ऑक्टोबर महिन्यात ग्रह बदलामुळे या 4 राशींच्या अडचणी खूपच वाढतील.!

ऑक्टोबर महिन्यात ग्रह बदलामुळे या 4 राशींच्या अडचणी खूपच वाढतील.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्रह राशी बदलामुळे या चार राशींच्या व्यक्तीवर होईल परिणाम. त्यांचा परिणाम सामान्य जनतेवर तसेच अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर होईल. ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा राजा सूर्य त्याच्या कमकुवत राशीत संक्रमण करेल. शुक्र कन्या राशीत संक्रमण करेल तर मंगळ मीन राशीत वक्री चालीने जाईल.

बुध ग्रह कन्या राशीमध्ये वक्री होईल आणि १४ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर पर्यंत तूळ राशीमध्ये राहील. तुळ राशीमध्ये सूर्याचे संक्रमण अनेक महत्त्वपूर्ण बदलांचे कारण ठरू शकते,अशा परिस्थितीत ग्रहांच्या या बदलामुळे ऑक्टोबर महिन्यात कोणत्या राशीच्या लोकांना आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो अशा या चार राशी आहेत त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होईल. पहिली राशी आहे मेष राशी. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवडे मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप आव्हानात्मक ठरू शकते.या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनात काही गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो.ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी आपल्या जोडीदाराशी संभाषण करताना शब्द जपून वापरावेत अन्यथा एखादी छोटीशी गोष्ट ही मोठ्या भांडणांचे रूप घेऊ शकते.

या महिन्यात शुक्र तुमच्या सहाव्या स्थानी असणार आहे त्यामुळे भौतिक गोष्टींवर अवांछित खर्च होऊ शकतो आणि बजेट तुमचा खराब होऊ शकतो. खर्चाला आळा घालण्यासाठी तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला चांगली बजेट योजना बनवावी त्यामुळे तुम्ही नफ्यात असाल.मित्रांनो दुसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी.सिंह राशी चा स्वामी कमकुवत राशीत आहे आणि हा स्वामी तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो.

या महिन्यात तुमचे धैर्य आणि शौर्य कमी होऊ शकते. तुम्ही तुमचे शब्द इतरांसमोर ठेवण्यास संकोच करा त्यामुळे तुम्हाला सामाजिक पातळीवर आणि कार्यक्षेत्रात संघर्ष करावा लागू शकतो. ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागाच्या भरात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला काही असं बोलू शकता ज्यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात.

या राशीच्या लोकांना त्यांच्या लहान भावंडांशी चांगले संबंध राखण्यासाठी त्यांच्या वर्तनात चांगले बदल करावे लागतील. मित्रांनो याच्यापुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी.या महिन्यात तुम्हाला संयम आणि विवेक वापरून पुढे जावे लागेल. अतिउत्साही स्वभाव तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतो. घाईघाईत तुम्ही असा निर्णय घेऊ शकता तुमच्यासाठी घातक ठरू शकतो.

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी या महिन्यात तुम्ही अनुभवी लोकांशी किंवा तुमच्या विश्वास लोकांशी बोलले पाहिजे. तुमचा स्वतःचा राशी दुर्बल स्थितीत असलेला सूर्य तुमच्या आत्मविश्वासही कमकुवत करू शकतो. या महिन्यात तूळ राशीच्या लोकांनी योग ध्यानाने आपले मन नियंत्रण करावे यानंतरची शेवटची राशी आहे मीन राशी. या महिन्यात मनामध्ये असंतोष आणि निराशेची भावना असू शकते.

तुम्हाला असे वाटेल की तुम्ही जितकी मेहनत घेत आहात आयुष्यात तुम्हाला तितके यश मिळत नाहीये यामुळे मीन राशीच्या व्यक्तीला मानसिक वेदना सहन कराव्या लागतील. या महिन्यात मंगळ तुमच्या राशीमध्ये वक्री होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या उत्साहात कमतरता दिसून येईल.

आठव्या स्थानी दुर्बल स्थितीत सूर्याची उपस्थिती तुम्हाला किरकोळ आजारांनी त्रस्त करू शकते. हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी या महिन्यात सूर्य देवाची आराधना करावी. सूर्याला जल अर्पित करावेत.या होत्या चार राशी.या राशी असणाऱ्या व्यक्तीने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमची सुद्धा वरील पैकी एखादी राशी असेल तर यावेळी व्यवस्थित कार्य करणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *