तसे म्हटले जाते की पांधरा हा अर्थहीन मानला जातो आणि म्हणूनच पतीचे निधन पावल्यानंतर त्या महिलेच्या जीवनाला त्याक्षणी कोणता अर्थ नसतो असे मानले गेले आहे.
अशावेळी समाजामध्ये त्या महिलेच्या प्रती एक संवेदना निर्माण होत असते. अनेकदा पांढरा रंगा मुळे त्या महिलेकडे समाजामध्ये एका चांगल्या नजरेने सुद्धा बघितले जाते आणि त्याचबरोबर पांढरा रंग हा आत्मविश्वास आणि बळ देणारा सुद्धा मानला जातो.
हा रंग अडीअडचणी संकट या सर्वांना संयमाने व धीराने सामोरे जाण्यासाठी आपल्याला आत्मबल प्राप्त करत असतो आणि म्हणूनच अनेकदा आपल्यावर काही संकटे आली तर ती संकटे प्रभावीपणे दूर करण्यासाठी बळ सुद्धा प्रदान करत असतो. तसेच पांढरा रंग विधवा महिलांना परमेश्वराची भक्ति करण्यासाठीसुद्धा प्रोत्साहित करत असतो तसेच भगवंताशी एक विशिष्ट नाते प्रस्थापित करण्यासाठी व आपले आत्मीय नाते प्रस्थापित करण्यासाठी एक बळ देत असतो.
पांढरा रंगा चे कपडे परिधान केल्याने आपल्या मनामध्ये सात्विक विचार व अध्यात्मिक भावना निर्माण होत असतात आणि म्हणूनच आपण अनेकदा बघितले असेल की आपल्या आजूबाजूला जे काही संतमंडळी असतात ते प्रामुख्याने पांढ-या रंगाचे कपडे परिधान केलेले असतात. विधवा स्त्रियांचे मन विचलित होऊ नये म्हणून अनेकदा अध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार सुद्धा केला जातो म्हणून पांढरा वस्त्र अनेकदा महिलांना परिधान करायला सांगितले ते असं शास्त्र सांगते.
परंतु काळानुसार अनेक गोष्टी सुद्धा बदलत आहेत. एक विधवा महिलेने पांढ-या रंगाची साडी नेसावी असा कुठे नियम सुद्धा सांगण्यात आलेला नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाने कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याबद्दल प्रत्येकाकडे विचार करण्याची क्षमता आहे आणि प्रत्येकाने आपल्या विचार क्षमतेनुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याचा हक्क सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.