हळदी कुंकू का करतात.? कुंकू लावल्याने काय घडते.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो इंग्रजी वर्षाच्या सुरवातीला पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत या दिवसात आपल्या भारतीय महिला घरो-घरी हळदी कुंकूवाचे कार्यक्रम करतात त्या एकमेकांच्या घरी एकत्रित होतात व एकमेकींना वाण देतात. सोबतच वाणाबद्दल ही या महिलांमध्ये चढा-ओढ लागलेली असते. वाणा मध्ये हळद कुंकू व तीळाचे लाडू तसेच एक भेटवस्तू दिली जाते.
कोणाचे वाण मोठे कोणाचे वाण आकर्षक कोणाचे वाण सगळ्यात वेगळे असे सगळे या महिलांचे खेळ अगदी मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमी पर्यंत चालू असतात. मात्र तुम्ही कधी विचार केला आहेत का महिला हा हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम दरवर्षी का करतात ? चला तर या लेखात जाणून घेऊया नक्की या मागचे गुपित काय आहे.
हळद कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे आणि सोवाशीण बायकांनी जर एकमेकींना कुंकू दिल्यास त्यांचे सौभाग्य वाढते. कुंकूवाचा रंग लाल असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत महिलांच्या कपाळावर कुंकू लावण्याची परंपरा अगदी प्राचीन आहे. आर्य समाजातील महिलांपासून ही संस्कृती भारतात चालत आली आहे. प्राचीन काळातील आर्य कालीन समाज हा मातृ प्रधान समाज होता आणि या काळातील सर्व देवी देवता हे लाल रंगाच्या असत.
म्हणूनच अगदी सुरवाती पासून कपाळावर कुंकूवाचा टीळा लावला जातो. प्रत्येक गावाच्या ग्राम देवतेला लाल रंगाचा टीळा अत्यंत प्रिय असतो म्हणून ग्राम देवतेला लाल रंगाचा टीळा लावला जातो. सोबतच पूर्वी एक प्रथा असायची ती म्हणजे पशू बळीची होय जेव्हा एखादी नववधू सासरी यायची तेव्हा एखाद्या पशूला मारुन त्याच्या रक्ताचा टीळा लावून मगच नव वधूला घरात प्रवेश दिला जात असे. सोबतच आपल्या माता जगदंबेला काली मातेला देखील पशू बळी दिली जाते तेव्हा सुद्धा तिच्या मळवत हा याच लाल रक्ताने भरला जातो.
मित्रांनो लग्न समारंभात देखील लाल कुंकूवाने वधूचा मळवत भरला जातो. एकमेकांना हळद कुंकू देणे म्हणजे आपल्या सौभाग्याचे आयुष्य वाढवणे असे भारतीय महिला समजतात. आज ही अनेक ठिकाणी गावामध्ये हळद कुंकूवाने सडा घालण्याची पद्धत आहे. जर एखादी सुवासिण महिला घराबाहेर जात असेल तर तिला कुंकूवाचा टीळा लावला जातो कारण स्त्री आपल्या घरची लक्ष्मी असते आणि ती जरी बाहेर जात असेल तरी ही तिचे शुभ-शकुन घरा मध्येच रहावा असे या मागचे कारण.
सोबतच शुभ प्रसंगी पुरुषांच्या कपाळी देखील लाल टीळा लावला जातो आपल्या बुद्धीचे स्थान म्हणजे आपले कपाळ आणि कपाळावर कुंकू लावणे म्हणजे आपल्या बुद्धी चे पूजन करणे होय. आपले पती निरोगी रहावेत त्यांचे आयुष्य आपल्या पेक्षा ही जास्त असावे म्हणूनच आपल्या भारतीय बायका हळदी कुंकूवाचा कार्यक्रम करतात एकमेकांना हळदी कुंकू देतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.