कष्ट करून कोणीच सफल होत नाही; त्यासाठी या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.!

कष्ट करून कोणीच सफल होत नाही; त्यासाठी या 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कधी-कधी काय होते तुमच्यामध्ये किती ही प्रतिभा असो अथवा तुम्ही कितीही योग्य असाल तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात नेहमी अपयश येते. तुम्ही खूप मेहनती आहात तुमचे विचार चांगले आहेत तुम्ही हुशार असाल तरी ही तुमच्या अवतीभवती फक्त गरिबीच फेर्या मारत असते आणि जर तुमच्याकडे सगळे असेल तरी सुद्धा सफलता तुमच्या जवळ येत नसेल.

सोबतच समजात तुम्हाला मान-सन्मान मिळत नसेल जागो-जागी लोकं तुमचा अपमान करत असतील तर बिचारा माणूस परिस्थितीला हताश होवून जातो. अक्षरशा: आयुष्याला कंटाळतो. पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का अस का घडते. याचे करण आणि निवारण आम्ही तुम्हाला दोन्ही आज या लेखाद्वारे सांगणार आहोत मात्र लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो मात्र या बाबत एक गोष्ट सांगणार आहोत. एक रामवादी म्हणून सुंदर असे छोटेसे गाव होते गावात मदन शेठ नावाचा गृहस्था राहत होता त्याच्या जवळ अफाट पैसा होता तसेच त्याची एक मोठी आंब्याची बाग होती. मदन शेठच्या बागेतील आंबे सगळ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्याच्या बागेतील आंबे खाण्यास चवीष्ट आणि मधूर होते. गावात एक खोडकर मुलगा होता श्याम त्याला आंबे फार आवडत असत तो रोज मदन शेठच्या बागेतील आंबे चोरुन खात असे.

एके दिवशी मदन शेठ ने श्यामला आंबे चोरुन खाताना पकडले व खूप मार दिला. असे रोज होवू लागले श्याम आंबे चोरत असे मदन शेठ त्याला पकडून फटके देत असे. आता विषय श्यामच्या घर पर्यंत गेला. मग श्यामच्या घरच्या वडिलधार्या माणसांनी आंबे लागवड करण्याचे ठरवले. सगळ्यांनी मिळून आंब्याच्या बिया म्हणजे कोया जमिनीत रुजवल्या.

काही दिवस झाले परंतू आंबे काय वर आले नाहीत श्यामने मग रागाने जाऊन आंब्याच्या त्या कोया जमिनीतून बाहेर काढल्या. कोंब आलेल्या त्या कोया बाहेर येताच निर्जीव झाल्या. नंतर घरच्यांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी श्यामला चांगलाच मार दिला. या वरुन आपल्याला हा बोध मिळतो की आपण योग्य मेहनत करत रहायची कधी ही फळाची अपेक्षा करायची नाही.

चाणक्य निती मध्ये सुद्धा चाणक्य यांनी सांगितले आहे. ‘ बुद्धीमान व्यक्ती कधी ही उतावळे होत नाहीत या उलट ते संयम बाळगतात आणि योग्य संधीची वाट पाहतात. म्हणूनच मित्रांनो जर तुमच्या मध्ये क्षमता असेल जर तुमच्यात योग्यता असेल तर तुम्ही फक्त मेहनत करत रहा तुमच्या क्षेत्रात काम करत रहा जरी सुरवातीला अपयश आले तरी ही घाबरुन जावू नका हताश किंवा निराश होवू नका. नव्याने सुरवात करा एक दिवस सफलता नक्की तुमच्या पायाशी खेळू लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *