फक्त हे १ फळ असे खा, शरीरातील थकवा, पित्त उष्णता, पूर्णपणे नाहीसा होईल या घरगुती उपायाने.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे’ हे गाणं आपण सगळ्यांनीच ऐकल असेल. हे काव्य कवीने वृक्षांचे आपल्यावर असलेल्या उपकारांसाठी लिहले आहे. मित्रांनो अगदी प्राचीन काळापासून आपल्या आजूबाजूच्या झाडांनी आपल्याला सर्व काही दिले. अन्न दिले वस्त्र दिले तसेच निवारा सुद्धा दिला त्याच बरोबर आपली प्रकृती जेव्हा खराब होते तेव्हा ह्याच वृक्ष वेलींपासून बनलेली औषधं आपण वापरत आलो आहे. तुम्ही विचार करत असाल की आम्ही हे सगळं बोलण्याचा नक्की मुद्दा काय आहे.?
तर मित्रांनो आम्ही आज तुम्हाला अश्या एका फळाबद्दल माहिती देणार आहोत ज्याचे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्य चकित व्हाल होय या फळाचा उपयोग प्राचीन काळात सुद्धा औषधी म्हणून केला जात होता परंतू माणूस आधुनिक झाला आणि नैसर्गिक पद्धती सोडून तो कृत्रीम पद्धतीला जास्त प्राधान्य देवू लागला आहे. आज आपण कवठाचे फळ त्याचे फायदे त्याचे वर्णन आणि त्या पासून बनणार्या अशा एका घरगुती औषधाशी ओळख करुन घेणार आहोत जे खाल्ल्याने पित्त शरीरातून नाहीसे होवून जाईल शिवाय अशक्तपणा-थकवा सुद्धा तुमची पाठ सोडून देइल चला तर पुढे लेखात जाणून घेऊया कवठाचे फळ त्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे.
मित्रांनो कवठाचे फल गोल आकाराचे चेंडू सारखे असते खाण्यास ते अगदी रुचकर आणि गोड असते. ह्या फळाचे सेवन तुम्ही गूळ टाकून नियमित केले तर तुमच्या अंगतील उष्णता कमी होईल. शरीरात वेगळीच ऊर्जा जाणवायला लागेल त्याच बरोबर जे गायक मंडळी आहे जे गायन करतात अथवा ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये खूप बोलाव लागत अश्या लोकांनी याचे सेवन करावे या फळाच्या प्रभावाने तुमचा कंठ तुमचा आवाज तोरोताजा राहिल.
कवठाचे फळ एक प्रकारची संजीवनीच आहे पूर्वीच्या काळात सुद्धा लोकं याचा उपयोग करत असत ह्या फळाच्या सेवन मात्राने तुमच्या शरीरातील रक्ताचा संचार योग्य गतीने होवू लागेल. चला आत्ता जाणून घेवूया घरगुती उपयाबद्दल होय जो उपाय तुमच्यासाठी नैसर्गिक चवणप्राशच काम करेल. ज्याचे सेवन सकाळ-संध्याकाळ करा आणि सर्दी-खोकला, ताप-अंगदुखी अश्या प्रकारच्या आजारांना राम-राम म्हणा.
सर्व प्रथम कवठाचे फल घ्या त्याला बारीक करा सोबतच गूळ घ्या गूळामध्ये अनेक गुणधर्म आढळतात शिवाय गुळाच्या असण्याने याला वेगळीच चव येते म्हणून कवठाच्या फळासोबत चवीनुसार गूळ घाला. असे हे मिश्रण बनवून ठेवा व रात्री झोपताना याचे सेवन करा तुम्हाला तुमच्या तब्येतीत बराच फरक जाणवू लागेल. हे मिश्रण लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सगळ्यांना दिले जावू शकतं मात्र ज्यांना मधूमेहाचा त्रास आहे त्यांनी हे मिश्रण खाऊ नये.
मित्रांनो आपल्या परिसरात अनेक अशी वृक्षे आहेत ज्यांच्यापासून अनेक औषधे तयार केली जावू शकतात मात्र आपणच या परोपकारी वृक्षांना तोडत चाललो आहे. झाडे कमी झाली आहेत त्यामुळे पृथ्वीवरचा प्राणवायू कमी होत चालला आहे शिवाय पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे ओझोने लेयर सुद्धा कमी झाला आहे चोहिकडे फक्त प्रदूषण पसरले आहे.
मित्रांनो आपण आता हे सगळ थांबवायला हवं वृक्ष नसतील तर माणूस सुद्धा या पृथ्वीवर वास्तव्य करु शकणार आज-कालच्या वाढत्या वहानांमुळे तर कार्बन डाय ऑसाइड परिसरात एवढा वाढला आहे की बिचारे पक्षी सुद्धा दिसेनासे झाले आहेत म्हणूनच वृक्षारोपण करा ‘झाडे लावा झाडे जगवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.