त्वचेवरील शितपित्ताच्या गाठी कायमच्या घालवण्यासाठी सर्वात जवळचा उपाय.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अंगावर वारंवार पित्त उठत असेल तर करा घरगुती उपाय. नमस्कार तुमच्या घरात संगमरवरी शहाबादी फरशी असेल आणि तुम्ही त्यावर आराम करत असाल किंवा वातावरणातील गारवा वाढलेला असताना देखील तुम्ही गरम उबदार कपडे वापरत आहात. अंगावर गांधील माशी चावल्यानंतर जशा मोठ्या मोठ्या गाठी गाठी होऊन त्या प्रचंड खाज निर्माण करतात.
पावसाळ्यात नेहमी ओले कपडे वापरल्यामुळे आणि विशेष करून महिलांना असे अंगावर पित्त उठणे, वारंवार खाज जाणवत राहते ,ही समस्या अर्टिका म्हणून देखील ओळखली जाते. या समस्या पासून कायमची सुटका करण्यासाठी घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे खोबरेल तेल. तुम्ही तुमच्याकडे असणारे पराशुट तेल अगदी लाकडी घाण्याचे तेल सुद्धा वापरू शकता.
जर तुम्ही कंपनीचे तेल वापरत आहे आपण साधारण एक ते चार चमचे एवढे खोबऱ्याचे तेल एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. या नंतर दुसरा घटक म्हणजे भीमसेन कापूर. भीमसेन कापूर अनेक समस्यांवर औषध म्हणून वापरला जातो आणि भीमसेनी कापूर च्या वापरामुळे आपल्या त्वचेवरील दाह पूर्णपणे कमी होतो कारण की भीमसेनी कापूर मध्ये अँटी इन्फला मेंटरी आणि आणखी अँटी बायोटिक गुणधर्म असल्यामुळे आपल्या शरीराला त्वरित फायदा मिळतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला भीमसेन कापूर ची पावडर तयार करायची आहे आणि त्यानंतर खोबरेतेल मध्ये टाकायची आहे. हा उपाय करताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. वेगवेगळे पथ्य पाळणे गरजेचे आहे ते म्हणजे तेलकट, तुपकट,मसालेदार पदार्थ यांची मात्रा आपल्याला कमी करायची आहे.
कांद्याचा रस भोपळ्याचा रस गवांकुर तसेच या सर्व पदार्थांचा रस काही दिवस घेतल्याने तुमची त्वचा व त्वचा मध्ये असणारा विषारी घटक सुद्धा लवकर बाहेर पडण्यास मदत होईल.
कोकम रस सुद्धा वारंवार प्यायल्याने आहे आपल्या शरीरातील पित्त पूर्णपणे नाहीसे होते. आपण जे मिश्रण बनवले आहे ते मिश्रण आपल्या ज्या ठिकाणी शरीरावर लालसर चट्टे निर्माण झालेले आहे व पित्ताच्या गाठी निर्माण झालेला आहे अशा ठिकाणी आपल्याला हे मिश्रण लावायचे आहे. सलग सात ते आठ दिवस हा उपाय सातत्याने केल्याने आणि आपल्या आहारातील पदार्थांमध्ये पथ्ये पाळल्याने तुमच्या शरीरामधील पित्त पूर्णपणे नाहीसे होण्यास मदत होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.