तेलाचा असा करा वापर; सांधेदुखी गुडघेदुखी, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी महत्त्वाचा असा उपाय.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या या लेखांमध्ये एकाच उपचाराने आपल्या शरीरातील मोठे मोठे आजार व अनेक समस्या दूर करणार आहोत आणि हा उपाय घरगुती नैसर्गिक असा आहे.भारतामध्ये आयुर्वेदिक शास्त्र खूप मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. या आयुर्वेदिक शास्त्राचा वापर करून अनेक जण मोठमोठ्या आजारांवर मात करत असतात. मोठे मोठे आजार दूर करण्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक तेलांचा सुद्धा वापर औषध म्हणून केला गेलेला आहे.
शरीराच्या विविध आजाराचे केंद्र आपले नाभी म्हणजेच बेंबी असते. विविध आजारावर मात करण्यासाठी आपण अनेक तेलांचा वापर करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये एकापेक्षा जास्त तेलांचा समावेश असतो आणि या तेलांचा वापर आपण अनेक समस्यांवर करत असतो. अनेकजणांना मुळव्याध भगंदर पोट गच्च रहाणे ,पोट फुगल्यासारखे वाटणे, अपचनाचा त्रास होणे, पोटात चमक भरणे, सांधेदुखी, गुडघेदुखी व पोटास संबंधित अनेक आजार होत असतात.
अशा या समस्या नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करण्यासाठी एरंडाचे तेल घ्यायचे आहे. हे तेल आपल्याला दोन ते तीन थेंब आपल्याला नाभी मध्ये टाकायचे आहे. त्यानंतर दोन ते तीन मिनिटं आपल्या हाताच्या साहाय्याने हलकीशी मसाज करायचे आहे. यामुळे आपल्या पोटासंबंधी ज्या काही समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते. प्रत्येकाला गोरे सुंदर व्हायला आवडत असते.तरुणांमध्ये अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग पडणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे ,चेहऱ्याची त्वचा काळी होणे, चेहरा रुक्ष बनतो इत्यादी समस्या निर्माण होत असतात.
या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला बदामाच्या तेलाचा वापर करायचा आहे किंवा कडुलिंबाच्या तेलाचा सुद्धा वापर करू शकतो. या तेलाचे दोन-तीन थेंब आपल्या बेंबी मध्ये टाकून हलकासा मसाज आपल्याला करायचा आहे.असे केल्याने आपल्या चेहर्यावरील ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन आपला चेहरा चमकदार व सतेज होऊन चमकू लागेल.
अनेकांना सांधेदुखीची समस्या त्रास देत असते. गुडघेदुखी कंबरदुखी, मानदुखी इत्यादी हाड संबंधित समस्या दूर करण्यासाठी आपण राईच्या तेलाचा वापर करत असतो. वरील उपाय या प्रमाणे सुद्धा आपल्या राईच्या तेलाचा उपाय करायचा आहे तसेच चेहरा चांगला करण्यासाठी व उजळण्यासाठी आपण तुपाचा सुद्धा वापर करू शकतो. तेल कोणतेही असो हे उपाय आपल्याला कमीत कमी पंधरा दिवस करायचे आहेत. पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या समस्या मध्ये नक्कीच फरक पडलेला पाहायला मिळेल.
अनेकदा अनेक व्यक्तींना सर्दी-खोकला यासारख्या समस्या वारंवार होत असतात अशावेळी कापसाचा गोळा अल्कोहोलमध्ये बुडवून आपल्या बेंबीजवळ ठेवल्याने तसेच फिरवले सर्दी खोकल्या मध्ये आराम मिळतो. अशाप्रकारे आपण अनेक तेलांचा उपयोग करून आपल्या शरीरातील अनेक समस्यांवर मात करू शकता. हे सगळे उपाय अगदी घरगुती असल्यामुळे नैसर्गिक असल्यामुळे यांचा कोणता दुष्परिणाम नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.