हिंदू धर्मात महिला स्मशानभूमीत का जात नाही.? जाणून घ्या यामागील गूढ सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत आणि त्या रूढी परंपरा पाळल्या जातात. एकूण सोळा संस्कार आहेत त्यामध्ये व्यक्तीचा जन्म झाल्यापासून तर मृत्य पर्यंत प्रत्येक संस्कार पूर्ण केला जातो त्यातील सर्वात शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याचा अंत्यविधी केला जातो त्याची अंत्ययात्रा काढून अंत्यविधी करून अग्निडाग दिला जातो. त्याच्या अंतिम यात्रा व अंतिम संस्काराला कुटुंबातील सर्व पुरुष असतात परंतु स्त्रियांना सहभागी केले जात नाही.
व्यक्तीच्या अंतिम यात्रेमध्ये सर्व जण सहभागी होतात परंतु या अंतिम यात्रेमध्ये महिलांना समाविष्ट केले जात नाही. महिला स्मशानभूमी पर्यंत येत नाही. काय कारण असेल की अंतिम संस्कार मध्ये महिलांना सहभागी होऊ दिली जात नाही? चला तर मग जाणून घेऊया यामागील कारण आहे. तसे पाहायला गेले तर स्मशान भुमी मधील जे वातावरण असते ते अतिशय नकारात्मक असते ,तेथे अनेक वाईट गोष्टी संचार करत असतात. महिलांचे शरीर नाजूक व कोमल असते आणि तीचे मन कोमल असते म्हणून या नकारात्मक प्रभाव खूप लवकर स्त्रियांच्या शरीरावर मनावर पडू शकतो.
ही नकारात्मक ऊर्जा स्त्रियांच्या शरीरात प्रवेश करू शकते त्यासोबतच तेथील वातावरणाचा नकारात्मक प्रभावामुळे स्त्रियांच्या शरीरात आजार पसरण्याची भीती जास्त असते त्यामुळे आजारी पडू शकतात. जर स्त्रियांनी इतके विलाप व दुःख व्यक्त केले तर त्या मृत आत्म्याला ही खूप दुःख होईल आणि अंतिम संस्कार करणाऱ्यांनाही शांततेने विधी करता येणार नाही, या कारणांमुळेही महिलांना स्मशानात नेले जात नाही.
अंतिम संस्कार विधी करत असताना त्याचबरोबर जेव्हा स्मशानामध्ये वेगवेगळे विधी केल्या जातो त्यावेळी मृत शरीर जळत असताना तेथील संपूर्ण वातावरणात अनेक किटाणू पसरतात. ते किटाणू आपल्या शरीरावर चिकटतात आणि जर हे किटाणू महिलांच्या शरीरावर चीपकले तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुद्धा इन्फेक्शन होऊ शकते त्याच बरोबर असे सुद्धा म्हटले जाते की स्मशानभूमीमध्ये मृतात्म्यास वावर खूप मोठ्या प्रमाणावर असतो आणि मृ”तात्मा यांना पुरुषांच्या शरीरामध्ये प्रवेश करण्यापेक्षा महिलांच्या शरीरामध्ये प्रवेश करणे सोपे जाते त्याचबरोबर अनेक वेळा अंतिम संस्कार करत असताना पुरुषांना मुंडण करावे लागते परंतु हे मुंडन स्त्रियांना करणे अशक्य होते.
आपल्या समाजात स्त्रियांनी मुंडन करणे हे अशुभ मानले जाते त्याचबरोबर अनेक वेळा शारीरिक स्थितीवरून सुद्धा आपण महिलांना स्मशान भूमी मध्ये घेऊन जात नाही त्यामुळे त्यांच्या मनावर शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. या सगळ्या गोष्टी वरून तुम्हाला आता कळलेच असेल की महिलांना हिंदू धर्मशास्त्रामध्ये का स्मशानभूमीमध्ये घेऊन जात नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.