का झाले द्रौपदीचे पाच पुरुषांबरोबर लग्न.? फक्त १% लोकांनाच माहितेय यामागचं खरं सत्य.!

का झाले द्रौपदीचे पाच पुरुषांबरोबर लग्न.? फक्त १% लोकांनाच माहितेय यामागचं खरं सत्य.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो भारतीय संस्कृतीमध्ये दोन महाग्रंथ आहेत एक म्हणजे महर्षी वाल्मिकी लिखित रामायण आणि दुसरा महर्षी व्यास लिखित महाभारत. महाभारतात अनेक अश्या घटना घटल्या ज्यांच्यातून भगवंताला आपल्याला काही ना काही संदेश द्यायचा होता. महाभारतात पांडव आणि कौरव असे एकाच घरातील एकाच कुटुंबातील दोन विभागात वाटलेले भाऊ बंधू होते.

पांडवांमध्ये पांडू व कुंती धर्मवीर युद्धीष्ठीर महाबली भीम धनुर्धर अर्जुन आणि अश्विनी पुत्र नकुल आणि सहदेव तर कौरवांमध्ये धृतराष्ट्र आणि गांधारीचे पुत्र दुर्योधन आणि दुशासन सह 98 बंधू. पांडवांची एकच पत्नी होती द्रौपदी जिच्या मुळे सर्व महाभारत घडले. परंतू मित्रांनो तुम्हाला माहित आहे का द्रौपदी म्हणजेच पांचाली एकटीच पाच पुरूषांची बायको कशी झाली ? आम्ही या लेखात या मागचं नक्की गुपित काय आहे ते सांगणार आहोत.

मित्रांनो द्रौपदीने एकदा भगवान श्री कृष्णांना विचारले की मला पाच पती कसे मिळाले पाच पतींची मी एकच पत्नी कशी काय ? तेव्हा भगवानांनी चेहर्यावर स्मित हास्य ठेवून उत्तर दिले की ‘ ही सगळे तुझ्याच मागितल्या गेलेल्या वरदानाच्या फल स्वरूप मिळालेले तुझे ह्या जन्मीचे भोग आहे. द्रौपदी म्हणाली की कोणते वरदान आणि मी कधी मागितले होते पाच पती मिळावे म्हणून वरदान ? तेव्हा भगवान श्री कृष्ण तिला तिच्या पूर्व जन्माची कथा सांगू लागले.

द्रौपदी गेल्या जन्मी तू एक ब्राह्मण पुत्रि होतीस. अत्यंत सुंदर-हुशार गुणी कन्या होतीस. एकदा तुझे वडिल भिक्षा मागण्यासाठी कुटीच्या बाहेर पडले जाताना ते तुला सांगून गेले की कोण अतिथी आले तर त्यांचे योग्य रित्या स्वागत कर आणि बदल्यात त्यांच्या कडून काही ही मागू नकोस. एवढे बोलून ते भिक्षा मागण्यास गावामध्ये निघून गेले. काही वेळाने एक ब्राम्हण महात्मा कुटीमध्ये आले.

तू त्यांचा योग्य रित्या आदर सत्कार केलास सेवा केलीस बदल्यात त्यांनी तुझ्या मनाची इच्छा विचारली तेव्हा तू त्यांना म्हणाली होतीस की पुढच्या जन्मी मला पती धर्मवीर, बलशाली, शूरवीर आणि सुंदर मिळो तसेच हा वर मागताना तू पती मिळू दे हे वाक्य पाच वेळा म्हणालीस म्हणून तुला या जन्मी युध्दिष्ठीर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव या पाच ही पुरुषांशी लग्न करावे लागले.’ एवढे बोलून कृष्ण कन्हैया शांत झाले.

अश्या प्रकारे द्रौपदीने मागितलेल्या पूर्व जन्माच्या वरदानाच्या फल स्वरूप तिला पाच ही पांडावांसोबत विवाह करावा लागला. शिवाय जेव्हा अर्जुन स्वयंवर जिंकून घरी घेऊन आला तेव्हा तो मस्करीच्या नादात बोलून गेला की ‘ माता आज आम्ही तुझ्यासाठी बघ काय वस्तू आणली आहे.

कुंती मातेने देखील न बघता उत्तर दिले की ‘ जे आहे ते पाच जणांनी वाटून घ्या ‘ आणि मातेचा आदेश म्हणून पाच जणांनी सुद्धा द्रौपदीशी विवाह केला. पुढे जाऊन याच द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे पांडाव आणि कौरव यांच्यात महा भयानक युद्ध झाले ज्या मध्ये सत्य आणि नितीने चालणारे पांडाव विजयी झाले 100 कौरव असंख्य सैनिक अनेक वीर महवीर मारले गेले आणि कुरुवंशात धर्माची स्थपना झाली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *