पोटाचे आजार, बद्धकोष्ठ, अपचन, गॅसेस एकदाच संपवा फक्त या घरगुती उपायाने.!

पोटाचे आजार, बद्धकोष्ठ, अपचन, गॅसेस एकदाच संपवा फक्त या घरगुती उपायाने.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेवण माणूस गरीब असो या श्रीमंत दिवसभर काम करतो ते फक्त जेवणाच्या दोन घासांसाठी. शेतकरी शेतात घाम गाळतो आणि मोठे अधिकारी कार्यालयात मोठी कामं करतात फक्त जेवणाच्या दोन घासांसाठी परंतू आता जमाना बदलत चालला आहे आजच्या या धक्का-धक्कीच्या या जीवनात माणसाला स्वत: साठी जराही वेळ नसतो, ना त्याचा जेवणाकडे लक्ष असतो ना आपल्या तब्येतीकडे आणि म्हणूनच वेळ वाचवण्यासाठी तो बाहेरच फास्ट-फूड म्हणजेच काही ना काही अशुद्ध अरबट-सरबट उघड्यावर तयार झालेल अन्न ग्रहण करतो,

अशा या खाण्यामुळे विकार उद्भवतात ते पोटाचे तर या लेखात आपण याच विषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्या मधले कित्येक जण पोट साफ होण्यासाठी मेडिकल मधली अथवा डॉक्टरांकडची अनेक औषधं आणि गोळ्या घेतात.

परंतू आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या गोळ्या आणि औषधे तुम्हाला फक्त काही वेळासाठीच आराम देवू शकतात शिवाय त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराच्या दुसर्या अवयवांवर दिसून येतात जसे आपल्या शरीराच्या त्वचेची चमक कमी होते आणि या गोळ्या-औषधं पचवून किडनी काम करण हळू हळू बंद करु शकते व मोठे संकट उद्भवू शकते.

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी असा एक साधा सरळ सोपा आणि अगदी घरचा उपाय घेऊन आलो आहोत जो करुन तुम्ही तुमच्या सर्व पोटाच्या विकरांना अलविदा म्हणाल होय हा असा नैसर्गिक रामबाण उपाचार आहे ज्याने तुम्ही पोटच्या विकरांतून कायमचे सुटाल. मित्रांनो चला तर पुढील लेखातून जाणून घेऊया काय आहे हा नक्की उपाय.?

सर्व प्रथम आपण बाळ-हिरडा घ्या होय हिरडा हा आपले पोट साफ होण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे शिवाय हा निर्धोक देखील आहे. हिरड्यांमध्ये अनेक प्रकार आहेत मात्र आपण बाळ-हिरडा घ्यावा साधारण चार ते पाच बाळ-हिरडे बारीक वाटून घ्यावेत. त्यांनतरचा घटक म्हणजे दररोजच्या भाजीमध्ये फोडणीसाठी वापरले जाणारे जीरे पोट साफ होण्यासाठी याचा खूप उपयोग होतो आपण एक चमचा जीरे घ्यायचे आहे. या नंतरचा घटक म्हणजे ओवा.

ओवा पोटातील गैस व अपचनावर वापरला जातो म्हणूनच एक चमचा ओवा सुद्धा घ्यावा. आता तीनी ही घटक एकत्र करा व कमी वाफेवर भाजून घ्यावेत. भाजून घेतल्यावर थोडीशी बडीशोप अगदी चवी पुरती या मिश्रण मध्ये टाका. शेवटचा घटक म्हणजे सैंधव मीठ. दोन चमचे सैंधव मीठ या मिश्रणात घाला नंतर या सगळ्या सामग्रीला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.

रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला सोसवेल एवढ्या गरम पाण्यात केलेली पावडर दोन ते तीन चमचे टाका आणि प्या मित्रांनो सकाळी तुमचे पोट साफ झालेले असेल तुम्हाला शौचास काही ही आपत्ती येणार नाही या घरगुती औषधाचा काही ही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे हा उपाय करा शिवाय पीत्तासाठी सुद्धा आपण कृत्रीम गोळ्या वापरतो. या गोळ्यांनी आपल्याला फक्त तात्पूरता आराम मिळतो परंतू याचा वाईट परिणाम आपल्या किडनी वर होतो म्हणूनच कृत्रीम औषधे टाळा आणि आम्ही सांगितलेला घरगुती नैसर्गिक उपाय करुन पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *