तुमचे खराब लिव्हर पूर्णपणे स्वच्छ करेल करा हा एक घरगुती उपाय; करा फक्त असा उपाय.!

तुमचे खराब लिव्हर पूर्णपणे स्वच्छ करेल करा हा एक घरगुती उपाय; करा फक्त असा उपाय.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लिव्हर हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे अवयव चांगले असेल तर आपल्या शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पडण्यासाठी मदत होते परंतु जर आपल्या शरीरातील लिव्हर खराब असेल, चांगले कार्य करत नसेल तर अशावेळी आपल्याला अनेक आजार उद्भवतात आणि या आजारामुळे आपले शरीर दिवसेंदिवस खराब होत असते म्हणूनच तुमचे सुद्धा लिव्हर खराब झालेले असेल तर आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी असे काही घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत. या उपचारामुळे तुमचे लिव्हर अत्यंत चांगले कार्य करण्यासाठी तत्पर होणार आहे आणि तुमचे लिव्हर उत्तम बनणार सुद्धा आहे चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

लिव्हर हे आपल्या शरीरामध्ये एक केमिकल फॅक्टरी सारखे काम करत असते म्हणजेच की आपण जे काही बाहेरचे पदार्थ जंक फूड ,दारू, सिगारेट किंवा मसालेदार पदार्थ तेलकट पदार्थ खात असतो त्या सर्व पदार्थांना पचवून बाहेर काढण्याचे कार्य लिव्हर करत असते. दैनंदिन जीवनामध्ये आपण जे पदार्थ खात असतो जे पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतात ते पदार्थ लिव्हर ग्रहण करतो आणि इतर अवयवांपर्यंत ते पदार्थ पोहोचवत असतो.

म्हणूनच आपल्या शरीरातील इतर अवयव सुरळीतपणे चालण्यासाठी लिव्हरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते पण तेच लिव्हर जर योग्य कार्य करत नसेल तर त्या सर्वांचा विपरीत परिणाम इतर अवयवांवर सुद्धा होतो आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. जर आपले लिव्हर खराब झाले असेल तर अशा वेळी घरगुती उपचार करताना आपल्याला काही प्रक्रियासुद्धा करणे गरजेचे आहे कारण की कोणतेही उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा ती शास्त्रशुद्ध पद्धतीने व पद्धतशीर करणे गरजेचे आहे आणि अशावेळी आपल्याला काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे.

अशा वेळी आपल्याला बाहेर खाल्लेले तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ खाण्याचे बंद करायला हवे व जो आपण उपाय करणारा आहोत तो उपाय करताना सातत्य असायला हवे. आपल्या घरातील पदार्थ जास्त खायला आणि घरात जेवण करत असताना त्यासोबतच आपल्याला फळांचा समावेश आहारामध्ये जास्त करायला हवा. जर तुम्ही आहारामध्ये फळांचा व्यवसायांचा समावेश केला तर घरगुती उपाय करण्यापुर्वी तुमचे शरीर उत्तम रित्या काम करू लागेल आणि तुमच्या शरीराची वाढ सुद्धा योग्य पद्धतीने होईल. लिव्हर चे कार्य सुरळीत चालायचे असेल तर अशावेळी आपल्याला काही फळांचा सामावेश आहारांमध्ये करायला हवा त्यासाठी आपल्या आहारामध्ये संत्री, मोसंबी, पपई, सफरचंद, अननस, टरबूज या फळांचा समावेश आवश्‍य करा.

जर तुम्ही मसाल्याचे पदार्थ खात नसेल तर उत्तम आहेच पण त्याचबरोबर आहारामध्ये हलका भात ,उपमा ,शिरा असे पदार्थ नक्की आवर्जून खा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुधी, हळद, कोथिंबीर, लिंबू ,काळे मीठ आणि गुळवेलीचा रस लागणार आहे. हे सगळे पदार्थ लिव्हर उत्तम करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. गुळवेल रस आपल्याला आयुर्वेदिक दुकानाच्या स्टोअरमध्ये उपलब्ध होऊन जातो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम दुधीचा रस बनवायचा आहे त्यामध्ये एक चमचा हळद, एक चमचा लिंबाचा रस अर्धा चमचा काळे मीठ , कोथिंबिरीचा रस आणि गुळवेलीचा रस मिक्स करून आपल्याला हे मिश्रण सेवन करायचे आहे.

हा उपाय करण्यासाठी आपण हळद वापरली आहे हळदीमध्ये अँटी बॅकटेरियल गुणधर्म असतात त्याचबरोबर एंटीऑक्सीडेंट गुणधर्म सुद्धा असतात आणि यामुळे आपले लिव्हर पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर लिव्हरमध्ये कोणतेही विषारी घटक असतील तर ते बाहेर पडण्यासाठी मदत होते आणि परिणामी आपले लिव्हर स्वच्छ होते व सुंदर रित्या कार्य करू लागते त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीर असल्याने कोथिंबीर आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे कार्य करते व त्याचबरोबर शरीराला ऊर्जा प्रदान सुद्धा करते.

जर हे मिश्रण आपण सातत्याने सात ते आठ दिवस दिवसभरातून एकदा सेवन केले तर आपले लिव्हर पूर्णपणे स्वच्छ होते त्याच बरोबर लिव्हर चांगल्या पद्धतीने कार्य करू लागते. आपण अनेक जण जेवणामध्ये मुळा खात असतो परंतु मुळाचे पाने सुद्धा लिव्हर स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाचे बनते कार्य करते जेव्हा आपली लिव्हर अशुद्ध होते तेव्हा अशावेळी मुळाचे पान महत्त्वाची भूमिका बजावते व या पानांना संजीवनी म्हणून सुद्धा ओळखले जाते. मुळ्याच्या पानांमध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व ब व जीवनसत्त्व क भरपूर प्रमाणात मध्ये उपलब्ध असते.

यामुळे आपली पचनसंस्था चांगल्या पद्धतीने कार्य करते व आपण जे पदार्थ खातो त्याचे पचन सुद्धा उत्तम रित्या होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मुळाची पाने पाने स्वच्छ पाण्याने धुवायची आहे त्यानंतर या पानांचा रस बनवायचा आहे आणि हा रस आपल्या दिवसभरातून एकदा सेवन करायचा आहे असे केल्याने आपले लिव्हर उत्तम रित्या कार्य करू लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *