असे कपडे घालणारे राहतात कायमचे गरीब; तुम्हीसुद्धा अशाप्रकारचे कपडे घालता का.?
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक व्यक्तीची राहणीमान ही त्याच्या कपड्यावरून ओळखली जाते. काही जण आपापल्या परिस्थितीनुसार कपडे परिधान करत असतात आणि म्हणूनच अनेक वेळा लोक सुद्धा एखाद्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या कपडे परिधान करण्याच्या शैली वरूनच करत असतात तसेच भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये खूप वेगवेगळ्या पोशाख पद्धतींचे आहेत परंतु आजच्या या लेखामध्ये आपण कोणते पोशाख आपल्या भाग्यांवर परिणाम करणार आहात याबद्दल सांगणार आहोत.
प्रत्येक रंग व प्रत्येक रंगाचे कपडे आपल्याला शुभ फळ प्राप्त करत नसतात कारण की कपड्यांचे सोबत व्यक्तीचे भाग्य सुद्धा जोडले गेलेले असते. आपण जे कपडे घालतो त्या कपड्यांचा आपल्या भाग्यावर परिणाम होत असतो.चला तर मग जाणून घेऊया नेमकं कोणते रंग आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे फाटलेले कपडे अजिबात घालू नये. अनेकांना जुने कपडे व फाटलेले कपडे घालण्याची सवय असते.
सध्या तर ते फॅशन सुद्धा झालेली आहे परंतु फाटलेले कपडे यामुळे आपल्या भाग्यावर वाईट परिणाम होतो तसेच आपले आरोग्य सुद्धा खराब होते म्हणून फाटलेले कपडे अजिबात घालू नये त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर लगेच नवीन कपडे घालू नये कारण की बहुतेक वेळा आंघोळ झाल्यानंतर नवीन कपडे जी व्यक्ती घालते ती व्यक्ती एक तर अंतिम संस्कार ला गेलेली असते किंवा अंतिम संस्कार करताना अग्नी दाह करताना ती व्यक्ती पाण्यामध्ये डुबकी मारून जुने कपडे त्यागून नवीन कपडे घालत असते म्हणून अंघोळ झाल्यानंतर लगेचच नवीन कपडे घालू नका.
आंघोळ करण्याआधी आपण जर कपडे नवीन आणले असतील तर ते घालून पाहू शकतो परंतु आंघोळ केल्या केल्या लगेच नवीन कपडे घालू नका. तिसरी गोष्ट म्हणजे सहसा काळया रंगाचे कपडे घालू नये कारण की काळा रंग हा वाईट शक्तींचा मानला जातो. नकारात्मक शक्तींचा मानला जातो म्हणूनच शनिवार सोडून इतर दिवशी काळया रंगाचे कपडे अजिबात घालू नये.
जर तुम्हाला शनि दोष असेल तर अशावेळी तुम्ही शनिवारी काळया रंगाचे कपडे घालू शकता अन्यथा शनिवारी सुद्धा काळया रंगाचे कपडे घालू नका त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतरांचे कपडे घालू नका. अनेकांना सवय असते की इतरांनी दिलेले कपडे आपण घालत असतो परंतु यामुळे इतरांनी परिधान केलेल्या कपड्यांची जी काही शक्ती असते, ती शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि त्या व्यक्तीची भाग्य सुद्धा आपल्याला लाभत असते म्हणूनच या सर्व गोष्टींचा परिणाम कळत नकळत तुमच्या वर सुद्धा होऊ शकतो.
जर तुमचे भाग्य चांगले असेल तर ते नकारात्मक सुद्धा होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीला त्वचारोग,एखादा आजार असेल तर तुम्हाला सुद्धा हा आजार होऊ शकतो म्हणून दुसऱ्याने दिलेले कपडे शक्यतो परिधान करण्याचे टाळावे. त्याचबरोबर पाचवी गोष्ट म्हणजे जर तुमचे कपडे जळाले असल्यास ते कपडे घालू नका.
अनेक वेळा असे होते की जेव्हा आपण नवीन कपडे घेतो व ती ईस्त्री करण्यास देतो, अशा वेळी कळत नकळत आपले कपडे जळतात अशावेळी ते कपडे परिधान करू नका. असे जळालेले कपडे परिधान केल्याने आपल्याला राहू दोष लागतो व राहूची पीडा आपल्या मागे लागते आणि या सर्व गोष्टींमुळे आपले भाग्य कमजोर बनते आणि या भाग्याचा चुकीचा परिणाम मुळे तुम्हाला गरिबी सुद्धा येऊ शकते म्हणून कपडे वापरत असताना या गोष्टींची विशेष काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.