तुमच्यावर वाईट वेळ आली असेल तर न घाबरता फक्त हि १ गोष्ट लक्षात ठेवा.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशी वेळ येते की आपण निराश होऊन जातो. अनेकदा प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अडथळा निर्माण होत असतो.कधी कधी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होते की या सगळ्या गोष्टी आपल्याच नशिबामध्ये का घडत आहेत. आपल्यापैकी अनेक जण इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होत असतात अशावेळी त्यांच्या जीवनामध्ये दुःख का यावे.?
आपल्यापैकी अनेक जण असे म्हणतात की आपण इतरांचे दुःखामध्ये सहभागी राहीलो परंतु जेव्हा आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हा अशावेळी कोणच आपल्या मागे उभे राहिले नाही. अशावेळी जीवनामध्ये खूप मोठी निराशा येते. आपल्या हातामध्ये काहीच नाही असे वाटू लागते आणि आपण नकारात्मक विचार करू लागतो परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आजचा दिवस आहे तो उद्या बदलणार आहे. आजची वेळ उद्या बदलून चांगली वेळ येणार आहे त्यामुळे निराश होऊ नका.
नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगण्याकडे वाटचाल करत राहा. परिस्थिती कधीच एक सारखी राहत नाही,ती नेहमी बदलत असते. जीवन म्हटले तर दुःख येणारच आहे. सुख मिळणारच आहे परंतु हे जीवन आपण कशा पद्धतीने जगत आहोत त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात. बहुतेक वेळा आपल्या जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला असतो.
अशावेळी आपल्याला व्यक्तींची पारख होत असते. बहूतेक वेळा सुखांमध्ये व्यक्तीची ओळख होत नाही परंतु दुःखामध्ये तो व्यक्ती कसा आहे त्या व्यक्तीचे आपल्या बद्दल मत काय आहे. या सर्व गोष्टी आपल्याला जागृत करतात म्हणूनच जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आले असेल तर अशावेळी खचून जाऊ नका. त्या संकटाला धीराने सामोरे जा कारण की जीवन म्हंटले की दुःख उद्या सुखांमध्ये बदलणार आहेत.
वाईट परिस्थिती जरी आली तरी त्या परिस्थितीला धीराने सामोरे जा. ज्या व्यक्तींनी संकटांमध्ये तुमची साथ सोडलेले आहे अशा व्यक्तिंना सुद्धा तुम्हाला भेटण्यासाठी वेळ घेऊन यावे लागेल असा सकारात्मक दृष्टिकोन मनामध्ये ठरवा. आपल्या जीवनामध्ये वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते वेळच आपल्याला सांगते की कोण आपला आणि कोण परका.
वेळेनुसार माणसं कधी कधी बदलत असतात परंतु जर आपल्यावर चांगली वेळ आली असेल तर सगळे आपल्या सोबत असतात पण जर आपल्यावर दुःखाची वेळ आली असेल तर कोणीही आपल्या सोबत राहत नाही म्हणूनच मानवी जीवनामध्ये वेळ ही अत्यंत महत्त्वाची आहे. वेळ ही मानवाला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असते. तुम्ही तुमच्या कार्याची किती प्रामाणिक आहात.
तुम्ही तुमच्या कर्तव्याशी किती एकनिष्ठता आहात, हे वाईट वेळ आल्यावरच कळत असते. तुमचा चांगला मित्र कोण आहे हे वाईट वेळ आल्यावर कळत असते व कोण आपले व कोण परके ही सुद्धा वेळ आल्यावरच कळत असते. म्हणून दुखायला कधीच आपले शत्रू समजू नये त्या दुःखाला इतरांप्रमाणे वागवून त्याच्यावर कशा पद्धतीने आपल्या मात करता येईल याचा विचार करायला हवा म्हणून जीवनामध्ये कधी दुःख आले तर घाबरून जाऊ नका, या सगळ्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.