वर्षातून केवळ एकदाच उघडतो या मंदिराचा रहस्यमय दरवाजा; जाणून घ्या या रहस्यमयी मंदिराविषयी.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारतात असे एक मंदिर आहे ज्याचे इतके लौकिक आहे आणि यामध्ये एवढी रहस्यमय गुपितं आहेत यांबद्दल एकून तुम्ही आश्चर्य चकित होवून जाल. या मंदिरात साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे. हे मंदिर रामकलिन आहे आणि यामध्ये अनेक विविध गुरुंचे ताबूद ठेवले गेले आहेत. म्हणजेच यांचे पार्थिव शरीर विद्या देण्याच्या मुद्रेत ठेवले गेले आहे आणि सुमारे 1000 वर्षांपासून हे सुरक्षित आहेत.
मित्रांनो भारतात असे हे एकच मंदिर आहे जिथे पार्थिव शरीर ठेवले गेले आहेत आणि त्याबरोबरच हे मंदिर भारतातील विशाल आणि भव्य नक्षीकामाने नटलेली वास्तु आहे. चला तर जाणून घेवूया या मंदिराशी जुळलेल्या काही रोचक अश्या गोष्टी. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात श्रीरंगम या पुण्य भूमीत मंदिर स्थित आहे. या मंदिराचे नाव श्री रंगनथस्वामी मंदिर असे आहे. हे मंदिर तीरुचीरीपल्ली मधल्या श्रीरंगन नावाच्या एका बेटावर स्थित आहे. यालाच भूवैकुंठ सुद्धा म्हटले जाते. श्रीरंगनाथ मंदिर 108 महा-दिव्य मंदिरांपैकी एक आहे.
भगवान शरीरंगनाथ स्वामी यांना समर्पित हे मंदिर भारतातील एक भव्य तथा दिव्य मंदिर सुद्धा आहे. 2017 साली या मंदिराचा जिर्णोध्दार केला गेला होता तसेच या मंदिराला सांस्कृतिक वस्तू म्हणून पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. श्रीरंगस्वामी मंदिराला श्रीरंगम, तिरुवरंगम तिरुपती अशी अनेक नावे आहेत. मंदिराच्या भिंतींना नैसर्गिक रंगांनी रंगवले आहे. तसेच उत्तमोत्तम नक्षीकाम सुद्धा आपल्याला पहावयास मिळेल. या मंदिरात एक हजार स्तंभांची ओळ जणू एका विशालकाय चित्रपटगृहा प्रमाणे दिसते. स्तंभांचे बांधकाम ग्रेनाइटच्या मदतीने विजयनगर काळात केले गेले आहे. या स्तंभात घोडे,वाघ,हत्ती तथा अनेक प्राणी-पक्षी अतिशय सुंदर प्रकारे कोरले आहेत.
मंदिराची भव्यता तथा श्री विष्णूंचे रंगनाथ रुप पाहण्यासाठी भाविक फक्त भारतातून नव्हे तर दूर परदेशातून सुद्धा मोठ्या गर्दीने येतात. हे मंदिर दिसण्यासाठी जेवढे सुंदर आहे तेवढाच सुंदर आहे याचा इतिहास. पुरणांनुसार महर्षी गौतम यांनी तप करुन नाशिकमध्ये देव लोकातून गोदावरी नदीला धरतीवर बोलवले होते. या नदी किनारीच महर्षी गौतमांचा आश्रम सुद्धा होता. गौतमांच्या वाढत्या यश-किर्तीने बाकी ऋषी त्यांपासून जळू लागले होते. त्यामुळेच त्यांच्यावर ‘ह’त्ये’चा’ खोटा आरोप लावून त्यांना आश्रमतून काढून टाकले होते.
आश्रमातून काढून टाकल्या गेल्या नंतर गौतम ऋषि आपले दिवस दु:खात व्यतित करु लागले. त्यानंतर ते कवेरी नदीकाठी आले आणि इथे येऊन त्यांनी श्री विष्णूंची तपश्चर्या केली भगवान विष्णूंनी प्रसन्न होवून श्री रंगनाथ यांच्या रुपात मुनीनां दर्शन दिले. असे हे म्हटले जाते की रावण युद्ध आधी श्री राम या मंदिरात येवून देवपूजा करत असत. तसेच वैष्णव संस्कृतीचे धार्मिक गुरु रामनुज यांच्याशी या मंदिराच एक खास नात आहे.
श्री रामनुज लहान वयात श्रीरंगमला आले होते. ते सुमारे 120 वर्षे जगले. काही काळाने त्यांनी श्रीरंगनाथ यांस कडून देह त्यागाची परवानगी घेतली व सर्व शिष्यांसमोर समाधी घेतली. असे मानले जाते की स्वामी रंगनाथ यांच्या मान्यतेनुसार श्रीरामनुज यांचे शरीर मंदिराच्या दक्षिण-पश्चिंम दिशेला ठेवल आहे. हे जगातल एकमेव मंदिर आहे ज्यामध्ये ‘मृ’त’ शरीर अनेक वर्षांपासून ठेवून त्याची पूजा केली जाते.
श्रीरामनुज यांचे शरीर उपदेश मुद्रेत ठेवले गेले आहे. या शरीरावर फक्त केसर आणि चंदनाचा लेप लावला जातो. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष दिनाच्या दिवशी मंदिरात रंग उत्सव साजरा केला जातो आणि पुढिल 8 दिवस चालतो. कृष्ण-अष्टमीच्या दिनी कवेरी नदीत स्नान केल्यास 8 तिर्थक्षेत्रात स्नान केल्या समान पुण्य मिळते. मंदिरात भगवान विष्णूंची मुर्ती शयनमुद्रेत ठेवली गेली आहे.
हे मंदिर श्रीविष्णूंच्या 108 दिव्य मंदिरातील एक मंदिर आहे. हे एक अस मंदिर आहे ज्यावर सर्व तमिळ संत श्रद्धा ठेवतात तथा मोठ्या भक्तीने यावर गीते गातात. फ्रान्सचा सैन्याबरोबर कर्नाटकी युद्धात ह्या मुर्तीच्या डोळ्यातला हीरा चोरी झाला होता आणि हा हीरा मास्कोच्या एका सहंग्रहालयात संवर्धीत करुन ठेवला गेला आहे. हे मंदिर कोणी बनवल या बद्दल अद्यापी काही माहिती तथा पुरावे नाही मिळाले आहेत. तसेच एका चोळ राजाला ही मुर्ती शिकार करताना जंगलात मिळाली होती. तसेच असे मानले जाते की दक्षिणेकडील राजवटिंनी हे मंदिर बनवलं आणि याचा विस्तार केला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.